उद्धव ठाकरेंच्या राजीनाम्यामुळे रिक्त झालेल्या जागेवर शिंदे गटाचा उमेदवार ठरला?

The Shinde group's candidate has been decided on the seat resigned by Thackeray : रामदास कदम हे शिवसेनेचे जेष्ठ नेते आहेत. त्यांनी फडणवीस आणि ठाकरे सरकारच्या काळात पर्यावरण मंत्रालयाची धुरा सांभाळली होती. कदम हे चार वेळा विधानसभेवर निवडून गेले होते, तर दोन वेळा परिषदेवर आमदार राहिले आहेत. मात्र, गेल्या वेळी रामदास कदम यांना विधानसभेचे तिकीट दिले गेले नव्हते. त्यामुळे ते काहीसे नाराज होते.

The Shinde group's candidate has been decided on the seat resigned by Thackeray
ठाकरेंनी राजीनामा दिलेल्या जागेवर शिंदे गटाचा उमेदवार ठरला?  |  फोटो सौजन्य: BCCL
थोडं पण कामाचं
  • रामदास कदम यांचं नाव विधानपरिषदेसाठी चर्चेत
  • उद्धव ठाकरे यांनी दिला होता विधानपरिषदेच्या जागेचा राजीनामा
  • ठाकरेंनी सरकार कोसळल्यानंतर मुख्यमंत्री आणि विधान परिषद सदस्य पदाचा राजीनाम दिला होता

मुंबई : सरकार कोसळणार असल्याची चिन्हे दिसू लागल्यानंतर उध्दव ठाकरे यांनी आपल्या मुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिला होता. उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री पदाचा राजीनामा देत त्यांनी आपल्या विधानपरिषद सदस्यत्वाचा देखील राजीमाना दिला होता. ठाकरे यांनी दिलेल्या विधानपरिषद सदस्यत्वाच्या राजीनाम्यामुळे ती जागा सध्या रिक्त आहे. त्यामुळे, या रिक्त जागेसाठी आता रस्सीखेच सुरु झाल्याचं पहायला मिळत आहे. दरम्यान, ही जागा आता आपल्या ताब्यात यावी यासाठी शिंदे गट प्रयत्न करू लागले आहे. दरम्यान, आय जागेसाठी शिंदे गटाकडून उमेदवार देखील निश्चित करण्यात आला असल्याची माहिती सुत्रांकडून मिळाली आहे. उद्धव ठाकरेंनी शिवसेनेतून हकालपट्टी केलेले माजी मंत्री रामदास कदम (Ramdas Kadam) यांचं नाव या जागेसाठी निश्चित केलं जात असल्याची माहिती मिळाली आहे.

अधिक वाचा ; पार्थ चॅटर्जींच्या घरावर चोरांचा डल्ला, शेजाऱ्यांना वाटली ED

शिंदे गटात आणि भाजपात चढाओढ होण्याची शक्यता?

दरम्यान, ठाकरे यांनी विधानपरिषद सदस्यत्वाच्या राजीनाम्यामुळेरिक्त झालेल्या जागेवर आता शिंदे गटासोबत भाजप देखील दावा करू शकते अशी शक्यता वर्तवली जाऊ लागली आहे. त्यामुळे सदर रिक्त नेमकं कोणाच्या पारड्यात पडणार याची उत्सुकता अनेकांना लागली आहे. त्याचबरोबर विधानपरिषदेवरील राज्यपाल नियुक्त १२ जागा देखील रिक्त असून, आता आणखी एक जागा सध्या रिक्त आहे. त्यामुळे या १३ जगावरील निवडणूक एकाच वेळेस होणार अशी देखील माहिती आहे.

अधिक वाचा ; मलायकाच्या ट्रांसपॅरेंट गाऊनचा नेक पाहून तुम्हाला फुटेल घाम

२०१९ च्या झालेल्या निवडणुकीत रामदास कदमांना नाकारण्यात आले होते तिकीट

रामदास कदम हे शिवसेनेचे जेष्ठ नेते आहेत. त्यांनी फडणवीस आणि ठाकरे सरकारच्या काळात पर्यावरण मंत्रालयाची धुरा सांभाळली होती. कदम हे चार वेळा विधानसभेवर निवडून गेले होते, तर दोन वेळा परिषदेवर आमदार राहिले आहेत. मात्र, गेल्या वेळी रामदास कदम यांना विधानसभेचे तिकीट दिले गेले नव्हते. त्यामुळे ते काहीसे नाराज होते. त्यामुळे, ते वेळेची वाट पाहत होता आणि अखेर एकनाथ शिंदें यांनी केलेल्या बंडानंतर त्यांनी शिंदे गटात सामील होण्याचा निर्णय घेतला आहे.

अधिक वाचा ; गिरीश महाजनांनी केली तक्रार, एकनाथ खडसेंची वाढली डोकेदुखी 

उद्धव ठाकरे यांनी फेसबुक लाईव्हद्वारे रात्री साडेनऊ वाजता राजीनाम्याची घोषणा केली होती

दरम्यान, एकनाथ शिंदे यांनी आपल्यासोबत अनेक आमदार घेऊन जात शिवसेनेसोबत बंडखोरी केली. त्यामुळे ठाकरे सरकार पडणार याची शक्यता उद्धव ठाकरेयांना होती त्यामुळे ठाकरे यांनी फेसबुक लाईव्हद्वारे २९ जून २०२२ रोजी रात्री साडेनऊ वाजता मुख्यमंत्रिपद आणि विधानपरिषद आमदारकीचा राजीनामा दिला होता. त्यानंतर रात्री साडेअकरा वाजता त्यांनी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भेट घेऊन राजीनामा सुपूर्द केला होता.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

Mumbai News (मुंबई बातम्या), Times now ची मराठी वेबसाइट -Times Now Marathi वर। सोबत आणखी Marathi News (मराठी बातम्या) अपडेटसाठी आम्हांला गूगल न्यूजवर फॉलो करा. 

पुढची बातमी