Maharashtra Weather Update : राज्यात 3 ते 4 दिवस कायम राहणार गारठा; काल मुंबईत सर्वाधिक थंडी

मुंबई
भरत जाधव
Updated Jan 24, 2022 | 11:54 IST

Weather Update: देशभरात सुरू असलेल्या थंडीचा परिणाम मुंबईतही दिसून येत आहे. अवकाळी पावसामुळे मुंबईच्या तापमानात मोठी घसरण झाली आहे. मुंबईतील अनेक भागात किमान तापमान 16 अंशांवर पोहोचले आहे.

The Cold will for Next 3 to 4 days in the state
मुंबईत काल रात्री सर्वाधिक थंडी; तापमान 16 अंशांवर  |  फोटो सौजन्य: Times Now
थोडं पण कामाचं
  • मुंबईत सहसा तितकीशी थंडी नसते मात्र अवकाळी पाऊस पडल्यामुळे तापमानात कमालीची घट झाली आहे.
  • महाबळेश्वर, दापोली, खेड आणि चिपळूणमध्ये मध्यरात्री पावसाच्या सरी बरसल्या.
  • मुंबईतील (Mumbai) अनेक भागात किमान तापमान (Temperature) 16 अंशांवर पोहोचले आहे.

Cold Weather :  राज्यभरात शनिवारी आणि रविवारी अवकाळी पावसाने (unseasonal rains) हजेरी लावली. मुंबईत झालेल्या अवकाळी पावसामुळे मुंबईच्या तापमानात मोठी घसरण झाली आहे. मुंबईतील (Mumbai) अनेक भागात किमान तापमान (Temperature) 16 अंशांवर पोहोचले आहे. येत्या 1 ते 2 दिवस मुंबईत थंडीचा (Cold) प्रभाव कायम राहणार असल्याचे हवामान तज्ज्ञांचे म्हणणे आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा मुंबईत थंडी जास्त आहे. मुंबईत सहसा तितकीशी थंडी नसते मात्र अवकाळी पाऊस पडल्यामुळे तापमानात कमालीची घट झाली आहे. राज्यात मागील 24 तासापासून पावसाचे वातावरण होते. अशातच वातावरणात गारवा देखील होता. त्यामुळे ही घट झाल्याचे तज्ज्ञांकडून सांगितले जात आहे. 

राज्यातील अनेक भागातील कमाल तापमानात मोठी घट बघायला मिळाली. मुंबईत 16 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे. तर, नाशिक, पुणे आणि औरंगाबादसारख्या शहरांमध्ये 25 अंशाखाली कमाल तापमान नोंदवल्या गेलं आहे. प्रामुख्याने धुळीच्या वादळाचा परिणाम देखील दिसून आला. पश्चिमी चक्रवातामुळे पुढील 3 ते 4 दिवस मुंबईसोबतच राज्यातील तापमानात घट होईल, असं भारतीय हवामान विभागाकडून सांगण्यात आले आहे. 

राज्यात विविध ठिकाणी मध्यरात्री पावसाच्या सरी, थंडीत वाढ

महाबळेश्वर, दापोली, खेड आणि चिपळूणमध्ये मध्यरात्री पावसाच्या सरी बरसल्या. त्यामुळे वातावरणातील गारवा आणखी वाढला आहे. पुणे (Pune) सह महाराष्ट्रात काही ठिकाणी 22 आणि 23 जानेवारीला पावसाची शक्यता वर्तवण्यात आली होती. त्याप्रमाणे मध्यरात्री राज्यातील काही भागात पावसाने हजेरी लावली. मुंबई, पुणे कोकण आणि मध्य महाराष्ट्रातील काही भागांमध्ये पावसाच्या तुरळक आणि हलक्या सरी कोसळल्या.

मुंबईत धुळीचे वादळ 

सौराष्ट्राकडून धूलिकण घेऊन आलेल्या वाऱ्यांमुळे रविवारी मुंबईतील अनेक भागांत हवेचा दर्जा धोकादायक पातळीवर पोहोचला. हवेत मोठ्या प्रमाणावर धूलिकण साचल्यामुळे दृश्यमानता कमी झाली होती. पाकिस्तानमधील धुळीच्या वादळाचा महाराष्ट्रातील वातावरणावर परिणाम दिसून येत आहे. काल सकाळपासून मुंबईतील आणि आसपासच्या शहरांमधील दृश्यमानता अतिशय कमी झाली आहे. तर हवेमध्ये धुळीचे कण मिसळल्याने त्यात काल आणि आज पाऊस पडल्याने अनेक गाड्यांवर आणि वस्तूंवर पांढरे डाग दिसून येत आहेत. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

Mumbai News (मुंबई बातम्या), Times now ची मराठी वेबसाइट -Times Now Marathi वर। सोबत आणखी Marathi News (मराठी बातम्या) अपडेटसाठी आम्हांला गूगल न्यूजवर फॉलो करा. 

पुढची बातमी