Sameer Wankhede 25 crore deal: ठाकरे सरकार 25 कोटी रुपयांच्या डीलप्रकरणी करणार समीर वानखेडेंची चौकशी, चार अधिकाऱ्यांची टीम तयार

मुंबई
भरत जाधव
Updated Oct 28, 2021 | 09:33 IST

Sameer Wankhede  25 crore Deal:नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरो (Bureau of Narcotics Control) अर्थात एनसीबीचे (NCB) मुंबई विभागीय संचालक समीर वानखेडे (Mumbai Divisional Director Sameer Wankhede) यांच्याविरोधात अखेर महाराष्ट्र सरकारने (Maharashtra Government) चौकशीची घोषणा केली आहे.

Thackeray government to probe Sameer Wankhede's Rs 25 crore deal
ठाकरे सरकार 25 कोटी रुपयांच्या डीलप्रकरणी करणार समीर वानखेडेंची चौकशी  |  फोटो सौजन्य: Times Now
थोडं पण कामाचं
  • आर्यन खान प्रकरणात साक्षीदार असलेल्या प्रभाकर साईलने प्रतिज्ञापत्रं दाखल केले आहे यात समीर वानखेडेंवर वसुलीचे आरोप केले आहेत.
  • चौकशी करण्यासाठी 4 पोलीस अधिकाऱ्यांची नेमणूक राज्य सरकारकडून करण्यात आली आहे.

Sameer Wankhede  25 crore Deal: मुंबई : नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरो (Bureau of Narcotics Control) अर्थात एनसीबीचे (NCB) मुंबई विभागीय संचालक समीर वानखेडे (Mumbai Divisional Director Sameer Wankhede) यांच्याविरोधात अखेर महाराष्ट्र सरकारने (Maharashtra Government) चौकशीची घोषणा केली आहे. 25 कोटी रुपयांच्या डीलप्रकरणी समीर वानखेडे यांची आता चौकशी होणार आहे. सरकारने ऑर्डर काढून चार अधिकाऱ्यांची नावेही जाहीर केली आहे. 

आर्यन खान प्रकरणाची सुरुवात झाल्यापासून समीर वानखेडे आणि एनसीबीवर महाविकास आघाडीचे मंत्री नवाब मलिक हे आरोप करत आहेत. एकीकडे मलिकांच्या आरोपांची फैरी तर दुसरीकडे राज्य सरकारची चौकशी असा दुहेरी संकटाचा सामना समीर वानखेडे यांना करावा लागणार आहे.आर्यन खान प्रकरणात साक्षीदार असलेल्या प्रभाकर साईलने प्रतिज्ञापत्रं दाखल केले आहे यात समीर वानखेडेंवर वसुलीचे आरोप केले आहेत. शाहरुख खानचा मुलगा आर्यन खान याला सोडण्यासाठी 25 कोटी रुपयांची डील होणार होती. त्यातले 8 कोटी रुपये समीर वानखेडे यांना मिळणार होते.

तसे फोनवरील संभाषण ऐकल्याचा दावा प्रभाकर साईलने केला. याचे गंभीर आरोपांची दखल घेत राज्य सरकारने समीर वानखेडे यांच्याविरोधात चौकशीची घोषणा केली आहे. प्रभाकर साईल, अॅड सुधा द्विवेदी, अॅड कनिष्का जैन आणि नितीन देशमुख यांनी केलेल्या विविध तक्रार अर्जांची एकत्रित चौकशी करण्यासाठी 4 पोलीस अधिकाऱ्यांची नेमणूक राज्य सरकारकडून करण्यात आली आहे.  गेले अनेक दिवस नवाब मलिकविरुद्ध समीर वानखेडे असा सामना उभ्या महाराष्ट्राने पाहिला. आता राज्य सरकारने वानखेडेंविरोधात चौकशी लावल्याने सरकार विरुद्ध वानखेडे असा सामना पाहायला मिळण्याची शक्यता आहे.

कोणते अधिकारी समीर वानखेडे यांची चौकशी करणार?

1 मिलिंद खेतले सहायक पोलिस आयुक्त
2 अजय सावंत पोलिस निरीक्षक
3 श्रीकांत पारकर सहायक पोलिस निरीक्षक
4 प्रकाश गवळी पोलिस उप निरीक्षक

समीर वानखेडेंविरोधात वकिलाची तक्रार

अॅड. कनिष्ठ जयंत यांनी माध्यमांना दिलेल्या माहितीनुसार, आर्यन खान क्रुझ प्रकरणातील मी एक तक्रारदार आहे. 12 आणि 16 ऑक्टोबर या दोन तारखांना आर्यन खान क्रुझ प्रकरणात केपी गोसावी, मनिष भानुशाली, ऋषभ सचदेवा, प्रतिक गाभा, आणि अमीर फर्निचरवाला यांच्याविरोधात मी तक्रार दिली आहे. या लोकांनी संघटीतपणे एकत्र येऊन कट कारस्थान करून आर्यन खानचे अपहरण केले आणि कोट्यवधी रुपयांची खंडणी त्याच्या सुपरस्टार वडिलांकडून मागितली. अशा स्वरुपाची लेखी तक्रार अर्ज मी दाखल केला आहे. एनसीबीचे झोनल डायरेक्टर समीर वानखेडे यांची या सर्व प्रकरणात भूमिका महत्त्वाची आहे. या पाचही लोकांना वानखेडे यांनी खंडणी उकळण्यास आणि अपहरण करण्यास पाठबळ दिल्याचेही या तक्रारीत म्हटले आहे. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

Mumbai News (मुंबई बातम्या), Times now ची मराठी वेबसाइट -Times Now Marathi वर। सोबत आणखी Marathi News (मराठी बातम्या) अपडेटसाठी आम्हांला गूगल न्यूजवर फॉलो करा. 

पुढची बातमी