Nitesh Rane : नितेश राणे झाले आक्रमक, मुंबई पालिका आयुक्तांकडे ही मोठी मागणी 

Nilesh Rane on BMC Corruption : मुंबई महानगरपालिकेचा भ्रष्ट कारभारा थांबवाव यासाठी भाजप नेते आणि आमदार नितेश राणे यांनी मुंबई महानगरपालिका आयुक्त इकबाल सिंह चहल यांना खरमरीत पत्र लिहीले आहे.

Take action against corrupt officials of Brihanmumbai Municipal Corporation - Nitesh Rane
नितेश राणे झाले आक्रमक, मुंबई पालिका आयुक्तांना दिले पत्र  |  फोटो सौजन्य: BCCL
थोडं पण कामाचं
  •  बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या भ्रष्ट अधिकाऱ्यांवर कारवाई करा -   नितेश राणे 
  • भाजप नेते आणि आमदार नितेश राणे यांची मागणी
  • मुंबई महानगरपालिका आयुक्तांना लिहीले कारवाईची मागणी करणारे पत्र

Nitesh Rane aggresive : मुंबई : मुंबई महानगरपालिकेचा भ्रष्ट कारभारा थांबवाव यासाठी भाजप नेते आणि आमदार नितेश राणे यांनी मुंबई महानगरपालिका आयुक्त इकबाल सिंह चहल यांना खरमरीत पत्र लिहीले आहे. या पत्रात आदित्य ठाकरेंवरही खरपूस टीका केली आहे. या पत्रात आदित्य ठाकरेंवर थेट भ्रष्टाचाराचे आरोप करण्यात आले आहेत. निलेश राणेंनी लिहीलेल्या या पत्रामुळे आता नवीन वादाला सुरवात होण्याची शक्यता आहे. (Take action against corrupt officials of Brihanmumbai Municipal Corporation - Nitesh Rane) 

अधिक वाचा : ईशा गुप्ताचा बोल्ड अंदाज, पाहून चाहते घायाळ

‘आदित्य सेने’च्या टक्केवारीमुळे मुंबई महानगरपालिका भ्रष्ट्राचारासाठी कुप्रसिद्ध राहिली आहे. त्यामुळे प्रशासक या नात्याने पालिकेवरील भ्रष्टाचारी म्हणून असेलेली ओळख ही पुसण्याची जवाबदारी आपली आहे अशा आशयाचे पत्र भाजप नेते आणि आमदार नितेश राणे यांनी महानगरपालिका आयुक्त इक्बाल सिंह चहल यांना लिहीलेले आहे.

 घाटकोपर पश्चिमेकडील किरोळ गावात जलवाहिनीची सुविधा नसतानाही पुनर्विकसीत केलेल्या इमारतीला महानगरपालिकेने अंशत: भोगवटा प्रमाणपत्र दिले आहे. यावरून मुंबई हायकोर्टाने बीएमसीच्या याचं भ्रष्ट कारभाराबद्दल फटकारले आहे. बीएमसी आयुक्त म्हणून भ्रष्ट अधिका-यांवर कारवाई करणे ही आपली जबाबदारी आहे.  आपले काम केवळ बदल्यांपुरते मर्यादित नसून भ्रष्ट अधिकाऱ्यांवर कारवाई करणे हे ही आहे. 

WhatsApp Image 2022-08-26 at 1.26.33 PM

अधिक वाचा :  विद्या बालनचं साडी प्रेम, पाहा घायाळ करणारे साडीतील फोटो

 तसेच इमारत कोसळण्ची एखादी दुर्घटना आणि जिवीतहानी झाल्या नंतर बीएमसीच्या अधिका-यांना जाग येते आणि कारवाई होते असा ठाम समज जनमानसात आहे . पण हा समज आपण बदलू शकतात आणि अशा भ्रष्ट अधिकार्‍यांवर आधीच कारवाई केली जावू शकते, असेही राणे यावेळी म्हणाले.

ठाकरे विरुद्ध राणे हा वाद सगळ्यांनाच माहित आहे. त्यात महाविकास आघाडीचे सरकार असतांना राणेंच्या बंगल्यावर कारवाईची नोटीस देण्यात आली होती. त्यानंतर हे प्रकरण चिघळं ही होतं. उच्च न्यायालयाने फटकारल्यामुळे नितेश राणेंनी हे पत्र लिहीत मनपाच्या भ्रष्टाचार होत असल्याचे पत्रच आयुक्तांना लिहीहले आहे. मात्र येत्या काळात हाही वाद चिघळण्याची शक्यता आहे.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

Mumbai News (मुंबई बातम्या), Times now ची मराठी वेबसाइट -Times Now Marathi वर। सोबत आणखी Marathi News (मराठी बातम्या) अपडेटसाठी आम्हांला गूगल न्यूजवर फॉलो करा. 

पुढची बातमी