Mhada House: म्हाडाच्या २१७ घरांसाठी तब्बल ५० हजार अर्ज

मुंबई
Updated Apr 23, 2019 | 09:53 IST | टाइम्स नाऊ मराठी

The Maharashtra Housing & Area Development Authority : म्हाडानं जाहीर केलेल्या लॉटरीला चांगला प्रतिसाद मिळत आहे. मुदत वाढ मिळल्यानं लोकांचा प्रतिसाद आणखीन वाढताना दिसतोय. कसा

The Maharashtra Housing & Area Development Authority
Mhada House: म्हाडाच्या २१७ घरांसाठी तब्बल ५० हजार अर्ज   |  फोटो सौजन्य: BCCL

The Maharashtra Housing & Area Development Authority (Mhada) lottery will be out after lok sabha election results: म्हाडाच्या मुंबई  मंडळानं जाहीर केलेल्या लॉटरीला चांगला प्रतिसाद मिळताना दिसत आहे.  म्हाडानं २१७ घरांसाठी ही लॉटरी जाहीर केली होती. त्यानंतर या घरांच्या लॉटरीस मुदतवाढ मिळल्यानं लोकांचा प्रतिसाद दिवसेंदिवस वाढत चालला आहे. आतापर्यंत या घरांच्या लॉटरीसाठी ४६ हजारांहून जास्त अर्ज दाखल करण्यात आले आहेत. २२ एप्रिलपर्यंत २६ हजार ६१७ जणंनी अनामत रक्कम देखील भरल्याचं समजतं आहे. 

दरम्यान या लॉटरीस २४ मे रोजीपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. त्या या घरांसाठी अर्जदारांची संख्या आणखीन वाढून लाखांच्या घरात जाण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.  तर या लॉटरीतील एका घरामागे १२२ अर्ज दाखल झाले आहेत. अर्ज सादर करण्यासाठी अजूनही एक महिना शिल्लक आहे. त्यामुळे अर्ज भरण्याच्या संख्येत वाढ होत चालली आहे. 

म्हाडानं चेंबूर, पवईतील २१७ घरांसाठी लॉटरी जाहीर केली. मात्र लोकसभा निवडणुकीचा निकाल २३ मे रोजी लागणार आहे. त्यामुळे २३ एप्रिलची सोडत आता २ जूनला जाहीर होणार आहे. त्यात लॉटरीसाठी अर्ज करण्याच्या मुदतीतही जवळपास १ महिनाचा कालावधी वाढला आहे.  याआधी १३ एप्रिल ही शेवटची तारीख होती मात्र आता १३ एप्रिलवरून २४ मे रोजीपर्यंत लोकांना अर्ज सादर करता येतील. 

या घरांच्या लॉटरीसाठी सोमवारी संध्याकाळपर्यंत १ लाख ७३ हजार ९३७ जणांनी नोंदणी केली आहे. तर ४६ हजार ७१ जणांनी अर्ज दाखल केल्याची माहिती समोर आली आहे. यातल्या २४ हजार ७७६ जणांनी ऑनलाइन अर्ज दाखल केलेत. १ हजार ८४१ जणांनी आरटीजीएस/ एनईएफटीद्वारे अर्ज सादर केले. आतापर्यंत २६ हजार ६१७ जणांनी अनामत रकमेसह ऑनलाइन अर्ज भरले असून उर्वरित १९ हजार ४५४ जणांनी अनामत रक्कम भरलेली नाही आहे. दरम्यान २ जूनला लॉटरी लागल्यानंतर जे अर्जदार अयशस्वी ठरतील त्यांनी १० दिवसांत अनामत रक्कम परत दिली जाणार असल्याचं म्हाडातर्फे सांगण्यात आलं आहे. 

या लॉटरीमध्ये अल्प उत्पन्न गट आणि मध्यम उत्पन्न गटासाठी ही घरे आहेत. अल्प उत्पन्न गटासाठी भरावयाची रक्कम २०, ३३६ रुपये इतकी आहे. यापैकी ३३६ इतकी रक्कम विनापरतावा आहे. तर मध्यम उत्पन्न गटासाठी अर्जासोबत भरावयाची रक्कम ३०,३३६ रुपये इतकी आहे. 

अल्प उत्पन्न गटासाठी अर्जदाराचे उत्पन्न २५ हजार ते ५० हजारांच्या दरम्यान असावे. तर मध्यम उत्पन्न गटासाठी अर्जदाराचे उत्पन्न ५० हजार ते ७५ हजार रुपये इतके असावे. सोडतीसाठी पात्र असलेल्या अर्जदारांची अंतिम यादी म्हाडाच्या https://lottery.mhada.gov.in या वेबसाईटवर २ जूनला जाहीर करण्यात येईल.  

७ मार्चपासून लॉटरीसाठी अर्ज भरण्याच्या प्रक्रियेला सुरूवात झाली होती. याआधी १३ एप्रिलपर्यंत अर्ज भरता येणार होते तर २१ एप्रिलला लॉटरी निघणारा होती. मात्र निवडणूक आयोगाच्या आदेशानुसार लॉटरी २ जुनला निघेल. दुसरीकडे म्हाडानं बांद्रा कुर्ला कॉम्प्लेक्स (बीकेसी) या भागात  उच्चवर्गीयांसाठी घर बांधणी करण्याचा निर्णय घेतला आहे. जवळपास १४०० चौ. फुटांच्या घरांचं दोन टॉवर्स  बांधण्याचं काम येत्या जुनपूर्वीच सुरू होणार आहे. बीकेसीतील मोठ्या जागेवर म्हाडानं या प्रकल्पासाठीचा आराखडा मंजूर केला आहे.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

लोकप्रिय वीडियो
पुढची बातमी
Mhada House: म्हाडाच्या २१७ घरांसाठी तब्बल ५० हजार अर्ज Description: The Maharashtra Housing & Area Development Authority : म्हाडानं जाहीर केलेल्या लॉटरीला चांगला प्रतिसाद मिळत आहे. मुदत वाढ मिळल्यानं लोकांचा प्रतिसाद आणखीन वाढताना दिसतोय. कसा
Loading...
Loading...
Loading...