Nawab Malik: न्यायालयालाही जाणवलं मलिकांचं डी-गँगशी संबंध; नवाब मलिकांनी केली जाणूनबुजून मनी लाँड्रिंग

मुंबई
भरत जाधव
Updated May 21, 2022 | 10:12 IST

महाविकास आघाडी सरकारच्या (Mahavikas Aghadi sarkar) अडचणी वाढण्याची शक्यता आहे. कारण आर्थिक गैरव्यवहाराच्या आरोपांखाली तुरुंगात असलेले महाविकास आघाडीचे मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते (Minister and NCP leader) नवाब मलिक (Nawab Malik) यांना न्यायालयाने (Court) मोठा दणका दिलाय. विशेष न्यायालयाने (Special court)मलिकांविरुद्धच्या खटल्यावर सुनावणी करताना ईडीने सादर केलेल्या दोषारोपपत्राची दखल घेतली. नवाब मलिक हे जाणूनबुजून आणि थेट मनी लाँड्रिंगच्या गुन्ह्यात सहभागी असल्याचं निरीक्षण न्यायालयाने

Malik has 'links with D-Gang', court observes
'मलिकांचे डी-गँगशी संबंध' आहेत, कोर्टाचं निरीक्षण  |  फोटो सौजन्य: Times Now
थोडं पण कामाचं
  • डी- गँगशी संबंध ठेवूनच मलिकांनी गोवावाला कंपाऊंडची जागा मिळवली- न्यायालय
  • विशेष न्यायालयाने मलिकांविरुद्धच्या खटल्यावर सुनावणी करताना ईडीने सादर केलेल्या दोषारोपपत्राची दखल घेतली.
  • जाणीवपूर्वक सहभागी असल्याचे प्रथमदर्शनी पुराव्यांवरून सिद्ध

मुंबई:  महाविकास आघाडी सरकारच्या (Mahavikas Aghadi sarkar) अडचणी वाढण्याची शक्यता आहे. कारण आर्थिक गैरव्यवहाराच्या आरोपांखाली तुरुंगात असलेले महाविकास आघाडीचे मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते (Minister and NCP leader) नवाब मलिक (Nawab Malik) यांना न्यायालयाने (Court) मोठा दणका दिलाय. विशेष न्यायालयाने (Special court)मलिकांविरुद्धच्या खटल्यावर सुनावणी करताना ईडीने सादर केलेल्या दोषारोपपत्राची दखल घेतली. नवाब मलिक हे जाणूनबुजून आणि थेट मनी लाँड्रिंगच्या गुन्ह्यात सहभागी असल्याचं निरीक्षण न्यायालयाने नोंदवलं.

ईडीने दाखल केलेल्या दोषारोपपत्रानंतर न्यायालयाने हे निरीक्षण नोंदवलं आहे. नवाब मलिक हे हसीना पारकर, सलीम पटेल, सरदार शहावली खान यांच्या संपर्कात असल्याचीही माहिती आहे. तर डी-गँगशी संबंध ठेवूनच मलिकांनी गोवावाला कंपाऊंडची जागा मिळवली, असंही न्यायालयाने म्हटलं आहे. 
दोषारोपपत्राची दखल घेत विशेष न्यायालयाने नवाब मलिक आणि १९९३ च्या बॉम्बस्फोटातील दोषी आणि सरदार शाहवली खान यांच्याविरुद्धची कारवाई पुढे चालू ठेवण्याचे निर्देश दिले आहेत. ईडीने आपल्या चार्टशीटमध्ये नवाब मलिक आणि सरदार शाहवली खान यांना आरोपी बनवले असल्याची माहिती आहे. मालमत्तेचे सर्व कामकाज सरदार खानच्या माध्यमातून झाले होते. 

या प्रकरणाची सुनावणी करताना विशेष न्यायाधीश आर.एन.रोकडे म्हणाले, 'या प्रकरणाचा पाठपुरावा करण्यासाठी पुरेशी कारणे आहेत. या प्रकरणात नवाब मलिक यांनी जाणीवपूर्वक सहभागी असल्याचे प्रथमदर्शनी पुराव्यांवरून समोर आलं आहे'. दरम्यान २१ एप्रिल रोजी ईडीने मलिक यांच्याविरोधात दोषारोपपत्र दाखल केले होते. कुर्ल्यातील गोवावाला कंपाऊंड ताब्यात घेण्यासाठी नवाब मलिक आणि अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमची बहीण हसीना पारकर आणि त्यांचा अंगरक्षक सलीम पटेल यांच्यात अनेक बैठका झाल्याचंही पुढे आलं.

ईडीने चार्टशीटमध्ये 17 लोकांचे जबाब 

ईडीने आपल्या चार्टशीटमध्ये 17 जणांना साक्षीदार बनवले आहे. त्यात दाऊदचा भाऊ इक्बाल कासकर आणि हसीना पारकरचा मुलगा अलीशाह पारकर यांच्यासह सरदार शाहवली खान यांच्या जबाबांचाही समावेश आहे. हसीना पारकर दाऊद इब्राहिमच्या जवळची होती आणि सलीम पटेल पारकरचा अंगरक्षक होता, असे शाहवली खानने आपल्या वक्तव्यात सांगितले. 
 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

Mumbai News (मुंबई बातम्या), Times now ची मराठी वेबसाइट -Times Now Marathi वर। सोबत आणखी Marathi News (मराठी बातम्या) अपडेटसाठी आम्हांला गूगल न्यूजवर फॉलो करा. 

पुढची बातमी