दुर्मिळ रक्तचंदनाचा 15 कोटींचा साठा जप्त, टोळी अटकेत

मुंबई
Updated Sep 22, 2019 | 16:31 IST | टाइम्स नाऊ मराठी

घोडबंदर आणि भेंडीबाजार परिसरातील गोदामांतून अवघ्या १५ कोटींचा रक्तचंदनाचा साठा पोलीसांनी जप्त केला आहे. इम्रान शेखला पोलिसांनी अटक केली आहे. ही दुर्मिळ रक्तचंदनाची आंतरराष्ट्रीय टोळी असल्याचं समजलं जात आहे.

Representational Image
गोदामात छापे टाकत दुर्मिळ रक्तचंदनाचा 15 कोटींचा साठा जप्त 

थोडं पण कामाचं

  • मुंबईतील गोदामांमध्ये आढळला रक्तचंदणाचा साठा 
  • रक्तचंदनाचा साठा करणाऱ्या इम्रान खानला पोलीसांकडून अटक
  • गोदामांतून तब्बल १५ कोटींचा रक्तचंदनाचा साठा पोलिसांकडून जप्त

 मुंबई:  दुर्मिळ रक्तचंदनाचा तब्बल 15 कोटींचा साठा पोलिसांनी जप्त केला आहे. घोडबंदर ते भेंडीबाजार या परिसरातल्या काही गोदामांमधून हा साठा जप्त करण्यात आला आहे. या प्रकरणी पोलिसांनी इमरान रफिक शेख (43) ला अटक केली असून त्याची चौकशी केली जात आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सुमारे 15 कोटी रूपये किमतीचा 2 हजार 200 किलोंचा साठा गुन्हे शाखेच्या कक्ष 9 नं जप्त केला आहे. 

समोर आलेल्या माहितीनुसार, इमरान हा आंतरराष्ट्रीय टोळीचा मुख्य आरोपी आहे. त्याला शनिवारी 'वांद्रे युनिटच्या गुन्हे शाखेच्या अधिकाऱ्यांनी अटक केली आहे. याआधी ही याच टोळींकडून साडेसात कोटींचा साठा जप्त केला होता. दरम्यान काल केलेली ही सर्वांत मोठी कारवाई असल्याचं बोललं जातं आहे. गेल्या आठवड्यात केलेल्या कारवाईच्या आधारे तपास केला असता रक्तचंदनाचा मोठा साठा असल्याची माहिती गुन्हे शाखेला मिळाली होती. या माहितीच्या आधारे पोलिसांनी घोडबंदर येथील गोदामात छापे टाकून तिथल्या 40 खोक्यांमध्ये आलेले 11 कोटी रूपयांचे 2 हजार 200 किलो रक्तचंदन, तर भेंडीबाजारातल्या गोदामात टाकलेल्या छाप्यात 25 खोक्यात 4 कोटींचं रक्तचंदन जप्त केलं आहे. त्यामुळे या दोन्ही छाप्याच्या दरम्यान पोलिसांनी 15 कोटींचा रक्तचंदनाचा साठा जप्त केला.

सुत्रांच्या माहितीनुसार, जप्त केलेल्या रक्तचंदनाचा साठा हा थेट चेन्नई ते मुंबईतल्या विविध भागांमध्ये केला जात आहे. तसंच बाहेरच्या देशात म्हणजेच चीन आणि हॉंगकॉंगमध्ये देखील या मालाचा पुरवठा केला जाणार होता अशी माहिती मिळाली आहे. पण पोलिसांना या बाबतची गुप्त माहिती हाती लागताच पोलीस उपायुक्त आणि त्यांच्या पथकांनी इमरानला अटक केल्याचं पोलिसांकडून सांगण्यात आलं आहे. 
 

 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी