राज्यात कोरोना व्हायरसच्या रुग्णांचा आकडा वाढला, पाहा किती झाली संख्या

मुंबई
Updated Mar 20, 2020 | 14:38 IST

राज्यात कोरोना बाधितांची संख्या आणखी वाढली आहे. कारण की, आणखी तीन रुग्ण पॉझिटिव्ह असल्याची माहिती आरोग्यमंत्र्यांनी दिली आहे.

the number of coronavirus patients has increased in the state see how many
राज्यात कोरोना व्हायरसच्या रुग्णांचा आकडा वाढला, पाहा किती झाली संख्या  |  फोटो सौजन्य: Times Now

मुंबई: राज्यात कोरोना बाधितांची संख्या ही सातत्याने वाढत आहे. आज (शुक्रवार) राज्यात आणखी तीन नवे रुग्ण आढळून आले आहेत. या तीनही रुग्णांचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. त्यामुळे आता राज्यात एकूण ५२ कोरोनाबाधित रुग्ण झाले आहे. त्यामुळे राज्यातील आरोग्य प्रशासनासमोरचे प्रश्न आणखी वाढले आहेत. 

आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी आज सकाळी पत्रकारांशी संवाद साधला त्यावेळी त्यांनी अशी माहिती दिली की, आज सकाळी तीन नवे रुग्ण आढळून आले आहेत. मुंबई, पुणे आणि पिंपरी येथे प्रत्येकी एक नवा रुग्ण आढळून आला आहे. 

'राज्यात आज ३ कोरोना बाधित रुग्णाची नोंद झाली आहे. यामुळे राज्यातील एकूण रुग्णांची संख्या ५२ झाली आहे.  कोरोना पार्श्वभूमीवर आता आपण ६ लॅब मध्ये टेस्ट करत आहोत येणाऱ्या दिवसात ही संख्या १२ होईल.' अशी माहिती राजेश टोपे यांनी दिली आहे.  

देशात कोरोना बाधितांची संख्या २०५ वर 

देशात कोरोना-संक्रमित लोकांची संख्या २०५ वर पोहोचली आहे. त्यापैकी १७९ लोक रुग्णालयात दाखल आहेत. तर २० जण बरे झाले आहेत. तर चार लोकांचा मृत्यू झाला आहे. कोरोनाशी लढण्यासाठी सरकारकडून अनेक प्रयत्न सध्या सुरु आहेत.

दरम्यान, राज्यातील कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे मोठा निर्णय घेण्याची शक्यता आहे. मुख्यमंत्री फेसबुक लाइव्हवरुन थोड्याच वेळात आपल्या निर्णयाची घोषणा करणार आहे. यावेळी मुंबईतील सार्वजनिक वाहतूक व्यवस्था बंद करण्याचा निर्णय सरकार घेऊ शकतं असा अंदाज व्यक्त केला जात आहे.

कोरोना व्हायरसचा संसर्ग कमी व्हावा यासाठी सरकारकडून सतत प्रयत्न सुरु आहेत. मात्र, अद्यापही अनेक ठिकाणी गर्दी दिसून येत आहे. त्यामुळे आता ठाकरे कठोर निर्णय घेण्याची शक्यता आहे. ज्यामुळे कोरोना संसर्ग आटोक्यात येण्यास मदत होईल. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी
loadingLoading...
loadingLoading...
loadingLoading...