Anant Chaturdashi Special Local : अनंत चतुदर्शीला अतिरिक्त 10 लोकल सेवा चालवणार, मध्य रेल्वेची माहिती

९ सप्टेंबर शुक्रवार रोजी अनंत चतुर्दशी आहे. या दिवशी दहा दिवसांच्या गणपतीचे विसर्जन होणार आहे. आपल्या लाडक्या बाप्पाला निरोप देताना भाविकांची गैरसोय होऊ नये म्हणून मध्य रेल्वे १० अतिरिक्त गाड्या सोडणार आहे. मध्य रेल्वे छत्रपत्री शिवाजी महाराज टर्मिनस ते ठाणे आणि कल्याण तसेच हार्बर मार्गावरील छत्रपत्री शिवाजी महाराज टर्मिनस ते  पनवेल दरम्यान या लोकल सोडणार आहे

mumbai local
मुंबई लोकल  |  फोटो सौजन्य: BCCL
थोडं पण कामाचं
 • ९ सप्टेंबर शुक्रवार रोजी अनंत चतुर्दशी आहे.
 • या दिवशी दहा दिवसांच्या गणपतीचे विसर्जन होणार आहे.
 • आपल्या लाडक्या बाप्पाला निरोप देताना भाविकांची गैरसोय होऊ नये म्हणून मध्य रेल्वे १० अतिरिक्त गाड्या सोडणार आहे.

Anant Chaturdashi Special Local : मुंबई : ९ सप्टेंबर शुक्रवार रोजी अनंत चतुर्दशी आहे. या दिवशी दहा दिवसांच्या गणपतीचे विसर्जन होणार आहे. आपल्या लाडक्या बाप्पाला निरोप देताना भाविकांची गैरसोय होऊ नये म्हणून मध्य रेल्वे १० अतिरिक्त गाड्या सोडणार आहे. मध्य रेल्वे छत्रपत्री शिवाजी महाराज टर्मिनस ते ठाणे आणि कल्याण तसेच हार्बर मार्गावरील छत्रपत्री शिवाजी महाराज टर्मिनस ते  पनवेल दरम्यान या लोकल सोडणार आहे.  १० सप्टेंबर शनिवारी मध्य रात्री या गाड्या चालवण्यात येणार आहे. जेणेकरून भाविकांना गणेश विसर्जनानंतर आपल्या घरी पोहोचण्यास मदत होईल. (ten special local on mumbai suburban on Anant Chaturdashi for ganpati devotee says central railway)

गणेश चतुर्थीच्या वेळी मुंबई महानगरपालिकेसह अनेक पालिकांनी स्थानिक वाहतूक गाड्यांची संख्या वाढवली होती. आता मध्य रेल्वेनेही भाविकांसाठी १० ज्यादा लोकल सोडल्या आहे. 

या आहेत विशेष लोकल


मध्य रेल्वे अप मार्ग

 1. सीएसमटी विशेष लोकल : ही लोकल कल्याणहून १० सप्टेंबर रोजी रात्री १२.०५ मिनिटांनी सुटेल आणि रात्री दीड वाजता छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसला पोहोचेल. 
 2. सीएसमटी विशेष लोकल: ही लोकल ठाण्याहून १० सप्टेंबर रोजी रात्री १ वाजता सुटेल आणि रात्री २वाजता छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसला पोहोचेल. 
 3. तिसरी गाडी गाडी ठाण्याहून १० सप्टेंबर रोजी रात्री २ वाजता सुटेल आणि रात्री ३वाजता छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसला पोहोचेल. 

 

मध्य रेल्वे डाऊन मार्ग

 1. कल्याण विशेष लोकल : ही लोकल छत्रपती शिवाजी महारज टर्मिनस स्थानकावरून रात्री १.४० मिनिटांनी गाडी सुटेल आणि कल्याण स्थानकावर ३ :१० पर्यंत पोहोचेल. 
 2. ठाणे विशेष लोकल : ही लोकल छत्रपती शिवाजी महारज टर्मिनस स्थानकावरून रात्री २.३० मिनिटांनी गाडी सुटेल आणि ठाणे स्थानकावर ३ :३० पर्यंत पोहोचेल. 
 3. कल्याण विशेष लोकल : ही लोकल छत्रपती शिवाजी महारज टर्मिनस स्थानकावरून रात्री ३.२५ मिनिटांनी गाडी सुटेल आणि कल्याण स्थानकावर ४ :५५ पर्यंत पोहोचेल. 

हार्बर अप मार्ग

 1. सीएसमटी विशेष लोकल : ही लोकल पनवेलहून रात्री १ वाजता सुटेल आणि २.२० पर्यंत छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसवर पोहोचेले. 
 2. सीएसमटी विशेष लोकल : ही गाडी पनवेलहून रात्री १.४५ वाजता सुटेल आणि ३.०५ पर्यंत छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसवर पोहोचेले. 


हार्बर डाऊन मार्ग

 1. पनवेल विशेष लोकल : ही लोकल छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसहून १.३० वाजता सुटेल आणि २.५० पर्यंत पनवेल स्थानकात पोहोचेले. 
 2. पनवेल विशेष लोकल : ही लोकल छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसहून २.४५ वाजता सुटेल आणि ४.०५ पर्यंत पनवेल स्थानकात पोहोचेले. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

Mumbai News (मुंबई बातम्या), Times now ची मराठी वेबसाइट -Times Now Marathi वर। सोबत आणखी Marathi News (मराठी बातम्या) अपडेटसाठी आम्हांला गूगल न्यूजवर फॉलो करा. 

पुढची बातमी