Dussehra Melava 2022 : दसरा मेळाव्यासाठी शिंदे गट अन् ठाकरेंना गर्दी वाढविण्याचं टेन्शन, हजारो एसटी, खासगी बसेसचे बुकिंग

मुंबई
भरत जाधव
Updated Oct 04, 2022 | 07:45 IST

 Dussehra Melava : अधिकाधिक कार्यकर्त्यांना मुंबईत घेऊन येण्याची स्पर्धा  आता दोन्ही गटात  सुरू आहे. लहान-मोठ्या अशा एकूण दहा हजार वाहनांमधून कार्यकर्ते मुंबईत दाखल होणार आहेत. यामध्ये 6 हजार एसटी तसेच खासगी बस गाड्यांचा समावेश आहे.

Dussehra Melava 2022
दसरा मेळाव्यासाठी गर्दी वाढविण्याचं टेन्शन  |  फोटो सौजन्य: Times Now
थोडं पण कामाचं
  • लहान-मोठ्या अशा एकूण दहा हजार वाहनांमधून कार्यकर्ते मुंबईत दाखल होणार आहेत.
  • 24 तासासाठी एसटी बसचे भाडे 12 हजार रुपये आहे.
  • इतिहासात प्रथमच शिवसेनेच्या दोन गटांच्या स्वतंत्र सभा होणार

मुंबई :  दसरा मेळावा  (  Dussehra Melava  ) शिंदे गट    (Shinde Group ) आणि मुख्य शिवसेनेला (  ShivSena ) खूप महत्त्वाचा आहे. या मेळाव्यातून दोघे गट आपली ताकद दाखवण्याचा प्रयत्न करणार आहेत. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंना ( Uddhav Thackeray ) राष्ट्रवादी साहरा देत आहे. राष्ट्रवादीचे नेते मेळाव्यासाठी पाठिंबा देत असून  सुप्रिया सुळे यांनी शिवसेनेच्या मेळाव्याचा ट्रेलर ट्विट केला  आहे. तर शिंदे गट आपली ताकद  आजमवण्यासाठी राज्यभरातून बसेस बोलवून आपला मेळावा सुपरहिट करण्याचा प्रयत्न करत  आहे.   Tension for Shinde group and Thackeray to increase crowd for Dussehra gathering

अधिक वाचा  :  दीर्घायुषी व्हायचंय? मग हे आहेत सर्वात आरोग्यदायी पदार्थ

वाहनांमधून अधिकाधिक कार्यकर्त्यांना मुंबईत घेऊन येण्याची स्पर्धा  आता दोन्ही गटात  सुरू आहे. लहान-मोठ्या अशा एकूण दहा हजार वाहनांमधून कार्यकर्ते मुंबईत दाखल होणार आहेत. यामध्ये 6 हजार एसटी तसेच खासगी बस गाड्यांचा समावेश आहे. इतिहासात प्रथमच शिवसेनेच्या दोन गटांच्या स्वतंत्र सभा होणार असल्याने गर्दी जमवण्यासाठी कोट्यवधींचा खर्च केला जात आहे.  शिवसेना आणि शिंदे गटाकडून हजार बसेस या कार्यक्रमासाठी लावण्यात आल्या आहेत. 24 तासासाठी एसटी बसचे भाडे 12 हजार रुपये आहे. तर  24 तासांनंतर 56 रुपये प्रति किमी या दराने महामंडळ भाडे आकारत असते. 

अधिक वाचा  : बुमराह फिट होऊ शकणार नाही, बीसीसीआयची मोहर

 सोमवारी सायंकाळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटाने 1800 एसटी गाड्यांचे आरक्षण केले होते. तीन हजार खासगी गाड्यांचे यापूर्वीच आरक्षण पूर्ण झाले आहे. पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या गटाने 1400 खासगी बस आरक्षित केल्या आहेत. मुंबई महानगर प्रदेशातील शिवसेनेच्या शाखाप्रमुख, नगरसेवक यांना स्वखर्चाने कार्यकर्ते सभास्थळी येण्याच्या सूचना आहेत. कसारा, कर्जत, खोपोली, पालघर, विरार, डहाणू रोड येथून येणाऱ्या मिनी बस, टेम्पो ट्रॅव्हलर, सात आसनी कार अशा वाहनांची संख्यादेखील हजारोंच्या संख्येत असेल. दोन्ही सभांसाठी एकूण जवळपास दहा हजार वाहनांतून कार्यकर्ते मुंबईत दाखल होण्याची शक्यता आहे, असे राज्यातील खासगी बसचालक-मालकांकडून सांगण्यात आले.

मुंबई पोलिसांकडून पार्किंगची व्यवस्था जाहीर

या दसरा मेळाव्याला आता अवघे काही तासच शिल्लक उरले आहेत. दसरा मेळाव्यानिमित्त  राज्यभरातून शिवसैनिक शिवतीर्थावर जमा होणार असल्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर वाहतूक व्यवस्था सुरळीत राहावी, म्हणून मुंबई पोलिसांच्या वाहतूक विभागाने पार्किंग व्यवस्था जाहीर केली आहे. 

अधिक वाचा  :  सीएनजी 8 ते 12 रुपयांनी होणार महाग

दादरच्या शिवतीर्थ येथील दसरा मेळाव्यास पश्चिम व उत्तर उपनगरातून बसमधून येणाऱ्या शिवसैनिकांसाठी सेनापती बापट मार्ग, दादर पश्चिम व कामगार मैदान परळ येथे व्यवस्था करण्यात आली आहे. तर कार पार्किंगसाठी इंडियाबुल्स फायनान्स सेंटर, इंडियाबुल्स फायनान्स सेंटर-१, कोहिनूर स्क्वेअर येथे व्यवस्था केली आहे. इतर जिल्ह्यातून येणाऱ्या शिवसैनिकांच्या बस पार्किंगसाठी पाच उद्यान माटुंगा, नाथालाल पारेख मार्ग, एडनवाला रोड, आर ए के रोड येथे पार्किंग व्यवस्था करण्यात आली आहे. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

Mumbai News (मुंबई बातम्या), Times now ची मराठी वेबसाइट -Times Now Marathi वर। सोबत आणखी Marathi News (मराठी बातम्या) अपडेटसाठी आम्हांला गूगल न्यूजवर फॉलो करा. 

पुढची बातमी