Thane Property Tax : मुंबई पाठोपाठ ठाणेकरांनाही मिळणार गिफ्ट, ठाकरे सरकार लवकरच घेणार निर्णय

Thane Property Tax मुंबईत ५०० स्केअर फीट असलेल्या घरांचा मालमत्ता कर माफ करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. आता ठाणेकरांनाही खुषखबर मिळू शकते. ठाणेकरांचाही मालमत्ता कर माफ होण्याची चिन्हे आहेत. राज्य सरकारकडे तसा प्रस्ताव आला असून लवकरच त्यावर निर्णय होणार आहे.

थोडं पण कामाचं
  • मुंबईत ५०० स्केअर फीट असलेल्या घरांचा मालमत्ता कर माफ करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे.
  • ठाणेकरांचाही मालमत्ता कर माफ होण्याची चिन्हे
  • राज्य सरकारकडे प्रस्ताव, लवकरच निर्णय

Thane Property tax : मुंबई : मुंबईत ५०० स्केअर फीट असलेल्या घरांचा मालमत्ता कर माफ करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. आता ठाणेकरांनाही खुषखबर मिळू शकते. ठाणेकरांचाही मालमत्ता कर माफ होण्याची चिन्हे आहेत. राज्य सरकारकडे तसा प्रस्ताव आला असून लवकरच त्यावर निर्णय होणार आहे. गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी याबाबत माहिती दिली आहे. (thane property tax waive proposal state government jitendra awhad)

आव्हाड म्हणाले की ज्या प्रमाणे मुंबईत ५०० स्केअर फूट घरांचा मालमत्ता कर माफ करण्यात आला आहे, त्याच धर्तीवर ठाण्यातही ५०० स्केवर फूट घरांचा मालमत्ता कर माफ व्हावा म्हणून राज्य सरकारकडे प्रस्ताव देण्यात आला आहे. लवकरच यावर चर्चा होईल आणि त्यावर निर्णय होईल असे आव्हाड यांनी सांगितले. आज राज्य मंत्रिमंडळाची बैठक झाली त्यात अनेक विषयांव चर्चा झाली. ठाण्यात मालमत्ता कर माफ करण्यावरची चर्चा झाली. मराठी पाट्यांवरही या बैठकीत चर्चा झाली. 

दुकानांवर पाट्याच मराठीतच

या बैठकीत मराठी पाट्यांवरही चर्चा झाली. आता प्रत्येक दुकानावर मराठीतच पाटी असेल, त्यात कुठलीही पळवाट असणार नाही, राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत असा निर्णय घेण्यात आला आहे. आज मंत्रिमंडळाने महाराष्ट्र दुकाने व आस्थापना अधिनियम २०१७ यात सुधारणा केली. कुठल्याही दुकानात एक जरी कामगार असला तरी पाटी मराठीत आणि खाली लहान अक्षरात इंग्रजी किंवा इतर भाषेत नाव देण्यास मुभा देण्यात आली आहे असे आव्हाड यांनी यावेळी सांगितले.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

Mumbai News (मुंबई बातम्या), Times now ची मराठी वेबसाइट -Times Now Marathi वर। सोबत आणखी Marathi News (मराठी बातम्या) अपडेटसाठी आम्हांला गूगल न्यूजवर फॉलो करा. 

पुढची बातमी