Corona Virus : मुंबईः महाराष्ट्रात (Maharashtra) कोरोना रुग्णांच्या (Corona patient) संख्येत झपाट्याने वाढ होत आहे. दोन दिवसांत रुग्णांमध्ये दुप्पट वाढ झाली. त्यामुळे राज्यात आणखी कडक निर्बंध (Restrictions) लागू करण्याची शक्यता आरोग्यमंत्री राजेश टोपे (Health Minister Rajesh Tope) यांनी बुधवारी मुंबईत (Mumbai) प्रसारमाध्यमांशी (Media) बोलताना व्यक्त केली. याबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Chief Minister Uddhav Thackeray) यांच्यासोबत दोन दिवसांत चर्चा करण्यात येणार आहे. त्यानंतरच निर्णय घेतला जाईल, अशी माहिती त्यांनी यावेळी दिली.
राज्यातील करोना रुग्णसंख्या वाढत असून लोकांकडून नियमांचे पालन केले जात नसल्याने राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी चिंता व्यक्त केली आहे. आपल्याकडे जर सहजा-सहजी गोष्टी घेतल्या तर याची किमंत संख्यात्मक वाढ होऊन चुकवावी, लागेल असं सांगत राजेश टोपे यांनी निर्बंध अजून कडक केले जाऊ शकतात असा इशारा दिला आहे.लसीकरणातही आपण थोडे मागे असून ते योग्य नाही सांगत त्यांनी ही टक्केवारी वाढवण्यासाठी आवाहन केले आहे. 100 टक्के लसीकरणाचा निर्धार यावेळी त्यांनी व्यक्त केला.
लसीकरणाच्या बाबतीत लोक संकोच करत आहेत. अशात पहिला डोस न घेतलेल्या लोकांना त्यांच्या घरात जाऊन लस देण्यावर काम सुरू आहे. यासोबतच ज्यांनी पहिली लस घेतली पण दुसरी घेतलेली नाही. अशा लोकांना आम्ही एसएमएस आणि फोन करून लस घेण्याचे आवाहन करत आहोत. तरीही स्थानिक पातळीवर असलेल्या नेत्यांनी लोकांमध्ये लसीकरणाबाबत जागरुकता निर्माण करावी. महाराष्ट्रात दुसरे डोस घेणाऱ्यांची संख्या 57 टक्क्यांवर गेली आहे. देशाच्या तुलनेत ही सरासरी मागे असल्याने आपल्याला लसीकरणावर जास्ती जास्त भर द्यावे लागेल असे टोपे म्हणाले आहेत.
केंद्र सरकारने 15 वर्षांपुढील मुला-मुलींचे लसीकरण करण्याची घोषणा केली आहे. त्यानुसार, लवकरच आपण या वयोगटातील मुलांचे लसीकरण सुरू करणार आहोत. लसीकरण केंद्रावर मुले येत नसतील तर त्यांना शाळेत जाऊन लस देता येईल का यावर सुद्धा राज्य सरकारचे काम सुरू आहे अशी माहिती आरोग्य मंत्र्यांनी दिली. पुढे बोलताना टोपे म्हणाले, “मागील आठ दिवसात पाहिलं तर 20 डिसेंबरदरम्यान महाराष्ट्रात 5 ते 6 दरम्यान अॅक्टिव्ह रुग्ण होते, पण आता महाराष्ट्रात 11 हजार 492 रुग्ण असून काही दिवसात 20 हजारांपर्यंत हा आकडा जाऊ शकतो.
मुंबईची तुलना केली तर मुंबईत 300 च्या आसपास केसेस होत्या, आज 1300 केसेस आहेत. आज संध्याकाळी रिपोर्ट होतील त्यातून अंदाजे 2200 केसेस रिपोर्ट होतील. गेल्या सात दिवसात सात पटीने रुग्ण वाढले आहेत. दोन दिवसात डबलिंग होत आहे अशी परिस्थिती आहे,” अशी माहिती राजेश टोपे यांनी दिली.
राजेश टोपे म्हणाले की, राज्यात कोरोनाची वाढणारी रुग्णसंख्या हा धोक्याचा घंटा आहे. दोन दिवसांमध्ये रुग्णांची दुप्पट वाढ झाली आहे. त्यात मुंबईचा पॉझिटिव्हीची रेट हा चार टक्क्यांवर गेला आहे. ही परिस्थिती चिंता निर्माण करणारी आहे. त्यामुळे महाराष्ट्रात कडक निर्बंध येण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यासाठी दोन दिवसांत मुख्यमंत्र्यांसोबत चर्चा करू. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, टास्क फोर्स आणि मंत्रिमंडळ याबाबत निर्णय घेतील.
राजेश टोपे म्हणाले की, केंद्राची टीम सध्या महाराष्ट्राच्या दोन-तीन दिवसांच्या दौऱ्यावर आहे. ही टीम वाढलेले रुग्ण, त्यांचे प्रमाण, ओमायक्रॉनचे रुग्ण, लसीकरण, पहिला डोस आणि दुसरा डोस घेणाऱ्यांची संख्या या साऱ्यांचे अवलोकन करणार आहे. राज्यात 87 टक्के नागरिकांनी पहिला डोस घेतला आहे. दुसरा डोस घेतलेल्यांची संख्या ही 57 टक्के आहे. आतापर्यंत 8 कोटी नागरिकांचे लसीकरण झाले आहे. वाढती रुग्णसंख्या पाहता बोस्टर डोस देण्याबाबतही चर्चा सुरू आहे. मात्र, कोव्हॅक्सीन लस घेतलेल्या व्यक्तीला कोव्हॅक्सीनचाच बूस्टर डोस द्यायचा की आणखी कुठला, याचे मार्गदर्शन आयसीएमआरकडे मागितले आहे. ते ज्या सूचना देतील, त्यानुसार पालन केले जाईल.
राजेश टोपे पुढे म्हणाले की, हायरिस्क देशातून आलेल्यांची चाचणी करून त्यांची जिनोम सिक्वेन्सिंग करण्याची गरज आहे. केंद्र सरकारने आता नवीन घोषणा केली. 15 ते 18 वयोगटातील विद्यार्थ्यांना लस द्यायची आहे. आम्ही त्या दृष्टीने सज्ज आहोत. या संदर्भात मी विधानसभेत बोललो आहे. शाळेत कोरोना लसीकरण करता येईल का, याची चाचपणी सुरू आहे. कोमॉर्बिड आणि फ्रंटलाईन हेल्थ वर्कर्स यांना बूस्टर डोस देण्याचा निर्णय घेतलाय. मात्र, कोणती लस द्यायची यासंदर्भात आयसीएमआरने माहिती दिलेली नाही. बूस्टर डोसचे लसीकरण 10 जानेवारीपासून होणार असल्याचे ते म्हणाले.
Mumbai News (मुंबई बातम्या), Times now ची मराठी वेबसाइट -Times Now Marathi वर। सोबत आणखी Marathi News (मराठी बातम्या) अपडेटसाठी आम्हांला गूगल न्यूजवर फॉलो करा.