मुंबई : आता राज्यात लोडशेडिंगचे (power loadshedding) संकट येऊन उभे ठाकले आहे. ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी स्पष्टपणे लोडशेंडिंगचे संकेत दिले आहेत. आता त्यापाठोपाठ मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (cm uddhav thackery) यांनीही 'वीज तुटवड्याची स्थिती देशभर आहे. हे संकट केवळ आपल्यावर नाही. ही परिस्थिती समजून घेऊन सर्वांनीच वीज बचत करायला हवी. वीजेची उधळपट्टी, होऊ नये यासाठी काळजी घ्यायला हवी' असा सल्ला दिला आहे.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत वर्षा येथील वीजनिर्मितीच्या नियोजनाबाबत आज उर्जा विभागाची बैठक झाली. बैठकीस उर्जामंत्री डॉ. नितीन राऊत आणि महावितरणचे मुख्य अधिकारी उपस्थितीत होते.
'वीज तुटवड्याची स्थिती देशभर आहे. हे संकट केवळ आपल्यावर नाही. ही परिस्थिती समजून घेऊन सर्वांनीच वीज बचत करायला हवी. वीजेची उधळपट्टी होऊ नये, यासाठी काळजी घ्यायला हवी याबाबत सर्वांना सतर्क करा. जागरूकता निर्माण करा, असे निर्देश मुख्यमंत्री ठाकरे यांनी दिले.
'याशिवाय महानिर्मितीने राज्यासाठी आवश्यक वीज उपलब्ध व्हावी यासाठी खासगी वीज कंपन्या तसेच अन्य पर्यायी मार्गांबाबतचे काटेकोर नियोजन करावे. खासगी वीज कंपन्यांना अतिरिक्त वीज निर्मिती करावी. त्यासाठीच्या लागणाऱ्या परवानग्यांसाठी केंद्राकडे पाठपुरावा करण्यात येईल. वीज बचतीबाबत ग्रामपंचायत, नगरपालिका ते महापालिकास्तरांपर्यंत जागरूकता निर्माण होण्यासाठी विशेष मोहिम राबविण्यात यावी, असे निर्देशही मुख्यमंत्र्यांनी दिले.
Mumbai News (मुंबई बातम्या), Times now ची मराठी वेबसाइट -Times Now Marathi वर। सोबत आणखी Marathi News (मराठी बातम्या) अपडेटसाठी आम्हांला गूगल न्यूजवर फॉलो करा.