उद्या होणार शिंदे सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार?असं असू शकतं मंत्रिमंडळ, कोणाकडे जाणार वित्त खातं

मुंबई
भरत जाधव
Updated Aug 04, 2022 | 11:52 IST

राज्यातला मंत्रिमंडळ (Maharashtra Cabinet) विस्तार महिना उलटून गेल्यानंतरही रखडला आहे.  केंद्रीय गृहमंत्री अमित शाह (Amit Shah) यांच्याशी चर्चा झाल्यानंतरच मंत्रिमंडळ विस्तार होणार असल्याची माहिती समोर आली होती. आता मंत्रिमंडळ विस्तार हा उद्याच होण्याची शक्यता आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांच्या मंत्रिमंडळात काही जुन्या तर काही नव्या नावांना संधी मिळणार आहे.

The cabinet of Shinde government will be expanded tomorrow
शिंदे सरकारचा विस्तार उद्या होणार? शिंदे गटाला 40 टक्के वाटा  |  फोटो सौजन्य: Times Now
थोडं पण कामाचं
 • भाजप आणि शिंदे गटात मंत्री संख्या आणि खात्यांवर एकमत
 • शुक्रवारी भाजपचे 8 तर शिंदे गटामधील सात जण मंत्रिपदाची शपथ घेऊ शकतात?
 • मंत्रिमंडळात भाजपच्या कोट्यातील 21 मंत्री मंत्रिमंडळात सामील होऊ शकतात

मुंबई :   राज्यातला मंत्रिमंडळ (Maharashtra Cabinet) विस्तार महिना उलटून गेल्यानंतरही रखडला आहे.  केंद्रीय गृहमंत्री अमित शाह (Amit Shah) यांच्याशी चर्चा झाल्यानंतरच मंत्रिमंडळ विस्तार होणार असल्याची माहिती समोर आली होती. आता मंत्रिमंडळ विस्तार हा उद्याच होण्याची शक्यता आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांच्या मंत्रिमंडळात काही जुन्या तर काही नव्या नावांना संधी मिळणार आहे. भाजप आणि शिंदे गटात मंत्री संख्या आणि खात्यांवर एकमत झाले असून मंत्रिमंडळात 35 जणांना संधी मिळणार आहे. उद्या, शुक्रवारी भाजपचे 8 तर शिंदे गटामधील सात जण मंत्रिपदाची शपथ घेऊ शकतात, अशी माहिती समोर आली आहे. 

दरम्यान शिंदे गटाला सरकारमध्ये 40% हिस्सा मिळेल. मंत्रिमंडळात भाजपच्या कोट्यातील 21 मंत्री मंत्रिमंडळात सामील होऊ शकतात, तर शिंदे गटाला 12 मंत्रीपदे मिळू शकतात. 2 मंत्री इतर छोट्या मित्रपक्षांना दिले जातील. भाजपकडे स्वतःचे आणि अपक्ष असे 115 आमदार आहेत. शिंदे यांच्याकडे शिवसेना आणि अपक्ष असे 50 आमदार आहेत. शिंदेंसोबत आलेल्या मोठ्या नेत्यांना मंत्री करावेच लागेल. त्याचप्रमाणे मंत्रिमंडळ विस्तार करताना एकनाथ शिंदेंना प्रादेशिक समतोल बघावा लागणार आहे.  

दरम्यान आज सर्वोच्च न्यायालयात आमदार निलंबन आणि शिवसेना पक्ष कोणाचा यावर सुनावणी झाली आहे. सर्वोच्च न्यायालयाने पक्षाच्या चिन्हाबाबत कोणताही निर्णय निकाल येईपर्यंत घेऊ नका, असं म्हटलं आहे. ही याचिका मोठ्या खंडपीठाकडे द्यायची की नाही याबाबत सोमवारी निर्णय घेऊ. याप्रकरणी पुढील सुनावणी ही सोमवारी पार पडणार असं सुप्रीम कोर्टाने स्पष्ट केलं. एकीकडे सरकार राहणार की जाणार यावर सुनावणी चालू असताना शिंदे आणि फडणवीस सरकार पुढच्या तयारीला लागले आहे. मंत्रिमंडळासोबतच विभाग विस्तारावर देखील चर्चा झाल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे. भाजपकडे गृह, वित्त आणि महसूल अशी मोठी खाती तर शिवसेनेच्या शिंदे गटाकडे नगरविकास आणि रस्तेबांधकाम खाती दिली जाऊ शकतात. दीपक केसकर म्हणाले की, मंत्रिमंडळाबाबत सर्व काही निश्चित झाले आहे. या आठवड्यात केव्हाही नवीन मंत्र्यांचा शपथविधी होऊ शकतो.

भाजपकडून कुणाला संधी मिळू शकते?

 • चंद्रकांत पाटील 
 • सुधीर मुनगंटीवार 
 • गिरीश महाजन 
 • राधाकृष्ण विखे पाटील 
 • बबनराव लोणीकर 
 • प्रवीण दरेकर 
 • रविंद्र चव्हाण 
 • नितेश राणे 

शिंदे गटाकडून कुणाला संधी मिळू शकते?

 • गुलाबराव पाटील 
 • उदय सामंत
 • दादा भुसे 
 • शंभूराज देसाई 
 • अब्दुल सत्तार 
 • दीपक केसरकर 
 • संदीपान भुमरे 
 • संजय शिरसाट 
 • भारत गोगावले
 • अपक्षांपैकी बच्चू कडू किंवा रवि राणा यांना संधी मिळू शकते. यात बच्चू कडू यांचं पारडं जड आहे.

मंत्रिमंडळ विस्ताराला विलंब का?

मुख्यमंत्री शिंदे यांच्यासह त्यांच्या गटातील 16 आमदारांचे सदस्यत्व रद्द करण्याचे प्रकरण सध्या सर्वोच्च न्यायालयात आहे. यावर सातत्याने सुनावणी सुरू आहे. त्यामुळे मंत्रिमंडळ विस्तार आतापर्यत स्थगित करण्यात येत आहे. भाजप आणि शिंदे गटातील मंत्र्यांची संख्या तसेच खात्याबाबत आतापर्यंत बोलले जात नव्हते. शिंदे गटालाही केंद्रात भागीदारी हवी आहे. त्यामुळे हे प्रकरण रखडले होते.

शिंदेंची 35 दिवसांत 6 वेळा दिल्लीवारी

30 जून रोजी मुख्यमंत्री झाल्यापासून एकनाथ शिंदे यांनी 35 दिवसांत आतापर्यंत 6 वेळा दिल्लीला भेट दिली आहे. यादरम्यान त्यांनी निवडणूक आयोग आणि लोकसभा अध्यक्षांकडे जाऊन शिवसेनेवर दावा ठोकला. त्याचबरोबर मंत्रिमंडळ विस्तारासह अनेक मुद्द्यांवर भाजपने हायकमांडची भेट घेतली.
 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

Mumbai News (मुंबई बातम्या), Times now ची मराठी वेबसाइट -Times Now Marathi वर। सोबत आणखी Marathi News (मराठी बातम्या) अपडेटसाठी आम्हांला गूगल न्यूजवर फॉलो करा. 

पुढची बातमी