Uddhav Thackeray : उद्धव ठाकरेंनी केला 'हा' सर्वात  मोठा विनोद, का म्हटलं भाजप जाणून घ्या झालं तरी काय 

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख बाळासाहेब आंबेडकर काल एकाच मंचावर आले होते. त्यावेळी उद्धव ठाकरे यांनी लोकशाही वाचविण्यासाठी एकत्र आल्याचे म्हटले होते, त्यावर आता महाराष्ट्र भाजपने टीकेची झोड उठवली आहे.

Thackeray ambedkar on one stage bjp first Reaction on program read in marathi watch video
"उद्धव ठाकरेंनी केला 'हा' सर्वात  मोठा विनोद" 
थोडं पण कामाचं
  • शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख बाळासाहेब आंबेडकर काल एकाच मंचावर आले होते.
  • त्यावेळी उद्धव ठाकरे यांनी लोकशाही वाचविण्यासाठी एकत्र आल्याचे म्हटले होते,
  • त्यावर आता महाराष्ट्र भाजपने टीकेची झोड उठवली आहे.

मुंबई :  शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख बाळासाहेब आंबेडकर काल एकाच मंचावर आले होते. त्यावेळी उद्धव ठाकरे यांनी लोकशाही वाचविण्यासाठी एकत्र आल्याचे म्हटले होते, त्यावर आता महाराष्ट्र भाजपने टीकेची झोड उठवली आहे. भाजप प्रवक्ते केशव उपाध्ये यांची पत्रकार परिषद घेऊन उद्धव ठाकरे यांना टोला लगावला आहे. ( Thackeray ambedkar on one stage bjp first Reaction on program read in marathi watch video  )

यावेळी पत्रकारांशी बोलताना उपाध्ये म्हणाले की, कालच्या कार्यक्रमात उद्धव ठाकरे यांनी बाळासाहेब आंबेडकर यांच्या उपस्थित वक्तव्य केले की, लोकशाही वाचवण्यासाठी एकत्र यायला हवे. पण उद्धव ठाकरे यांनी केलेला हा मोठा विनोद आहे, असा टोला उपाध्ये यांनी लगावला. आता उरला सुरला शिल्लक राहिलेल्या पक्ष वाचवण्यासाठी ठाकरे प्रयत्न करत आहेत. बाळासाहेबांच्या नावाशिवाय काहीच करत नाहीत.  पक्ष वाचवण्याची केविलवाणी धडपड आहे. त्यांच्या स्वतःच्या पक्षात लोकशाही नाही. त्यांनी लोकशाहीच्या गप्पा मारू नये असेही केशव उपाध्ये म्हणाले. 

अधिक वाचा : कतरिना कैफचा हॉट अंदाज

दहशत माजवण्याचा प्रयत्न केला त्या संभाजी बिग्रेड सोबत युती, नक्षलवादी सोबत ते जात आहेत. सावरकरांच्या मुद्द्यावरून काँग्रेससमोर  उद्धव ठाकरे हे गुडघे टेकले, सत्तेसाठी स्वाभिमान सोडून दिला, असेही ते म्हणाले. 

लोकशाही वाचवण्याच्या गप्पा मारतात. स्वतःच्या पक्षात लोकशाही आहे का? स्वतःच्या पक्षाचे आमदार का सोडून गेले असा प्रश्न आम्ही उपस्थित करीत आहोत.  बाळासाहेबांची पुण्याई आणि भाजपच्या साथेमुळे सत्तेपर्यंत पोहचले. कशाचं सोयर सुतक नाही. जो सोबत येईल त्याला घेऊन पक्ष वाचवण्यासाठी धडपड उद्धव ठाकरे करीत आहे, असेही उपाध्ये म्हणाले. 

अधिक वाचा : सामी सामी गर्ल रश्मिका मंदानाचे बोल्ड फोटोशूट

सुप्रिया सुळेंना आता पत्रकार प्रश्न का विचारत नाही 

टिकली प्रकरणावर गळे काढणाऱ्यांनी सुप्रिया सुळें बाबत कोणताही प्रश्न विचारला नाही. काल एका कार्यक्रमात महिला अँकरने बुलेटिनवेळी साडी का परिधान करत नाही असा प्रश्न उपस्थित केला होता. तो मुद्दा उपाध्ये यांना पुढे केला.  टिकली प्रकरणी अनेक पत्रकारांनी ट्विट केले. लेख लिहिले. प्रतिक्रिया दिल्यात आता का असा प्रकार होत नाही. तसेच टिकली प्रकरणी सुमोटो चौकशी करणाऱ्या महिला आयोगाच्या अध्यक्ष रुपाली चाकणकर  आता गप्प का.? त्या आता काय भूमिका घेतील हे पाहावे लागणार असल्याचेही ते म्हणाले. 

अधिक वाचा : श्वेता तिवारीचा भन्नाट लूक

शिवाजी महाराज प्रेरणादायी व्यक्तीमत्त्व 

छत्रपती शिवाजी महाराज हे कायम प्रेरणा देणारी व्यक्ती आहे. छत्रपती शिवाजी महाराज हे महाराष्ट्राचे आराध्य दैवत आहेत.  कोणाच्या मानत शंका नाही, प्रत्येक पिढीसाठी आदर्श आहेत. प्रबोधन ठाकरे यांच्या दगाबाज शिवाजी बाबत काय म्हणायचं. या वादात किती जायचा हा प्रश्न आहे.? असेही केशव उपाध्ये म्हणाले.

https://youtu.be/TyJ2EN9avBc

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

Mumbai News (मुंबई बातम्या), Times now ची मराठी वेबसाइट -Times Now Marathi वर। सोबत आणखी Marathi News (मराठी बातम्या) अपडेटसाठी आम्हांला गूगल न्यूजवर फॉलो करा. 

पुढची बातमी