7th pay commission : संक्रातीपूर्वी गोड बातमी,  शिक्षक आणि शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांना "या" महिन्यात मिळणार फरकाचा पहिला-दुसरा हप्ता 

7th Pay Commission latest update In marathi । मकर संक्रांतीच्या दोन दिवस शिक्षक आणि शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांचा तोंड गोड गोड करणारा आदेश राज्य सरकारच्या शिक्षण मंडळाकडून आला आहे.

The sweet news before Sankrati, teachers and teaching staff will get the first-second installment difference in Feb 2022
सातवा वेतन आयोगाचा फरकासंदर्भात मोठी बातमी  
थोडं पण कामाचं
  •  मकर संक्रांतीच्या दोन दिवस शिक्षक आणि शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांचा तोंड गोड गोड करणारा आदेश
  • राज्य सरकारच्या शिक्षण मंडळाकडून संक्रातीपूर्वी गोड बातमी
  • शासनाने संदर्भ पत्रानुसार सातव्या वेतन आयोगाच्या फरकाचा पहिला हप्ता सन २०२१-२२ या अदा करणे बाबत मान्यता प्रदान केली

7th pay commission arrears : मुंबई :  मकर संक्रांतीच्या दोन दिवस शिक्षक आणि शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांचा तोंड गोड गोड करणारा आदेश राज्य सरकारच्या शिक्षण मंडळाकडून आला आहे. राज्यातील शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचा-यांना सातवा वेतन आयोग फरकाचा पहिला हप्ता देण्याबाबत आणि अनुदानाची स्थिती लक्षात घेऊन दुसरा हप्ता देण्याचा आदेश राज्य सरकारकडून देण्यात आला.   

या संदर्भात एक शासनाने पत्राद्वारे माहिती दिली आहे.  या संदर्भात फेब्रुवारीच्या पगारात हे फरकाचे दोन हप्ते येण्याची शक्यता आहे. 

7th Pay Commission | केंद्र सरकारच्या निवृत्त होणाऱ्या कर्मचाऱ्यांना मिळणार नव्या सीटीजी नियमाचा फायदा

नेमकं काय आहे त्या पत्रात जाणून घ्या 

उपरोक्त शासन पत्रान्वये राज्यातील शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचा-यांना सातवा वेतन आयोग फरकाचा पहिला हप्ता अदा करणे बाबत तसेच अनुदानाची स्थिती विचारात घेवून दुस-रा हप्ता अदा करणे बाबत आदेश प्राप्त आहेत.

तदनुसार सातवा वेतन आयोगाचा पहिला व दुसरा हप्ता अदा करणेसाठी आवश्यक अनुदानाची पुरवणी मागणी संचालनालयाच्या स्तरावरून सादर करण्यात आली होती त्यानुसार वाढीव निधी उपलब्ध झाल्यावर सातव्या वेतन आयोगाचा दूसरा हप्ता माहे फेब्रुवारीच्या नियमित देयकासोबत अदा करण्याची कार्यवाही करण्यात यावी. 

7th Pay Commission: केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर! पगार  होऊ शकतो दुप्पट,  कॅल्युलेशन समजून घ्या 

शासनाने संदर्भ पत्रानुसार सातव्या वेतन आयोगाच्या फरकाचा पहिला हप्ता सन २०२१-२२ या अदा करणे बाबत मान्यता प्रदान केली असल्याने शासन निर्णय दि. १५/०७/२०१७ स्तरावरून प्रशसकिय मान्यता प्रदान करण्याची आवश्यकता नाही. नुसार पुन्हा संचालनालयाच्या स्तरावरून प्रशासकीय मान्यता प्रदान करण्याची आवश्यकता नाही. 

सवब क्षेत्रिय कार्यालयाने त्यांच्या कार्यालयात उपलब्ध असलेल्या परिपोषक अभिलेख्यांच्या आधारे तपासून, पडताळणी करुन आणि हे दावे पुर्वी कधीही आले नव्हते व कोषागारावर सादर करण्यात आले नव्हते व ते नियमानुसार देय आहेत या बाबतची खातरजमा करून सातव्या वेतन आयोगाच्या फरकाचा पहिला हप्ता अदा करावा.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

Mumbai News (मुंबई बातम्या), Times now ची मराठी वेबसाइट -Times Now Marathi वर। सोबत आणखी Marathi News (मराठी बातम्या) अपडेटसाठी आम्हांला गूगल न्यूजवर फॉलो करा. 

पुढची बातमी