Kamathipura Redevelopment : मुंबईतील कामाठीपुराचं बदलणार रुप: पुनर्विकासानंतर तीन महिन्यात कामाठीपुरा होणार Urban Village

मुंबई
भरत जाधव
Updated Mar 30, 2022 | 14:46 IST

बईतील (Mumbai) रेड लाइट (Red light) म्हणून प्रसिद्ध असलेल्या कामाठीपुराचं (Kamathipura) रुप बदलण्यात येणार आहे. अर्बन व्हिलेजमधून (Urban Village) शहरातील हा भागाचा पुनर्विकास (redevelopment) केला जाणार आहे. कामाठीपुराचे नवं रुप पाहण्यासाठी तुम्हाला अधिक दिवस वाट पाहण्याची सुद्धा गरज नाही. फक्त तीन महिन्यात कामाठीपुराला नवं रुप मिळणार असल्याचं गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड म्हणाले आहेत.

The look of Kamathipura in Mumbai will change
तीन महिन्यात मुंबईतील कामाठीपुराचं बदलणार रुप  |  फोटो सौजन्य: Times Now
थोडं पण कामाचं
  • अर्बन व्हिलेज: कामाठीपुरा टाउनशिप’ नावाचा प्रकल्प तीन महिन्यांत सुरू केला जाणार
  • या भागात 1961 पासून लोक राहत असून येथील सुमारे 8000 कुटुंबांना नवीन घर मिळणार
  • मुंबईतील गोरेगावमध्ये आमदारांना 300 फ्लॅट्स देण्याची घोषणा.

Kamathipura Urban Village : मुंबई : मुंबईतील (Mumbai) रेड लाइट (Red light) म्हणून प्रसिद्ध असलेल्या कामाठीपुराचं (Kamathipura) रुप बदलण्यात येणार आहे. अर्बन व्हिलेजमधून (Urban Village) शहरातील हा भागाचा पुनर्विकास (redevelopment) केला जाणार आहे. कामाठीपुराचे नवं रुप पाहण्यासाठी तुम्हाला अधिक दिवस वाट पाहण्याची सुद्धा गरज नाही. फक्त तीन महिन्यात कामाठीपुराला नवं रुप मिळणार असल्याचं गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड म्हणाले आहेत. कामाठीपुराच्या पुनर्विकासावर लक्ष केंद्रित करून ‘अर्बन व्हिलेज: कामाठीपुरा टाउनशिप’ (Urban Village: Kamathipura Township) नावाचा प्रकल्प तीन महिन्यांत सुरू केला जाणार आहे. साधरण 8 हजार 500 घरांची बांधणी केली जाणार असून प्रत्येकाला 500 चौ. फुटाचे घर दिलं जाणार आहे. 

अहवालानुसार, कामाठीपुरामध्ये 16 लेनसह 500 इमारती आहेत, ज्यात 3858 खोल्या आणि 778 दुकाने आहेत. आव्हाड म्हणाले, "या भागात 1961 पासून लोक राहत असून येथील सुमारे 8000 कुटुंबांना नवीन घर मिळणार आहेत. सध्याचे घर मालक व भाडेकरू, यांना नवीन घरे मिळतील. आम्हाला रहिवाशांची 100% संमती आहे आणि लवकरच काम सुरू होईल." दरम्यान, मुंबईतील गोरेगावमध्ये आमदारांना 300 फ्लॅट्स देण्याची घोषणाही महाराष्ट्र सरकारने केली आहे. केंद्रावर शेलक्या शब्दात टीका करत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले की, आमच्याकडे असलेले प्रकल्प आम्ही पूर्ण करत आहोत. धारावी पुनर्विकास प्रकल्प संथ गतीने सुरू आहे.“धारावीची जमीन रेल्वेची आहे.

आम्ही 800 कोटी रुपये दिले आहेत, परंतु अद्याप जमिनीचा ताबा मिळालेला नाही, असे ठाकरे म्हणाले. म्हाडाची संकल्पना तालुके आणि गावांमध्ये राबवण्यात येणार आहे. या अंतर्गत राज्यातील पहिला प्रकल्प अहमदनगरजवळील नेवासा येथे उभारण्यात येणार असल्याचे आव्हाड यांनी सांगितले. मुंबईतील मोडकळीस आलेल्या इमारतींचा पुनर्विकास, झोपडपट्ट्यांचा पुनर्विकास, म्हाडाच्या विविध वसाहतींमधील समस्याविषयी केल्या जाणाऱ्या दोन दिवसीय चर्चेला ते उत्तर देत होते.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

Mumbai News (मुंबई बातम्या), Times now ची मराठी वेबसाइट -Times Now Marathi वर। सोबत आणखी Marathi News (मराठी बातम्या) अपडेटसाठी आम्हांला गूगल न्यूजवर फॉलो करा. 

पुढची बातमी