FIR against Raut: पोलिसांनी स्वप्ना पाटकरकडून मागवला खरा मूळ ऑडिओ, संजय राऊतांनी दिली होती खून आणि बलात्काराची धमकी

मुंबई
भरत जाधव
Updated Aug 02, 2022 | 14:26 IST

संजय राऊत (Sanjay Raut) यांनी पाटकर यांना ईडीसमोर (Enforcement Directorate)) साक्ष न देण्याची धमकी दिल्या आरोप आहे. धमकी देणारा ऑडिओ (audio) सोशल मीडियावर (social media) व्हायरल झाला आहे. यानंतर पाटकर यांनी पोलिसांत तक्रार दाखल केली. याप्रकरणी पोलिसांना मूळ ऑडिओची कलिना येथील फॉरेन्सिक सायन्स लॅबमध्ये (Forensic Science Lab) चाचणी करून घ्यायची आहे.

The police Ask the original audio from Complainant Swapna Patkar
होणार दूध का दूध और पानी का पानी; पोलिसांनी मागवला मूळ ऑडिओ  |  फोटो सौजन्य: Times Now
थोडं पण कामाचं
  • स्वप्ना पाटकर यांनी राऊत यांच्याविरोधात ईडीमध्ये तक्रार दाखल केली आहे.
  • पोलिसांना मूळ ऑडिओची कलिना येथील फॉरेन्सिक सायन्स लॅबमध्ये चाचणी करून घ्यायची आहे.
  • तक्रारदाराने पेन ड्राईव्हमधील ऑडिओ क्लिप पोलिसांना दिली होती. हा ऑडिओ 2016मध्ये रिकॉर्ड करण्यात आला होता.

मुंबई :  ईडीने (ED) अटक केलेल्या शिवसेनेचे (Shiv Sena) संजय राऊत (Sanjay Raut) यांच्याविरोधात मुंबई पोलिसांनी (Mumbai Police) नोंदवलेल्या धमकीच्या प्रकरणात तक्रारदाराकडून (Complainant) मूळ ऑडिओ टेप (Audio tape) मागवण्यात आला आहे. स्वप्ना पाटकर (Swapna Patkar) यांनी राऊत यांच्याविरोधात ईडीमध्ये तक्रार दाखल केली आहे. यानंतर स्वप्नाला फोनवरून जीवे मारण्याची आणि बलात्काराची धमकी देण्यात आली. हा मूळ ऑडिओ खरा निघाला तर शिवसेनेची बुलंद तोफ जी केंद्राला आव्हान देण्यास मागे पुढे पाहत नव्हती ती तोफ निकामी होण्याची शक्यता आहे. 

दरम्यान, संजय राऊत यांनी पाटकर यांना ईडीसमोर साक्ष न देण्याची धमकी दिल्याचा आरोप आहे. या दोघांची फोनवरील संभाषणाची ऑडिओ क्लिप  सोशल मीडियावर व्हायरल झाली आहे. यानंतर पाटकर यांनी पोलिसांत तक्रार दाखल केली. याप्रकरणी रविवारी एफआयआर दाखल करण्यात आली असून पोलिसांना पाटकर यांना फोन करणाऱ्याची ओळख पटवायची आहे, त्यामुळे मूळ ऑडिओची क्लिप मागवण्यात आली असून कलिना येथील फॉरेन्सिक सायन्स लॅबमध्ये चाचणी केली जाणार आहे.

2016 च्या ऑडिओमध्ये एक व्यक्ती देतोय धमकी 

नुकतीच एक ऑडिओ क्लिप सोशल मीडियावर व्हायरल झाली आहे, ज्यामध्ये एक पुरुष एका महिलेला अपमानास्पद भाषेत धमकावत असल्याचं आपल्याला ऐकू येत आहे. मुंबई पोलिसांच्या एका अधिकाऱ्याने सांगितले की, तक्रारदाराने पेन ड्राईव्हमधील ऑडिओ क्लिप पोलिसांना दिली होती. पण आम्हाला मूळ व्हिडिओ हवा आहे. जो व्हिडिओ 2016 मध्ये रेकॉर्ड करण्यात आला होता. पोलिस अधिकाऱ्याने सांगितले की, तक्रारदाराने पेन ड्राईव्हमधील ऑडिओ क्लिप पोलिसांना दिली होती, मात्र आम्हाला मूळ ऑडिओ हवा आहे.  मूळ रेकॉर्डिंग सापडल्यानंतर, कॉलरची ओळख पटविण्यासाठी आम्ही फॉरेन्सिक सायन्स प्रयोगशाळेची मदत घेऊ.

