Kranti Redkar's letter to the Chief Minister : शिवाजी महाराजांच्या राज्यातच महिलेच्या अब्रूची लख्तर चार चौघात उधळली जातेय, क्रांती रेडेकरचं मुख्यमंत्र्यांना पत्र

मुंबई
भरत जाधव
Updated Oct 28, 2021 | 13:24 IST

Kranti Redkar's Letter to the Chief Minister: आर्यन खान ड्रग्स प्रकरणात (Aryan Khan Drugs Case) एनसीबी विभागीय संचालक(NCB Divisional Director)  समीर वानखेडे (Sameer Wankhede) सध्या वादाच्या भोवऱ्यात सापडले आहेत.

Kranti Redkar's letter to the Chief Minister
मराठी मुलगी म्हणून न्याय करा, मुख्यमंत्र्यांना रेडकरचं पत्र  |  फोटो सौजन्य: Twitter
थोडं पण कामाचं
  • समीर वानखेडे यांच्या पत्नी क्रांती रेडकर यांनी उद्धव ठाकरेंना पत्र लिहिले
  • छत्रपती शिवाजी महाराज आणि बाळासाहेब ठाकरे यांच्या आदर्शावर चालत आहे. - रेडकर
  • शिवरायांच्या राज्यात एका स्त्रीच्या गरिमेचा खेळ करुन ठेवला आहे - क्रांती रेडकर

Kranti Redkar's Letter to the Chief Minister: मुंबई : आर्यन खान ड्रग्स प्रकरणात (Aryan Khan Drugs Case) एनसीबी विभागीय संचालक(NCB Divisional Director)  समीर वानखेडे (Sameer Wankhede) सध्या वादाच्या भोवऱ्यात सापडले आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते (NCP spokesperson) नवाब मलिक (Nawab Malik) यांनी समीर आणि त्यांच्या कुटुंबावर विविध आरोप केले आहेत. आता समीर वानखेडे यांची पत्नी अभिनेत्री क्रांती रेडेकर (Actress Kranti Redkar) यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Chief Minister Uddhav Thackeray) यांना पत्र लिहिले आहे. या पत्रात त्यांनी न्यायाची मागणी केली आहे. जर बाळासाहेब ठाकरे (Balasaheb Thackeray) आज जिंवत राहिले असते तर महाराष्ट्रात (Maharashtra) हे होत आहे ते झालं नसतं, असेही त्यांनी या पत्रात म्हटलं आहे. 

“एक मराठी माणूस म्हणून आज मी तुमच्याकडे न्यायाच्या अपेक्षेने पाहतेय, तुम्ही योग्य तो न्याय करा,” अशी विनंती क्रांतीने उद्धव ठाकरेंना पत्राद्वारे केली आहे.क्रांती रेडेकर यांनी ट्विटमध्ये लिहिले की, मी लहानपणापासून शिवसेनेला मराठी माणसाच्या हक्कासाठी लढताना पाहिले आहे. हे सगळं बघतच मी मोठी झाले. मी पण एक मराठी मुलगी आहे. छत्रपती शिवाजी महाराज आणि बाळासाहेब ठाकरे यांच्या आदर्शावर चालत मी मोठी झाली आहे. कोणावरही अन्याय करू नका आणि अन्याय सहन करू नका, हेच मी शिकले आहे.  काही बदमाश माझ्या वैयक्तिक आयुष्यावर हल्ला करत आहेत आणि मी एकटाच लढत असल्याचं त्या पत्रात म्हणाल्या आहेत. 

मी कलाकार आहे, राजकारण कळत नाही

क्रांती रेडकर यांनीही या ट्विटमध्ये लिहिले आहे की, मी एक कलाकार आहे, मला राजकारण कळत नाही आणि मला त्यात पडायचे सुद्धा नाही. आमचा काहीही संबंध नसताना रोज सकाळी आमच्या अब्रूची लख्तर चार चौघात उधळली जात आहेत. शिवरायांच्या राज्यात एका स्त्रीच्या गरिमेचा खेळ करुन ठेवला आहे….विनोद करुन ठेवला आहे. आज बाळासाहेब असते तर त्यांनी महिलेवरील असे अत्याचार सहन केले नसते. मला तुमच्यातही त्यांची प्रतिमा दिसते आणि तुम्ही आमच्याशी न्याय कराल याची मला खात्री आहे.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

Mumbai News (मुंबई बातम्या), Times now ची मराठी वेबसाइट -Times Now Marathi वर। सोबत आणखी Marathi News (मराठी बातम्या) अपडेटसाठी आम्हांला गूगल न्यूजवर फॉलो करा. 

पुढची बातमी