पुण्याच्या पोटनिडणुकीपर्यंतच ठाकरे गटाची मशाल पेटणार; काय आहे करण ? ठाकरे गटाचं टेन्शन वाढणार का?

मुंबई
भरत जाधव
Updated Feb 18, 2023 | 14:18 IST

ठाकरे गटाकडून शिवसेना (Shiv Sena) हे नाव आणि धनुष्यबाण चिन्ह काढून घेतल्यानंतर निवडणूक आयोगाने आणखी एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. या निर्णयानुसार शिवसेना ज्या पेटत्या मशालीने शिवसैनिकांमध्ये नवीन ऊर्जा निर्माण करणार होते. पण ही मशाल फक्त पुण्यातील पोटनिवडणुकीपर्यंतंच उजेड देणार असल्याचं सांगण्यात येत आहे.

Thackeray group use this mashal sign  Only till the by-election of Pune
पुण्याच्या पोटनिडणुकीपर्यंतच ठाकरे गटाची मशाल पेटणार  |  फोटो सौजन्य: Times of India
थोडं पण कामाचं
  • मशाल हे निवडणूक चिन्ह फक्त चिंचवड आणि कसबा पोटनिवडणुकीपर्यंतच वापरता येणार
  • केंद्रीय निवडणूक आयोगाने ठाकरे गटाला शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे हे नाव आणि मशाल हे निवडणूक चिन्ह तात्पुरते दिले होते.
  • नाव आणि चिन्ह मिळवण्यासाठी किंवा नवीन नाव आणि चिन्ह घेण्यासाठी ठाकरे गटाला पुन्हा निवडणूक आयोगाकडे जावे लागणार

मुंबई : केंद्रीय  निवडणूक आयोगाने ( Central Election Commission) दिलेल्या निर्णयाने उद्धव ठाकरे गटाला  (Uddhav Thackeray group) जबर धक्का बसला. उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) गटाला अजून एक धक्का बसण्याची शक्यता आहे. ठाकरे गटाकडून शिवसेना (Shiv Sena) हे नाव आणि धनुष्यबाण चिन्ह काढून घेतल्यानंतर निवडणूक आयोगाने आणखी एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. या निर्णयानुसार शिवसेना ज्या पेटत्या मशालीने शिवसैनिकांमध्ये नवीन ऊर्जा निर्माण करणार होते. पण ही मशाल फक्त पुण्यातील पोटनिवडणुकीपर्यंतंच उजेड देणार असल्याचं सांगण्यात येत आहे. जर ठाकरे गटाला मशाल हे चिन्ह हवं असेल तर परत निवडणूक आयोगाकडे जावे लागणार आहे. ( Thackeray group use this mashal sign  Only till the by-election of Pune )

अधिक वाचा  : Daily Horoscope : महाशिवरात्रीला या राशींना आहेत धनप्राप्तीचे योग

निवडणूक आयोगाच्या या निर्णयानुसार आता उद्धव ठाकरे गटाला‘शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे’हे पक्षाचे नाव आणि मशाल हे निवडणूक चिन्ह फक्त चिंचवड आणि कसबा पोटनिवडणुकीपर्यंतच वापरता येणार आहे. ठाकरे गटाला  26 फेब्रुवारीपर्यंतच या चिन्ह आणि पक्षाचं नाव वापरण्याची मुदत आहे. याविषयीचे निर्देशच निवडणूक आयोगाने दिले आहेत. केंद्रीय निवडणूक आयोगाने ठाकरे गटाला शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे हे नाव आणि मशाल हे निवडणूक चिन्ह तात्पुरते दिले होते.  चिंचवड आणि कसबा विधानसभा पोटनिवडणुकीपर्यंतच म्हणजेच 26 फेब्रुवारीपर्यंतच ठाकरे गटाला पक्षाचं हे नाव आणि चिन्ह वापरता येणार आहे. 

अधिक वाचा  : कडू-कडू कारल्याचे आहेत गोड-गोड आरोग्यदायी फायदे

त्यानंतर त्यांना हे नाव आणि चिन्ह वापरता येणार नाही. हे नाव आणि चिन्ह मिळवण्यासाठी किंवा नवीन नाव आणि चिन्ह घेण्यासाठी ठाकरे गटाला पुन्हा निवडणूक आयोगाकडे जावे लागणार आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली.  

म्हणून नवं चिन्ह दिलं

अंधेरी विधानसभा पोटनिवडणुकीत शिंदे गटाने शिवसेना आणि धनुष्यबाण या चिन्हावर हक्क सांगितला होता. त्यानंतर निवडणूक निवडणूक आयोगाने धनुष्यबाण चिन्ह आणि शिवसेना हे नाव गोठवलं होतं. त्यानंतर ठाकरे गटाला मशाल  आणि  शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे हे नाव दिलं होतं. तर शिंदे गटाला ढाल तलवार हे चिन्ह देण्यात आले होते. तसेच शिंदे गटाला बाळासाहेबांची शिवसेना हे नाव देण्यात आले होते.

अधिक वाचा  : पोटाची चरबी कमी करण्यासाठी खा हे Indian superfoods

शिंदे गटाचे चिन्ह देखील गोठलं जाणार 

निवडणूक आयोगाचा शिंदे आणि ठाकरे गटातील वादावर निर्णय आला. यानुसार,  शिंदे गटाला धनुष्यबाण चिन्ह आणि शिवसेना नाव वापरण्याची परवानगी दिली. त्यामुळे आता ठाकरे गटाला 26 फेब्रुवारीनंतर निवडणूक आयोगाने दिलेलं मशाल चिन्ह वापरता येणार नाही. ठाकरे गट सोमवारी कोर्टात गेल्यास शिंदे गटाला मिळालेलं धनुष्यबाण चिन्हं गोठवलं जाण्याची शक्यता आहे, असं ज्येष्ठ घटनातज्ज्ञ उल्हास बापट यांनी एका माध्यमांशी बोलताना सांगितले. 


 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

Mumbai News (मुंबई बातम्या), Times now ची मराठी वेबसाइट -Times Now Marathi वर। सोबत आणखी Marathi News (मराठी बातम्या) अपडेटसाठी आम्हांला गूगल न्यूजवर फॉलो करा. 

पुढची बातमी