Domestic Violence : सुनेला घराची कामे सांगणे म्हणजे क्रूरता नाही, औरंगाबाद खंडपीठाचे मत

Domestic Violence : सुनेला घरातील कामे सांगणे हे क्रूरता नाही असे मत औरंगाबाद खंडपीठाने व्यक्त केले आहे.  औरंगाबामध्ये एका महिलेने आपल्या पती आणि सासूविरोधात घरगुती हिंसाचाराची तक्रार दाखल केली होती. आपल्याला मोलकरणीप्रमाणे राबवले जाते तसेच चार लाख रुपये हुंडा आणण्यासाठी आपल्यावर दबाव आणला गेला असेही या महिलेने सांगितले.

court
कोर्ट  |  फोटो सौजन्य: BCCL
थोडं पण कामाचं
  • सुनेला घरातील कामे सांगणे हे क्रूरता नाही असे मत औरंगाबाद खंडपीठाने व्यक्त केले आहे.
  • औरंगाबामध्ये एका महिलेने आपल्या पती आणि सासूविरोधात घरगुती हिंसाचाराची तक्रार दाखल केली होती.
  • आपल्याला मोलकरणीप्रमाणे राबवले जाते तसेच चार लाख रुपये हुंडा आणण्यासाठी आपल्यावर दबाव आणला गेला असेही या महिलेने सांगितले.

Domestic Violence : औरंगाबाद : सुनेला घरातील कामे सांगणे हे क्रूरता नाही असे मत औरंगबाद खंडपीठाने व्यक्त केले आहे.  औरंगाबामध्ये एका महिलेने आपल्या पती आणि सासूविरोधात घरगुती हिंसाचाराची तक्रार दाखल केली होती. आपल्याला मोलकरणीप्रमाणे राबवले जाते तसेच चार लाख रुपये हुंडा आणण्यासाठी आपल्यावर दबाव आणला गेला असेही या महिलेने सांगितले. (telling women work of household is not cruelty mumbai high court aurangabad bench opinion on domestic violence case)


अधिक वाचा : Shocking CCTV: हॉर्न वाजवल्याचा राग; कार चालकांकडून बाईकस्वाराला बेदम मारहाण, घटनेचा VIDEO आला समोर

परंतु एका विवाहित महिलेला घरात काम करण्यास सांगितले तर त्याचा अर्थ आपल्याला मोलकरणीप्रमाण राबवले जात आहे हा आरोप चुकीचा असल्याचे कोर्टाने म्हटले आहे. जर घरात काम करायचे नव्हते तर लग्नापूर्वीच याबद्दल स्पष्ट करायला हवे होते, त्यामुळे पुढे अशा प्रकारच्या समस्या उद्भवल्या नसत्या असे कोर्टाने म्हटले आहे. सासरी घरकाम करायला नोकर माणसे आहेत की नाही याबद्दल तक्रारीत काहीच नमूद करण्यात आलेले नाही.  

अधिक वाचा : Dombivli: डोंबिवली मध्यवर्ती शाखेवरुन ठाकरे आणि शिंदे गटात वाद, नेमकं काय घडलं? पाहा VIDEO

सासू आणि नणंदनेने मुलगा व्हावा म्हणून आपल्याव दबाव आणला तसेच आपल्याला मारहाण झाल्याचेही पीडित महिलेने सांगितले. तसेच माहेरहून ४ लाख रुपये हुंडा आणण्यासाठी आपल्यावर आणि माहेरच्या माणसांवर दबाण आणल्याचे या महिलेने सांगितले. त्यानंतर या महिलेने २७ जून २०२० रोजी नांदेडमध्ये आपल्या सासरच्या मंडळीविरोधात तक्रार दाखल केली. पोलिसांनी महिलेच्या पती, सासू आणि नणंदविरोधात घरगुती हिसांचाराप्रकरणी गुन्हा दाखल केला. 

अधिक वाचा : Supriya Sule : शरद पवारांनी गांधी घराण्याच्या वारसावर आणि काँग्रेस पक्षावर दावा नाही सांगितला, सुप्रिया सुळेंचा शिंदे गटाला टोला 

या प्रकरणी महिलेच्या पतीने आणि नंणदेने कोर्टात धाव घेतली, तसेच आहे आरोप खोटे असल्याचे म्हटले. तसेच या महिलेचे आधीच एक लग्न झाले होते तेव्हाही पहिल्या पतीविरोधात तिने असेच आरोप केले होते, परंतु त्यांची निर्दोष सुटका झाल्याचे पतीन सांगितले. त्यावर कोर्टाने म्हटले की आधी अशी तक्रार झाली याचा अर्थ असा नाही सदर महिला खोटे बोलत आहे किंवा तिला असे करण्याची सवय आहे. जर पतीवर झालेले आरोप खोटे असतील तर ते सिद्ध करावे लागतील असे कोर्टाने म्हटले. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

Mumbai News (मुंबई बातम्या), Times now ची मराठी वेबसाइट -Times Now Marathi वर। सोबत आणखी Marathi News (मराठी बातम्या) अपडेटसाठी आम्हांला गूगल न्यूजवर फॉलो करा. 

पुढची बातमी