Ashish Shelar on Nawab malik : मंत्री नवाब मलिक आणि त्यांनी आरोप केलेल्या यंत्रणांमधील लोकांसह दोघांची राज्य सरकारने नार्को टेस्ट करावी

Ashish Shelar Demand narco test of nawab malik : नवाब मलिक यांची आणि ज्यांच्यावर त्यांनी आरोप केले त्या यंत्रणा मधल्या लोकांची दोघांचीही नार्को टेस्ट राज्य सरकारने करावी दूध का दूध पानी का पानी झाले पाहिजे, अशी मागणी करीत आज भाजपा नेते आमदार अँड आशिष शेलार यांनी नवाब मलिक यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला.

The state government should conduct a narco test on both Minister Nawab Malik and the people in the system he alleged demand Ashish Shelar
नवाब मलिक यांची नार्को चाचणी व्हावी : शेलार 
थोडं पण कामाचं
  • भाजपा नेते आमदार अँड आशिष शेलार यांची मागणी
  • नार्को टेस्ट राज्य सरकारने करावी दूध का दूध पानी का पानी झाले पाहिजे
  • गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्र विकास आघाडीच्या एका मंत्रांचे फुसके बार  फुटत होते,

मुंबई : राज्याचे  मंत्री नवाब मलिक यांची सवयच लपवाछपवी आणि बनवाबनवीची आहे आणि त्यांनी त्यांच्यावर आरोप केले त्यातील काही आरोप गंभीरही आहेत.  मंत्री नवाब मलिक यांच्याकडे अजूनही काही माहिती असू शकते. म्हणून नवाब मलिक यांची आणि ज्यांच्यावर त्यांनी आरोप केले त्या यंत्रणा मधल्या लोकांची दोघांचीही नार्को टेस्ट राज्य सरकारने करावी दूध का दूध पानी का पानी झाले पाहिजे, अशी मागणी करीत आज भाजपा नेते आमदार अँड आशिष शेलार यांनी नवाब मलिक यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला.

आमदार अँड आशिष शेलार पुढे म्हणाले की, गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्र विकास आघाडीच्या एका मंत्रांचे फुसके बार  फुटत होते, त्याचं वर्णन  एवढच करता येईल की, दिवाळीनंतर जो बॉम्ब विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस फोडणार आहेत तो बॉम्ब फुटण्या आधीच बॉम्बचा आवाज येण्या आधीच  घाबरून मलिक यांनी कानावर हात कसे ठेवले, त्याचं चित्र, आज त्यांचा बदललेला आवाज, बदललेला चेहरा आणि बदलेला संवाद यातून स्पष्ट झाले आहे. पण तरीही दिवाळीनंतर बाँम्ब फुटेलच. कारण सत्याला कशाची ही डर असण्याचे कारण नाही.


  सुरुवातीला आम्ही पुन्हा एकदा स्पष्ट करतो समीर वानखेडे यांना चारित्र्याच प्रमाणपत्र देणं हे भाजपचं काम नाही.ड्रग्जच्या विरोधात बिनतोड कारवाई केलीच पाहिजे. यात कोणाचाही मुलाहिजा ठेवण्याची आवश्यकता नाही, हीच भाजपची मागणी आहे. त्यामुळे मुद्दाहून विषय कुठेतरी भरकटत नेण्याचा प्रयत्न आमच्या विरोधकांनी करु नये.
 जिथे चरस,गांजा ड्रग्ज आणि त्यांच्या भाषेतला हर्बल तंबाखू  कितीही प्रमाणात सापला आणि तो कायद्याने गुन्हा असेल तर कारवाई झालीच पाहिजे. त्याचं मोजमापावर कारवाई ठरत असेल तर ते आम्हाला मान्य नाही. 0.200 मिली ड्रग्ज अथवा तस्सम गोष्ट मिळाली तर कायद्यानुसार कारवाई झाली पाहिजे. कुणाचाही मुलाहिजा न ठेवता ही कारवाई व्हावी.

  सवाल हा निर्माण होतोय की,  गेल्या दहा पंधरा दिवसापासून म्हणजे आर्यन खानला अटक झाल्यानंतर जी माहिती मंत्री महोदय देत आहेत याचा बहुतांश गोष्टी आणि माहिती या आर्यन खान यांना झालेल्या अटकेनंतरच्या नाहीत. ही सर्वसाधारण दिलेली माहिती आहे.तुम्ही माहिती लपवण्यासाठी शपथ घेतली होती का? माहिती लपवण्याचे कारण काय?याचे उत्तर मलिक यांनी द्यायला हवे,  ही माहिती नवाब मलिक यांचा  जावई आठ महिने अटकेत असताना त्यांना होती ना?  तुम्ही ती लपवून का ठेवली? मा.राज्यपाल महोदयां समोर तुम्ही काय शपथ घेतली ?  गुन्हे, गुन्हेगारी आणि गुन्हेगार संबंधात माहिती लपवण्याची शपथ आपण घेतली होती का ? ही बाब आता राज्यपाल महोदयांनी तपासला पाहिजे. आणि याचे उत्तर  मंत्री नवाब मलिक यांनी दिला पाहिजे. त्यांनी घेतलेल्या शपथेचा भंग केला असून गुन्हेगारी आणि गुन्हा कार्यपद्धती संबंधीची माहिती लपवणे हा फौजदारी गुन्हा आहे का?  याबद्दलची सुद्धा स्पष्टता झाली पाहिजे. 

 मलिक यांनी यंत्रणांमधील ज्यांच्यावर आरोप केले ते गंभीर आहेत शिवाय मा. मंत्री सरकारची ढाल पुढे करून तसेच ना कोर्टासमोर जात आहेत, ना पोलीस यंत्रणा समोर जात आहेत, ना शपथेवर कोर्टासमोर काही दावा दाखल करीत आहेत , आणि आठ महिने ती माहिती त्यांच्याकडे होती, लपवली. त्यामुळे माननीय नवाब मलिक यांची आणि त्यांनी आरोप केले त्या यंत्रणामधील लोकांची सुद्धा नार्को टेस्ट व्हावी.

राज्याच्या सरकारने दोघांचे टेस्ट करावी. किंबहुना जर नार्को पासून आरोप करणाऱ्यांना लपवालपवी करणाऱ्यांना आणि ज्यांच्यावर गंभीर आरोप केले त्याला या दोघांना समान पद्धतीने राज्य सरकारने वागवलं नाही तर ह्यात राज्य सरकार मध्ये बसलेल्या अन्य लोकां विषयीचा संशय बळावेल म्हणून दोघांचीही टेस्ट करा, समान न्याय द्या., असे ही आमदार अँड अशिष शेलार म्हणाले.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

Mumbai News (मुंबई बातम्या), Times now ची मराठी वेबसाइट -Times Now Marathi वर। सोबत आणखी Marathi News (मराठी बातम्या) अपडेटसाठी आम्हांला गूगल न्यूजवर फॉलो करा. 

पुढची बातमी