Delivery on Horse : घोड्यावरून होम डिलिव्हरी करणाऱ्या ‘पार्टनर’चा स्विगी घेतेय शोध, माहिती देणाऱ्यास जाहीर केलं इतक्या हजारांचं बक्षीस

घोड्यावरून होम डिलिव्हरीसाठी चाललेल्या एका तरुणाचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर आता कंपनीनं या तरुणाचा सत्कार करण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र या तरुणाबाबत कंपनीकडे सध्या कुठलीच माहिती नाही

Delivery on Horse
घोड्यावरून डिलिव्हरी करणाऱ्या ‘पार्टनर’चा स्विगी घेतेय शोध  |  फोटो सौजन्य: Times Now
थोडं पण कामाचं
  • घोड्यावरून केली होम डिलिव्हरी
  • स्विगी कंपनीकडून तरुणाचा शोध सुरू
  • तरुणाची माहिती देणाऱ्यास 5 हजारांचे बक्षीस जाहीर

Delivery on Horse | मुंबईत भर पावसात वेगवेगळ्या भागात पाणी भरलेलं असताना घोड्यावरून जाऊन होम डिलिव्हरी करणाऱ्या स्विगी डिलिव्हरी पार्टनरची सध्या जोरदार चर्चा सुरु आहे. मुंबईत गेल्या चार दिवसांपासून जोरदार पाऊस कोसळतो आहे. अनेक सखल भागात पाणी भरलं आहे. अशा वेळी घरातून बाहेर न पडता स्विगी किंवा झोमॅटोवरून आपल्याला हवे असणारे पदार्थ मागवण्याकडे नागरिकांचा कल असतो. भर पावसातून प्रवास करत, ट्रॅफिकमधून वाट काढत आणि दिलेला पत्ता शोधत शेकडो डिलिव्हरी बॉईज मुंबईतील रस्त्यातून सतत फिरत असल्याचं आपण पाहतो. त्यातील बहुतांश डिलिव्हरी पार्टनर हे दुचाकीवरून फिरताना दिसतात. काहीजण सायकलींचाही डिलिव्हरीसाठी उपयोग करतात. तर काहीजण ट्रॅफिक टाळण्यासाठी जवळपास आपली गाडी पार्क करून चालत जाऊन डिलिव्हरी देऊन येतात. मात्र सध्या मुंबईतील एका डिलिव्हरी पार्टनरने कमालच केली.

घोड्यावरून दिली डिलिव्हरी

मुंबईत भर पावसात घोड्यावरून डिलिव्हरी देण्यासाठी चाललेल्या तरुणाचा फोटो सध्या सोशल मीडियावर चांगलचा व्हायरल होत आहे. या व्हिडिओत घोड्यावर बसलेला एक तरुण दिसतो. त्याच्या पाठीवर स्विगीची बॅग अडकवलेली दिसते. आपल्या कस्टमरला डिलिव्हरी देण्यासाठी तो चालला असल्याचं या फोटोत दिसतं. मुंबईत कुणीतरी हा फोटो क्लिक करून सोशल मीडियावर व्हायरल केला आणि त्याची सगळीकडे एकच चर्चा सुरू झाली. 

अधिक वाचा - शिंदे-फडणवीस सरकार येताच सिलेंडर महागला, बंडखोर आमदारांवरचा खर्च गॅस दरवाढीतून वसूल करणार? राष्ट्रवादीचा सवाल

कंपनीने घेतली दखल

स्विगी कंपनीकडून याची दखल घेण्यात आली असून तरुणाने दाखवलेल्या या धैर्याचं कौतुक केलं आहे. कस्टमरपर्यंत पोहोचण्यासाठी शक्य त्या सर्व साधनांचा वापर करणाऱ्या तरुण पार्टनरचा आपल्याला अभिमान असल्याचं कंपनीनं म्हटलं आहे. मात्र हे थोर कार्य करणाऱ्या तरुणाबाबत कंपनीकडे कुठलीही ठोस मा्हिती नसल्यामुळे त्या तरुणाचं कौतुक करणं शक्य होत नाहीए. त्यासाठीच कंपनीनं एक ऑफर दिली आहे.

स्विगी कंपनीचे पत्र

जो कुणी या तरुणाबाबत योग्य आणि ऑथेंटिक माहिती देईल, त्याला कंपनीकडून 5 हजार रुपयांचं बक्षीस दिलं जाणार आहे. या तरुणाच्या कृतीमुळे नागरिकांचा स्विगीवरील विश्वास वाढला असून त्याचं इनाम तरुणाला दिलं जाणार असल्याचं सुतोवाच कंपनीनं केलं आहे. 

अधिक वाचा - Raigad Rain Fort : किल्ले रायगडावर तुफान पाऊस, पायर्‍यांवरुन वाहणार्‍या पाण्याचा व्हिडीओ व्हायरल

अनेक प्रश्नांना जन्म

कंपनीनं म्हटल्यानुसार हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर अनेक प्रश्न विचारले जात आहेत. घोड्यावरून डिलिव्हरी करणारा हा तरुण नेमका कोण आहे? त्याने घोड्यावरून डिलिव्हरीसाठी जाण्याचा निर्णय का घेतला असावा? डिलिव्हरी देण्यासाठी बिल्डिंगमध्ये जाताना त्याने घोडा कुठे पार्क केला असावा? यासारखे अनेक गंभीर आणि मजेशीर प्रश्न विचारले जात आहेत. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

Mumbai News (मुंबई बातम्या), Times now ची मराठी वेबसाइट -Times Now Marathi वर। सोबत आणखी Marathi News (मराठी बातम्या) अपडेटसाठी आम्हांला गूगल न्यूजवर फॉलो करा. 

पुढची बातमी