Thackeray government countdown begins says Kirit Somaiya : मुंबई : राज्यसभा निवडणुकीत भाजपचा विजय झाला तर शिवसेनेच्या एका उमेदवाराचा पराभव झाला. यानंतर ठाकरे सरकारचे काउंटडाऊन सुरू झाले अशा स्वरुपाची प्रतिक्रिया भाजपच्या किरीट सोमय्या यांनी दिली.
राज्यसभेच्या सहा जागांसाठी महाराष्ट्रात झालेल्या निवडणुकीचा निकाल जाहीर झाला. निवडणूक आयोगाने जाहीर केलेल्या निकालानुसार महाराष्ट्रात भाजपच्या तिन्ही उमेदवारांचा विजय झाला. शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस या तिन्ही पक्षांचा प्रत्येकी एक उमेदवार विजयी झाला. केंद्रीय मंत्री पियूष गोयल आणि अनिल बोंडे या दोघांना प्रत्येकी ४८ तर धनंजय महाडिक यांना ४१ मते मिळाली. काँग्रेसच्या इमरान प्रतापगढी यांना ४४ तर राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रफुल्ल पटेल यांना ४३ मते मिळाली. शिवसेनेच्या संजय राऊत यांना ४१ मते मिळाली. सेनेचे संजय पवार फक्त ३३ मते मिळवू शकले. शिवसेनेच्या संजय पवार यांचा राज्यसभा निवडणुकीत पराभव झाला.
महाराष्ट्रात सत्तेत असलेल्या महाविकास आघाडीतील सर्वात मोठा पक्ष असूनही शिवसेनेच्या एका उमेदवाराचा पराभव झाला. या उलट महाराष्ट्रात विरोधात असलेल्या भाजपचे तिन्ही उमेदवार राज्यसभेच्या निवडुकीत विजयी झाले. भाजपला त्यांच्या एकूण आमदारसंख्येपेक्षा जास्त मते मिळाली. पण शिवसेनेच्या एका उमेदवाराला अपेक्षित मतांपेक्षा कमी मते मिळाली. महाविकास आघाडी सरकारमधील कोणत्या पक्षाचे आमदार फुटले यावरून तर्कवितर्कांना उधाण आले आहे. या पार्श्वभूमीवर ठाकरे सरकारचे काउंटडाऊन सुरू झाले अशा स्वरुपाची प्रतिक्रिया भाजपच्या किरीट सोमय्या यांनी दिली.
Mumbai News (मुंबई बातम्या), Times now ची मराठी वेबसाइट -Times Now Marathi वर। सोबत आणखी Marathi News (मराठी बातम्या) अपडेटसाठी आम्हांला गूगल न्यूजवर फॉलो करा.