TAIT Exam News in Marathi: TAIT परीक्षेची वाट पाहणाऱ्या डीएड, बीएडच्या विद्यार्थ्यांसाठी खूशखबर आहे. TAIT (Maha TAIT Exam 2023) परीक्षेची घोषणा करण्यात आली असून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात आले आहेत. गेल्या पाच वर्षात ही परीक्षा घेण्यात आली नव्हती. आता या परीक्षेची घोषणा झाल्याने उमेदवारांसाठी मोठी आनंदाची बातमी आहे. शिक्षक अभियोग्यता बुद्धिमत्ता चाचणी परीक्षा (Maharashtra Teacher Aptitude and Intelligence Test) महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेकडून घेण्यात येत आहे. (TAIT Exam: TATE Exam Announced for Teacher Recruitment, Apply Online)
अधिक वाचा : मध्य महाराष्ट्रसह मराठवाड्यात अवकाळी पाऊस पडण्याची शक्यता
शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी (TAIT) 2022 जाहीर करण्यात आली आहे. महाराष्ट्र राज्यातील सर्व स्थानिक स्वराज्य संस्था आणि खासगी व्यवस्थापनाच्या शाळांमध्ये 'पवित्र' या संगणकीय प्रणालीव्दारे शिक्षक भरती करीता शिक्षक अभियोग्यता व बुध्दीमत्ता चाचणी (TAIT)- 2023 या परीक्षेचे ऑनलाईन पध्दतीने आयोजन करण्यात आले आहे.
अधिक वाचा : आसाराम बापू बलात्कार प्रकरणात दोषी
खर तर पहिली परीक्षेनंतर दुसरी परीक्षा सहा महिन्याने व्हायला पाहिजे आणि त्यानंतर चार महिन्याने परीक्षा होणे आवश्यक होते. मात्र, आज ही दुसरी TAIT जाहीर झाली आहे. ही परीक्षा घेण्यात यावी या मागणीसाठी युवाशाही संघटना पाठपुरावा करत होती. संघटनेने मुंबईत जलसमाधी आंदोलनाचा इशारा देखील दिला होता.
अधिक वाचा : पोलिसांचा तणाव दूर करतात रफी अन् लता दिदी; वाढली कार्यक्षमता
Aptitude (अभियोग्यता) साठी 120 प्रश्न असतील आणि त्याला 120 मार्क असतील. तर Intelligence (बुध्दिमत्ता) साठी 80 प्रश्न असेल आणि प्रत्येक प्रश्नासाठी एक मार्क असेल म्हणजेच 80 गुण असतील. या दोघ प्रकारचे प्रश्न मिळून परीक्षा 200 मार्कसाठी होईल. शासन निर्णयात Aptitude (अभियोग्यता) आणि Intelligence (बुध्दिमत्ता) हे मुख्य विषय देण्यात आले आहे तरी यात प्रामुख्याने मराठी भाषा, इंग्रजी भाषा, सामान्य ज्ञान, बालमानासशास्त्र व अध्यापन शास्त्र, गणित व बुद्धिमत्ता या विषयाचा समावेश आहे.
यात इंग्रजी भाषेसाठी प्रश्न 15 असतील आणि गुण 15. मराठी भाषेसाठीही 15 प्रश्न विचारले जातील. सामान्य ज्ञानाचे 30 प्रश्न असतील प्रत्येक प्रश्नाला एक गुण देण्यात येईल. बालमानासशास्त्र व अध्यापन शास्त्रासाठी (Child Psychology and Pedagogy)30 प्रश्न असतील. अंकगणित (Quantitative Aptitude) साठी 30 प्रश्न असतील.
Mumbai News (मुंबई बातम्या), Times now ची मराठी वेबसाइट -Times Now Marathi वर। सोबत आणखी Marathi News (मराठी बातम्या) अपडेटसाठी आम्हांला गूगल न्यूजवर फॉलो करा.