Shiv Sena: ठाकरे गटाकडून चारच खासदारांचे शपथपत्र निवडणूक आयोगात सादर, शपथपत्र न देणारे दोन खासदार कोण? चर्चांना उधाण

मुंबई
सुनिल देसले
Updated Feb 18, 2023 | 09:34 IST

Uddhav Thackeray vs Eknath Shinde: ठाकरे गटाने निवडणूक आयोगाकडे आपल्यासोबत सहा खासदार असल्याचा दावा केला होता. मात्र, प्रत्यक्षात चारच खासदारांची शपथपत्र निवडणूक आयोगाकडे सादर केल्याची माहिती समोर आली आहे.

Thackeray supporters only 4 mp submit affidavit to election commission so who are two mp who not give affidavit read details in marathi
Shiv Sena: ठाकरे गटाकडून चारच खासदारांचे शपथपत्र निवडणूक आयोगात सादर, शपथपत्र न देणारे दोन खासदार कोण? चर्चांना उधाण 
थोडं पण कामाचं
  • सहा खासदार सोबत असल्याचा ठाकरे गटाचा दावा, मात्र शपथपत्र चारच 
  • शपथपत्र न देणारे दोन खासदार कोण? चर्चांना उधाण
  • ठाकरे गटाच्या दोन लोकसभा खासदारांनी शपथपत्र दिलं नाही?

Thackeray vs Shinde: शिवसेना कुणाची? या प्रश्नावर केंद्रीय निवडणूक आयोगाने शुक्रवारी (17 फेब्रुवारी 2023) आपला निर्णय जाहीर केला आणि एकनाथ शिंदे यांच्या बाजुने निकाल दिला. निवडणूक आयोगाकडे ठाकरे गट आणि शिवसेना गट या दोघांकडूनही कागदपत्रे सादर करण्यात आली होती. शिवसेना पक्ष आणि शिवसेना पक्षाचे निवडणूक चिन्ह धनुष्यबाण आपल्याला मिळावे यासाठी दोन्ही गटाकडून प्रयत्न सुरू होते. पण अखेर निवडणूक आयोगाने कागदपत्रांच्या आधारावर एकनाथ शिंदे यांच्या बाजूने निकाल दिला. त्याच दरम्यान आता आणखी एक मोठी बातमी समोर आली आहे आणि ती म्हणजे ठाकरे गटाने निवडणूक आयोगाकडे आपल्यासोबत सहा खासदार असल्याचा दावा केला होता. मात्र, प्रत्यक्षात चारच खासदारांची शपथपत्र निवडणूक आयोगाकडे सादर केल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे शपथपत्र न देणारे ते दोन खासदार कोण ? असा प्रश्न उपस्थित होत आहे.

ज्या आकडेवारीच्या आधारे निवडणूक आयोगाने धनुष्यबाणाचा निकाल दिला आहे. त्या आकडेवारीत असे नमूद करण्यात आले आहे की, लोकसभेतल्या एकूण 19 खासदारांपैकी 13 खासदार हे शिंदे गटाच्या बाजूने होते आणि त्यांची शपथपत्रे आलेली आहेत. तर ठाकरे गटाच्या बाजूने सहा खासदार आपल्या बाजूने असल्याचा दावा करण्यात आला. हे सहा खासदार लोकसभेतील होते. मात्र, लोकसभेतील केवळ चार खासदारांची शपथपत्रे ठाकरे गटाकडून मिळालेली आहेत. राज्यसभेतील तिन्हीच्या तिन्ही खासदारांची शपथपत्रे ठाकरे गटाकडून मिळाली आहेत. त्यामुळे नऊ खासदारांचा दावा जरी ठाकरे गटाकडून करण्यात आला होता तरी प्रत्यक्षात त्यांच्या बाजूने सातच शपथपत्र दाखल झाले असा निवडणूक आयोगाचा निकाल सांगतो. त्यामुळे आता हे दोन खासदार कोण ज्यांची शपथपत्रे ठाकरे गटाकडून सादर झालेली नाहीयेत किंवा दाखल होऊ शकले नाहीत किंवा बाद ठरले हे पहावं लागेल.

हे पण वाचा : या आजारांमुळे वाढते पोटाची चरबी

शपथपत्र न देणारे खासदार हे वेगळ्या विचारात तर नाहीयेत नाहीये ना या संदर्भातील सुद्धा चर्चा रंगण्यास सुरुवात झाली असून विविध तर्क-वितर्क लावण्यात येत आहेत.

हे पण वाचा : Weight Loss: हा डाएट फॉलो करा अन् महिन्याभरात 10 किलो वजन कमी करा

निवडणूक आयोगाने म्हटलं, शिवसेना पक्षाला आम्ही 1999 साली लोकशाही नुसार घटना बनवायला सांगितले. ती घटना 2018 पर्यंत कायम होते. त्यानंतर उध्दव ठाकरे यांनी घटनेत केलेला बदल अयोग्य आहे. त्यामुळे पक्षात हुकूमशाही आली. हा बदल ठाकरेंनी आयोगाला कळवला नाही.

बाळासाहेब ठाकरे यांनी 1999 मध्ये पक्षाच्या घटनेत लोकशाीला अनुरूप बदल केले. त्यावेळी बाळासाहेब ठाकरे यांनी पक्षाच्या घटनेतील बदल हे निवडणूक आयोगाकडून संमत करुन घेतले होते. शिवसेना पक्षप्रमुख या नात्याने उद्धव ठाकरे यांनी शिवसेना पक्षाच्या घटनेत 2018 मध्ये बदल केला. हा बदल निवडणूक आयोगाला कळवणे गरजेचे होते. पण उद्धव ठाकरेंनी केलेला हा बदल निवडणूक आयोगाला कळवला गेला नाही.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

Mumbai News (मुंबई बातम्या), Times now ची मराठी वेबसाइट -Times Now Marathi वर। सोबत आणखी Marathi News (मराठी बातम्या) अपडेटसाठी आम्हांला गूगल न्यूजवर फॉलो करा. 

पुढची बातमी