Viral Video : पोलिसाच्या अंगावर घातली कार, पहा व्हिडीओ

The driver drove the car over the police : पोलीस हवालदार गादेकर हे गाड्यांवर कारवाई करण्यासाठी उभे होते. एवढ्यात कोपरा सेक्टर १० कडून विरुद्ध दिशेनं येणाऱ्या एकार ह्युंदाई कंपनीच्या कारला गादेकर यांनी अडवलं. यावेळी कारचालकाने गाडी थांबवली नाही आणि थेट गादेकर यांच्या अंगावर घातली. यानंतर हवालदार गादेकर यांनी कारच्या बोनटवर उडी मारली.

The driver drove the car over the police
पोलिसाच्या अंगावर घातली कार, पहा व्हिडीओ   |  फोटो सौजन्य: BCCL
थोडं पण कामाचं
  • पोलिसाला चक्क एका कारचालकाने बोनटवरुन फरफटत नेले
  • कार चालकानं कार न थांबवता थेट वाहतूक पोलिसाच्या अंगावर कार घातली
  • पोलीस नाईक निवृती भोईर यांनी धाव घेत या गाडीचा पाठलाग केला

मुंबई : पोलिसाला चक्क एका कारचालकाने बोनटवरुन फरफटत नेले असल्याचा धक्कादायक प्रकार  समोर आला आहे. सदर घटना मुंबई येथील खारघर येथील वाहतूक शाखेच्या हद्दीतील आहे. सदर घटनेचा व्हिडीओ देखील मोठ्या प्रमाणात व्हायरल होताना दिसत आहे. सदर घटनेनंतर सोशल मिडिया वरती कारचालकाविरुद्ध संताप व्यक्त होताना दिसत आहे. कारचालकानं कोपरा ब्रीज येथे वाहतूक पोलिसाला कारच्या बोनटवरुन फरफटत नेले आहे.

अधिक वाचा  : पोलिसांनी जीवाची पर्वा न करता तरुणाचे पोलिसांनी वाचवले प्राण

कार चालकानं कार न थांबवता थेट वाहतूक पोलिसाच्या अंगावर कार घातली

मिळालेल्या माहितीनुसार, पोलीस हवालदार गादेकर हे गाड्यांवर कारवाई करण्यासाठी उभे होते. एवढ्यात कोपरा सेक्टर १० कडून विरुद्ध दिशेनं येणाऱ्या एकार ह्युंदाई कंपनीच्या कारला गादेकर यांनी अडवलं. यावेळी कारचालकाने गाडी थांबवली नाही आणि थेट गादेकर यांच्या अंगावर घातली. यानंतर हवालदार गादेकर यांनी कारच्या बोनटवर उडी मारली. यानंतर देखील कार चालक थांबला नाही. तर त्यानं वाहतूक पोलिसाला बोनटवरुन काही मीटर अंतरापर्यंत फरफटत नेलं. गादेकर हे कोपरा ब्रिज येथे विशेष कारवाई दरम्यान रस्त्याच्या विरुद्ध दिशेनं येणाऱ्या वाहनांवर कारवाई करण्यासाठी वाहतूक पोलीस हवालदार गादेकर यांना नियुक्त करण्यात आली होतं.

अधिक वाचा ; श्रीलंकेतील लोकांच्या भंयकर रागाचं नेमकं कारण घ्या समजून

पोलीस नाईक निवृती भोईर यांनी धाव घेत या गाडीचा पाठलाग केला

सदर थरारक प्रकार सुरु असताना पाठीमागून येणाऱ्या इनोव्हा कारमधील जानवी पाटील लाइफ लाईन हॉस्पिटल पनवेल यांनी घडलेल्या सर्व प्रकारची मोबाईल वरून शूटिंग केली व पुढील कारवाईसाठी खारघर पोलीस स्टेशन येथे घेऊन गेले. त्याचबरोबर, कोपरा ब्रीज येथे बाजूला कारवाई करत असलेले पोलीस नाईक निवृती भोईर यांनी धाव घेत या गाडीचा पाठलाग केला. यात एका इनोव्हा कार चालकाची मदत घेऊन अगदी फिल्मी स्टाइलनं बेदरकार कार चालकाचा पाठलाग करण्यात आला.

अधिक वाचा ; ही व्यक्तिमत्व चाचणी काही सेकंदात दाखवते की तुम्ही कसे आहात 

इनोव्हा कार बेदरकार कार चालकासमोर आडवी टाकून आरोपीला रोखण्यात आलं

बेदरकार चालकानं कार न थांबवता डिमार्टकडे जाणाऱ्या कोपरा ब्रीज ते स्वर्णा गंगा ज्वेलरी शॉप खारघर या ठिकाणापर्यंत गाडीच्या बोनेटवर टांगून वाहतूक पोलीस हवालदाराला फरफटत नेलं. इनोव्हा कार बेदरकार कार चालकासमोर आडवी टाकून आरोपीला रोखण्यात आलं.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

Mumbai News (मुंबई बातम्या), Times now ची मराठी वेबसाइट -Times Now Marathi वर। सोबत आणखी Marathi News (मराठी बातम्या) अपडेटसाठी आम्हांला गूगल न्यूजवर फॉलो करा. 

पुढची बातमी