Thane Kalwa Bridge : ठाणे-कळवा नवीन पुलाची एक मार्गिका ऑगस्ट अखेरपर्यंत पूर्ण करण्याचे पालिकेचे नियोजन, आयुक्त संदीप माळवी यांची माहिती

ठाणे - कळवा दरम्यान तिसर्‍या पुलाचे काम सुरू आहे. हा पुल ठाणे पोलीस आयुक्त कार्यालयापासून सुरू होऊन ते कळवा नाका व ठाणे-बेलापूर रोड पर्यंत संपतो. या एका मर्गिकेचे काम कोणत्याही परिस्थितीत २५ ऑगस्टपर्यंत पूर्ण करण्याचे निर्देश आज ठाणे महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त संदीप माळवी यांनी संबंधित विभाग आणि कंत्राटदार यांना दिले आहेत.

थोडं पण कामाचं
  • ठाणे - कळवा दरम्यान तिसर्‍या पुलाचे काम सुरू आहे.
  • हा पुल ठाणे पोलीस आयुक्त कार्यालयापासून सुरू होऊन ते कळवा नाका व ठाणे-बेलापूर रोड पर्यंत संपतो.
  • या एका मर्गिकेचे काम कोणत्याही परिस्थितीत २५ ऑगस्टपर्यंत पूर्ण करण्याचे निर्देश अतिरिक्त आयुक्त संदीप माळवी यांनी दिले

Thane Kalwa Bridge : ठाणे :  ठाणे - कळवा दरम्यान तिसर्‍या पुलाचे (Thane Kalwa Bridge) काम सुरू आहे. हा पुल ठाणे पोलीस आयुक्त कार्यालयापासून सुरू होऊन ते कळवा नाका (kalwa naka) व ठाणे-बेलापूर रोड (thane belapur road) पर्यंत संपतो. या एका मर्गिकेचे काम कोणत्याही परिस्थितीत २५ ऑगस्टपर्यंत पूर्ण करण्याचे निर्देश आज ठाणे महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त संदीप माळवी यांनी संबंधित विभाग आणि कंत्राटदार यांना दिले आहेत.

Water Cut in Mumbai मुंबईकरांनो पाणी वापरा जपून; १५ टक्के पाणी कपात, तर या भागात पाणीपुरवठा राहणार बंद

अतिरिक्त आयुक्त  संदीप माळवी यांनी आज ठाणे - कळवा दरम्यान ठाणे महापालिकेमार्फत बांधण्यात येत असलेल्या तिसऱ्या पूलाच्या कामाची पाहणी केली. एकूण २.४० किमी लांबीच्या या पुलाचे ९० टक्के काम पूर्ण झालेले आहे. त्या कामाचा आढावा माळवी यांनी अधिकाऱ्यांसह घेतला. त्यावेळी मुख्य तांत्रिक अधिकारी प्रवीण पाफळकर, कार्यकारी अभियंता धनाजी मोदे, उप अभियंता आसावरी सोरटे आदी उपस्थित होते.

तब्बल १७ वर्षांनी पत्नी सोडून गेलेल्या दिवशीच पतीने घेतला गळफास, मृत्यूपूर्वी केलं 'असं काही'

पोलीस आयुक्त कार्यालय ते कळवा चौक आणि ठाणे बेलापूर रोड या एका मार्गिकेचे काम २५ ऑगस्टपर्यंत पूर्ण न झाल्यास कारवाई करण्याचा इशाराही संदीप माळवी यांनी दिला. या मार्गिकेचे काम पूर्ण झाल्यावर ती वाहतुकीस खुली केल्यावर ठाणे - कळवा दरम्यानची वाहतूक कोंडी कमी होऊन नागरिकांना मोठा दिलासा मिळेल असा विश्वास माळवी यांनी व्यक्त केला. पुलाच्या कामाच्या पाहणी दरम्यान अतिरिक्त आयुक्त संदीप माळवी यांनी तांत्रिक माहिती घेतली. तसेच संबंधित अडचणींवर मात करून एक मार्गिका काहीही करून पूर्ण करा असे निर्देशही दिले.

CNG Price Hike : मुंबईत सीएनजी आणि पीएनजीच्या दरांत वाढ, सर्वसामान्यांवर वाढणार महागाईचा बोझा

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

Mumbai News (मुंबई बातम्या), Times now ची मराठी वेबसाइट -Times Now Marathi वर। सोबत आणखी Marathi News (मराठी बातम्या) अपडेटसाठी आम्हांला गूगल न्यूजवर फॉलो करा. 

पुढची बातमी