अयोध्या दौऱ्याची रसद कोणी पुरवली? हा घ्या फोटो; मनसे नेत्यानं शेअर केला बृजभूषण सिंह आणि शरद पवारांचा फोटो

मुंबई
भरत जाधव
Updated May 24, 2022 | 08:56 IST

मनसे अध्यक्ष (MNS president) राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी काही दिवसांपूर्वी आपला बहुचर्चित अयोध्या दौरा (Ayodhya tour) रद्द करत असल्याची घोषणा केली. त्यानंत रविवारी पुण्यात सभा घेत दौरा रद्द का करण्यात आला याची माहिती दिली. माझा अयोध्या दौरा रद्द व्हावा यासाठी महाराष्ट्रातूनच रसद पुरवली जात होती, असा आरोप यावेळी राज ठाकरेंनी केला.

 Brijbhushan Singh and Sharad Pawar Photo
शरद पवारांच्या 'त्या' फोटोची राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा   |  फोटो सौजन्य: Indiatimes
थोडं पण कामाचं
  • बृजभूषण सिंह हे गेल्या अनेक वर्षांपासून भारतीय कुस्ती महासंघांचे राष्ट्रीय अध्यक्ष आहेत.
  • राज ठाकरे यांच्या अयोध्या दौऱ्याला उत्तर प्रदेशातील भाजप खासदार बृजभूषण शरण सिंह यांनी आक्रमकपणे विरोध केला.
  • बृजभूषण यांचा राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि खासदार सुप्रिया सुळे यांच्यासोबतचा फोटो व्हायरल

मुंबई : मनसे अध्यक्ष (MNS president) राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी काही दिवसांपूर्वी आपला बहुचर्चित अयोध्या दौरा (Ayodhya tour) रद्द करत असल्याची घोषणा केली. त्यानंत रविवारी पुण्यात सभा घेत दौरा रद्द का करण्यात आला याची माहिती दिली. माझा अयोध्या दौरा रद्द व्हावा यासाठी महाराष्ट्रातूनच रसद पुरवली जात होती, असा आरोप यावेळी राज ठाकरेंनी केला. परंतु राज यांनी कोणत्याही राजकीय पक्षाचं नाव घेणं टाळलं होतं. आता हळूहळू रसद पुरविणांऱ्याचे नाव समोर येऊ लागले आहे. मनसेचे सरचिटणीस (General Secretary of MNS) सचिन मोरे यांनी एक फोटो ट्वीट केला असून या फोटोची राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा होत आहे.

राज ठाकरे यांच्या अयोध्या दौऱ्याला उत्तर प्रदेशातील भाजप खासदार बृजभूषण शरण सिंह यांनी आक्रमकपणे विरोध केला. याच बृजभूषण यांचा राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि खासदार सुप्रिया सुळे यांच्यासोबतचा एका कार्यक्रमाताील फोटो मनसेच्या सचिन मोरे यांनी शेअर केला आहे.राज ठाकरे यांच्या दौऱ्याला होत असलेल्या विरोधामागे राष्ट्रवादीचाच हात असल्याकडे सचिन मोरे यांनी लक्ष वेधण्याचा प्रयत्न केल्याचं दिसत आहे. 'कुछ फोटो अच्छे भी होते है, और सच्चे भी होते है,' या कॅप्शनसह सचिन मोरे यांनी बृजभूषण सिंह यांचे फोटो शेअर केले असून याद्वारे त्यांनी अप्रत्यक्षपणे राष्ट्रवादीवर निशाणा साधला आहे.

फोटो नेमका कोणत्या कार्यक्रमातील?

बृजभूषण सिंह हे गेल्या अनेक वर्षांपासून भारतीय कुस्ती महासंघांचे राष्ट्रीय अध्यक्ष आहेत, तर शरद पवार हे राज्य कुस्तीगीर संघटनेचे अध्यक्ष आहेत. मनसे नेत्याने शेअर केलेले फोटो एका कुस्ती स्पर्धेतीलच असल्याचं दिसत आहे. सन्मान लाल मातीचा, बहुमान मावळवासियांचा, असं या फोटोतील बॅनरवर लिहिलेलं दिसत आहे.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

Mumbai News (मुंबई बातम्या), Times now ची मराठी वेबसाइट -Times Now Marathi वर। सोबत आणखी Marathi News (मराठी बातम्या) अपडेटसाठी आम्हांला गूगल न्यूजवर फॉलो करा. 

पुढची बातमी