Crime Serial Molester Arrest : विकृताने पाचवेळा काढली महिला अन् मुलींची छेडछाड, शेवटीची शिकार होती सात वर्षाची मुलगी

मुंबई
भरत जाधव
Updated Apr 28, 2022 | 11:26 IST

 घाटकोपर पोलिसांनी (Ghatkopar police) 24 तासाच्या आता एका सिरीयल मोलेस्टरला (Serial Molester) अटक केली आहे. एका सात वर्षाच्या मुलींच अपहरण करुन तिच्यावर अत्याचार केल्या प्रकरणी तक्रार दाखल झाल्यानंतर पोलिसांनी (police) अवघ्या 24 तासात या विकृत आरोपीच्या मुसक्या आवळल्या आहेत.

Accused arrested for torturing seven-year-old girl
वडापाव घेणाऱ्या सात वर्षाच्या मुलीवर अत्याचार, आरोपी अटकेत   |  फोटो सौजन्य: Times Now
थोडं पण कामाचं
  • दुकानात गेली वडापाव आणायला गेलेल्या 7 वर्षांच्या मुलीला अडकवलं जाळ्यात
  • सिरीयल मोलेस्टरला मुंबईत अटक

मुंबई :  घाटकोपर पोलिसांनी (Ghatkopar police) 24 तासाच्या आता एका सिरीयल मोलेस्टरला (Serial Molester) अटक केली आहे. एका सात वर्षाच्या मुलींच अपहरण करुन तिच्यावर अत्याचार केल्या प्रकरणी तक्रार दाखल झाल्यानंतर पोलिसांनी (police) अवघ्या 24 तासात या विकृत आरोपीच्या मुसक्या आवळल्या आहेत. या विकृताने तब्बल पाच वेळा महिला आणि लहान मुलींवर छेडछाड, अत्याचार केला आहे. घाटकोपर पोलिसांनी (ghatkopar police) 24 तासांच्या आत आरोपीच्या मुसक्या आवळल्या असून या आरोपीचे नाव सचिन अनंत शामा (वय 35) आहे. 

अशी घडली घटना 

हाती आलेल्या माहितीनुसार, घाटकोपरच्या आनंद नगर विभागात पीडित सात वर्षीय मुलगी वडापावच्या दुकानात आली होती. यानंतर या आरोपीने तिच्यासोबत गोडगोड बोलायला सुरुवात केली आणि तो घाटकोपरच्या वडापावच्या दुकानापासून तब्बल एक ते दीड किलोमीटर दाट झाडी असलेल्या निर्मनुष्य ठिकाणी त्या मुलीला घेऊन गेला. तिथे त्याने या सात वर्षीय चिमुरडीवर अत्याचार केले आणि तेथून पळ काढला. या घटनेनंतर तिथून जाणाऱ्या नागरिकांनी मुलीला पाहिलं आणि पोलिसांना तसेच तिच्या नातेवाईकांना कळवले.

Read Also : पुलवामामध्ये २ दहशतवादी ठार, वाचा सविस्तर

पोलिसांनी लगेचच मुलीला वैद्यकीय उपचारासाठी रुग्णालयात दाखल केलं. पोलिसांनी आरोपी विरुद्धात बाललैंगिक अत्याचार प्रतिबंधक गुन्हा नोंदविला आहे. या प्रकरणाचा तपास करण्यासाठी पोलिसांनी आठ पथकं तयार करून विभागातील सर्व सीसीटीव्ही फुटेज तपासले. यात पोलिसांना आरोपीचा फोटो मिळाला. पोलिसांनी तात्काळ भिवंडी येथे सापळा रचून त्याला 24 तासांच्या आत अटक केली.

Read Also : पीएमसोबतच्या बैठकीदरम्यान सीएम केजरीवाल यांना आला कंटाळा

सीरियल मोलेस्टर आहे आरोपी 

सचिन शामा हा घाटकोपर, साकीनाका, पार्कसाईट पोलीस ठाण्यात पाच अशाच प्रकारच्या गुन्ह्यात आरोपी असल्याची धक्कादायक माहितीही समोर आली आहे. आरोपी अशाच गुन्ह्यांमध्ये कोठडीत असून कोरोना काळात कोठडीतून बाहेर आल्याचे पोलिसांना समजले. याप्रकरणी घाटकोपर पोलीस पुढील तपास करीत असल्याची माहिती परिमंडळ सातचे उपायुक्त प्रशांत कदम यांनी दिली आहे.


 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

Mumbai News (मुंबई बातम्या), Times now ची मराठी वेबसाइट -Times Now Marathi वर। सोबत आणखी Marathi News (मराठी बातम्या) अपडेटसाठी आम्हांला गूगल न्यूजवर फॉलो करा. 

पुढची बातमी