Swatantryaveer Gaurav Divas : महाराष्ट्रात 28 मे हा दिवस 'स्वातंत्र्यवीर गौरव दिन' म्हणून साजरा करणार

मुंबई
रोहन जुवेकर
Updated Apr 11, 2023 | 11:18 IST

swatantryaveer gaurav divas celebrate on 28 may of every year announced maharashtra cm eknath shinde : यंदा पासून दरवर्षी महाराष्ट्रात 28 मे हा दिवस 'स्वातंत्र्यवीर गौरव दिन' म्हणून साजरा केला जाणार आहे. या संदर्भातील अधिकृत घोषणा राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली.

swatantryaveer gaurav divas celebrate on 28 may of every year announced maharashtra cm eknath shinde
महाराष्ट्रात 28 मे हा दिवस 'स्वातंत्र्यवीर गौरव दिन' म्हणून साजरा करणार  |  फोटो सौजन्य: Representative Image
थोडं पण कामाचं
  • महाराष्ट्रात 28 मे हा दिवस 'स्वातंत्र्यवीर गौरव दिन' म्हणून साजरा करणार
  • मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ट्वीट करून केली घोषणा
  • भारताच्या स्वातंत्र्यलढ्यात सहभागी झाल्याबद्दल दोन जन्मठेप झालेले स्वातंत्र्यसैनिक होते विनायक सावरकर

swatantryaveer gaurav divas celebrate on 28 may of every year announced maharashtra cm eknath shinde : यंदा पासून दरवर्षी महाराष्ट्रात 28 मे हा दिवस 'स्वातंत्र्यवीर गौरव दिन' म्हणून साजरा केला जाणार आहे. या संदर्भातील अधिकृत घोषणा राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली. स्वातंत्र्यवीर सावरकर यांचा २८ मे हा जन्मदिवस राज्य शासनामार्फत 'स्वातंत्र्यवीर गौरव दिन' म्हणून साजरा करण्यात येणार आहे, असे ट्वीट मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले. 'स्वातंत्र्यवीर गौरव दिन' साजरा करण्यासाठी स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या विचारांच्या प्रचार-प्रसारासाठी विविध कार्यक्रम आयोजित केले जातील. 

देशाच्या स्वातंत्र्यासाठी, राष्ट्रउन्नतीसाठी स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे मोठे योगदान आहे. त्यांची देशभक्ती, धैर्य, प्रगतीशील विचारांना पुढे नेण्यासाठी, तसेच त्यांना अभिवादन करण्यासाठी ‘स्वातंत्र्यवीर गौरव दिन’ साजरा करण्याची मागणी राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत यांनी केली होती. ही मागणी मान्य केल्याचे मुख्यमंत्र्यांनी ट्वीट करून जाहीर केले.

कपल्ससाठी मुंबईत फिरण्याचे BEST SPOTS

मुंबईतला राजवाडा आहे मुकेश अंबानींचे घर

कोण होते विनायक दामोदर सावरकर? का त्यांना स्वातंत्र्यवीर या नावाने संबोधले जाते?

विनायक दामोदर सावरकर हे भारतीय स्वातंत्र्यसैनिक, राजकारणी, समाजसुधारक, तत्वज्ञ, मराठी कवी, लेखक होते. भाषाशुद्धी, लिपीशुद्धी यासाठी त्यांनी मोठे कार्य केले होते. सावरकर हे 1938 च्या साहित्य संमेलनाचे अध्यक्ष होते. भारताच्या स्वातंत्र्यलढ्यात सहभागी झाल्याबद्दल दोन जन्मठेप झालेले स्वातंत्र्यसैनिक अशीही त्यांची ओळख आहे. अंदमानच्या सेल्युलर जेलमध्ये असताना इंग्रजांनी त्यांना लाकडाच्या घाण्याला जुंपून दररोज त्यांच्याकडून तेल काढून घेतले होते. ही अमानवी शिक्षा भोगत असतानाही सावरकरांच्या मनात फक्त देशाच्या स्वातंत्र्याचेच विचार घोळत होते. 

महात्मा ज्योतिबा फुले जयंतीनिमित्त खास मराठी Greetings

महात्मा ज्योतिबा फुले जयंती निमित्त जाणून घ्या ज्योतिबांचे प्रगल्भ विचार

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

Mumbai News (मुंबई बातम्या), Times now ची मराठी वेबसाइट -Times Now Marathi वर। सोबत आणखी Marathi News (मराठी बातम्या) अपडेटसाठी आम्हांला गूगल न्यूजवर फॉलो करा. 

पुढची बातमी