घराचं स्वप्न होणार पू्र्ण; नवी मुंबईत सिडकोच्या 5 हजार घरांची सोडत

मुंबई
भरत जाधव
Updated May 30, 2022 | 16:33 IST

नवी मुंबईत घर घेणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. गणेशोत्सवात (Ganpati Festival) सिडकोच्या (City and Industrial Development Corporation - CIDCO) पाच हजार घरांची योजना आहे. (CIDCO House) वाशी, जुईनगर, मानसरोवर इथे ही घरं उपलब्ध होणार आहेत. 

Leaving 5,000 CIDCO houses in Navi Mumbai
नवी मुंबईत सिडकोच्या 5 हजार घरांची सोडत  |  फोटो सौजन्य: Times Now
थोडं पण कामाचं
  • पंतप्रधान आवास योजनेत सर्वाधिक घरे सिडकोच्या माध्यमातून बांधली जात आहेत.
  • सध्या निर्मितीच्या प्रक्रियेत असलेल्या 35 हजार घरांना महारेराची मंजुरी मिळाली आहे.

नवी मुंबई :  नवी मुंबईत घर घेणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. गणेशोत्सवात (Ganpati Festival) सिडकोच्या (City and Industrial Development Corporation - CIDCO) पाच हजार घरांची योजना आहे. (CIDCO House) वाशी, जुईनगर, मानसरोवर इथे ही घरं उपलब्ध होणार आहेत. 

पंतप्रधान आवास योजनेत सर्वाधिक घरे सिडकोच्या माध्यमातून बांधली जात आहेत. यातल्या पहिल्या टप्प्यात 23 हजार 500 घरं बांधून झाली आहेत. त्याची वाटप प्रक्रिया पूर्ण झाली आहे. दुसऱ्या टप्प्यात 67 हजार घरं प्रस्तावित आहेत. या घरांचा आराखडा तयार करून कंत्राटदारही नेमले आहेत.

सध्या निर्मितीच्या प्रक्रियेत असलेल्या 35 हजार घरांना महारेराची मंजुरी मिळाली आहे. गणेशोत्सवाच्या मुहुर्तावर पाच हजार घरांची सोडत काढण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

Mumbai News (मुंबई बातम्या), Times now ची मराठी वेबसाइट -Times Now Marathi वर। सोबत आणखी Marathi News (मराठी बातम्या) अपडेटसाठी आम्हांला गूगल न्यूजवर फॉलो करा. 

पुढची बातमी