ओबीसी आरक्षणावर जूनमध्ये बोलू - अजित पवार

मुंबई
रोहन जुवेकर
Updated May 19, 2022 | 13:00 IST

talk about OBC reservation in June - Ajit Pawar : सर्वोच्च न्यायालयाने मध्यप्रदेशमध्ये ओबीसी आरक्षण लागू केले आहे. मध्यप्रदेश राज्य जसे सर्वोच्च न्यायालयात गेले त्याच धर्तीवर जूनमध्ये बांठीया समितीचा अहवाल आल्यावर आमचं म्हणणं मांडणार आहोत, असे उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले

talk about OBC reservation in June - Ajit Pawar
ओबीसी आरक्षणावर जूनमध्ये बोलू - अजित पवार 
थोडं पण कामाचं
  • ओबीसी आरक्षणावर जूनमध्ये बोलू - अजित पवार

talk about OBC reservation in June - Ajit Pawar : मुंबई : सर्वोच्च न्यायालयाने मध्यप्रदेशमध्ये ओबीसी आरक्षण लागू केले आहे. महाराष्ट्रात आम्ही लगेच प्रयत्न सुरू केले आहेत. बांठिया समिती नेमलेली आहे त्यांचे काम सुरू आहे. मध्यप्रदेश राज्य जसे सर्वोच्च न्यायालयात गेले त्याच धर्तीवर जूनमध्ये बांठीया समितीचा अहवाल आल्यावर आमचं म्हणणं मांडणार आहोत. ओबीसींना प्रतिनिधीत्व मिळाले पाहिजे यासाठी राज्य सरकारचे प्रयत्न सुरू आहेत असे उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले. राष्ट्रवादी काँग्रेसच्या जनता दरबारच्या निमित्ताने घेतलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

इंपिरिकल डाटा गोळा करण्यासाठी बांठिया समिती नेमलेली आहे. मध्यप्रदेशने काय दाखल केले तेही पाहिले आहे. आपल्याला कुठल्याही परिस्थितीत ओबीसी समाजाला प्रतिनिधीत्व मिळायला हवे यासाठी प्रयत्न सुरुच राहणार असल्याचे अजित पवार यांनी सांगितले. 

ओबीसी आरक्षणाबाबत दोन्ही सभागृहात विधेयक पास झाले होते. विरोधकांनीही पाठिंबा दिला होता. त्याप्रमाणे कारवाया झाल्या राज्यपालांनीही विधेयकावर तात्काळ सही केली. त्यामुळे मध्यप्रदेशप्रमाणे न्यायव्यवस्थेसमोर आमची बाजू प्रभावीपणे मांडू. त्यासाठी तज्ज्ञ वकीलांची टीम देण्यात आली आहे. आता सुप्रीम कोर्ट हे सर्वोच्च आहे. न्यायव्यवस्थेला तो अधिकार आहे असेही अजित पवार म्हणाले. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

Mumbai News (मुंबई बातम्या), Times now ची मराठी वेबसाइट -Times Now Marathi वर। सोबत आणखी Marathi News (मराठी बातम्या) अपडेटसाठी आम्हांला गूगल न्यूजवर फॉलो करा. 

पुढची बातमी