Read Also : Voter ID आणि Aadhaar Card होणार लिंक; कशी कराल नोंदणी?

पाटकर यांची सुरक्षा वाढविण्यात आली आहे 

पोलिसांनी राऊत विरुद्धच्या एफआयआरमध्ये भारतीय दंड संहितेच्या कलम 504 (शांतता भंग करण्याच्या हेतूने अपमान), 506 (गुन्हेगारी धमकीसाठी शिक्षा) आणि 509 (महिलाचा अपमान) या कलमांचा वापर केला गेला आहे. स्वप्ना पाटकर यांनी रविवारी पोलिसांत जबाब नोंदवला. पाटकर यांच्या विनंतीवरून त्यांना सुरक्षा पुरवण्यात आली आहे. टाईप केलेल्या पत्रात आपल्याला बलात्कार आणि खुनाची धमकी देण्यात आल्याचे पाटकर यांनी पोलिसांना सांगितले होते. हे पत्र 15 जुलै रोजी त्यांच्या घरी आलेल्या वर्तमानपत्रात टाकण्यात आले होते.

Read Also : मृत्यूनंतर मृतदेहाला एकटं का सोडलं जात नाही?

मुंबईत आज पुन्हा छापा

दरम्यान, ईडीने आज पुन्हा मुंबईत दोन वेगवेगळ्या ठिकाणी छापे टाकले. यापूर्वी रविवारी ईडीने राऊत आणि इतरांच्या ठिकाणांची तपासणी केली होती. ईडीने रविवारी रात्री राऊतला अटक करून सोमवारी कोर्टात हजर केले. न्यायालयाने त्याला ४ ऑगस्टपर्यंत ईडी कोठडी सुनावली आहे. हे प्रकरण मुंबईतील पत्रा चाळ घोटाळ्याशी संबंधित आहे.

 ईडीने संजय राऊतांना केली अटक

उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचे राज्यसभा खासदार संजय राऊत यांना ईडीने अटक केली. संजय राऊत यांना बेहिशेबी पैशांच्या प्रकरणात अटक करण्यात आली. याआधी त्यांची दीर्घ काळ पत्राचाळ घोटाळा प्रकरणी चौकशी झाली. 2007 साली पत्रा चाळ जमीन घोटाळ्याची सुरूवात झाली. प्रवीण राऊत, गुरूष आशिष कन्स्ट्रक्शन कंपनी यांनी म्हाडासोबत हा जमीन घोटाळा केला आहे. म्हाडाने पत्रा चाळीच्या पुर्नविकासाचे कंत्राट गुरू आशिष कन्स्ट्रक्शन कंपनीकडे दिले होते. यात 1 हजार 34 कोटी रुपयांचा घोटाळा झाला असे सांगण्यात येत आहे.

Read Also : नॅशनल हेराल्डच्या कार्यालयावर ED चा छापा

संजय राऊत यांचे मित्र प्रवीण राऊत हे या प्रकरणी आरोपी आहेत. या कन्सट्रक्शन कंपनीने चाळीच्या लोकांना धोका दिल्याचा आरोप केला जात आहे. गुरू कन्स्ट्रक्शन कंपनी प्रवीण राऊत यांची असून पत्रा चाळीत ३ हजार फ्लॅट बनवण्याचे कंत्राट त्यांच्या कंपनीला मिळाले होते. त्यापैकी 672 फ्लॅट हे चाळीच्या रहिवाशांना मिळणार होते. परंतु पत्रा चाळीची जमीन एका खासगी बिल्डरला विकण्यात आल्याचा आरोप करण्यात आला आहे. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

Mumbai News (मुंबई बातम्या), Times now ची मराठी वेबसाइट -Times Now Marathi वर। सोबत आणखी Marathi News (मराठी बातम्या) अपडेटसाठी आम्हांला गूगल न्यूजवर फॉलो करा. 

पुढची बातमी