Karan Johar करण जोहरच्या 'कोरोना स्प्रेडर' पार्टीत ठाकरे सरकारचा मंत्री?

मुंबई
रोहन जुवेकर
Updated Dec 16, 2021 | 19:08 IST

Thackeray Sarkar's Minister attend Karan Johar's 'Corona Spreader' party? बॉलिवूड निर्माता दिग्दर्शक करण जोहर वास्तव्यास असलेल्या रिजेन्सी इमारतीत एक पार्टी झाली. पार्टीचे आयोजन करण जोहरने केले होते. या पार्टीत सहभागी एका व्यक्तीमुळे सेलिब्रेटींना कोरोना झाला आहे.

Thackeray Sarkar's Minister attend Karan Johar's 'Corona Spreader' party?
करण जोहरच्या 'कोरोना स्प्रेडर' पार्टीत ठाकरे सरकारचा मंत्री? 
थोडं पण कामाचं
  • करण जोहरच्या 'कोरोना स्प्रेडर' पार्टीत ठाकरे सरकारचा मंत्री?
  • रिजेन्सी इमारतीच्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे फूटेज तपासलेले नाही - मुंबई महापालिका
  • करीना कपूर, अमृता अरोरा, सीमा खान यांना कोरोना

Thackeray Sarkar's Minister attend Karan Johar's 'Corona Spreader' party? मुंबईः बॉलिवूड निर्माता दिग्दर्शक करण जोहर वास्तव्यास असलेल्या रिजेन्सी इमारतीत एक पार्टी झाली. पार्टीचे आयोजन करण जोहरने केले होते. या पार्टीत सहभागी एका व्यक्तीमुळे सेलिब्रेटींना कोरोना झाला आहे. करणच्या या 'कोरोना स्प्रेडर' ठरलेल्या पार्टीत ठाकरे सरकारचा एक मंत्री सहभागी झाला होता, असा आरोप भारतीय जनता पार्टीचे आमदार आशिष शेलार यांनी केला. 

कोरोना संकट सुरू असल्यामुळे एखाद्या पार्टीसाठी जास्तीत जास्त किती लोकांना उपस्थित राहता येईल, याचे बंधन सरकारने घातले आहे. या बंधनाचे पालन झाले की नाही याची तपासणी करण्यासाठी मुंबई महापालिकेने रिजेन्सी इमारतीच्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे फूटेज तपासणे आवश्यक आहे. पण महापालिकेने अद्याप हे फूटेज तपासलेले नाही तसेच ताब्यातही घेतलेले नाही. ही माहिती महापालिकेनेच दिली आहे. यामुळे पार्टीत ठाकरे सरकारचा कोणता मंत्री सहभागी झाला होता हे अद्याप जाहीर झालेले नाही. आता जनहितासाठी संबंधित मंत्र्याने पुढे येऊन पार्टीविषयीची माहिती द्यावी. पार्टीत कोण होते ते जाहीर करावे, असे आशिष शेलार म्हणाले.

करण जोहरच्या 'कोरोना स्प्रेडर' ठरलेल्या पार्टीत सहभागी झालेल्यांपैकी अभिनेत्री करीना कपूर, अमृता अरोरा, सीमा खान यांना कोरोना झाला आहे. यामुळे पार्टीला उपस्थित राहिलेल्या सर्वांची कोरोना चाचणी करणे आणि त्यांच्या तब्येतीवर लक्ष ठेवणे हेच सध्या शक्य आहे. कोरोना संकट आणखी पसरू नये यासाठी हे उपाय तातडीने करणे आवश्यक असल्याचे आशिष शेलार यांनी सांगितले.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

Mumbai News (मुंबई बातम्या), Times now ची मराठी वेबसाइट -Times Now Marathi वर। सोबत आणखी Marathi News (मराठी बातम्या) अपडेटसाठी आम्हांला गूगल न्यूजवर फॉलो करा. 

पुढची बातमी