The third wave of the corona: कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचे सावट; राज्य सरकारकडून ऑक्सिजन, व्हेंटिलेटरची तयारी करण्यास सुरुवात

मुंबई
भरत जाधव
Updated Jan 02, 2022 | 16:35 IST

The third wave of the corona :   राज्यात कोरोना(Corona) रुग्णांची (Patients) संख्या दिवसेंदिवस झपाट्याने वाढत होत असल्याचे दिसत आहे. शनिवारी केल्या गेलेल्या नोंदणीनुसार, दिवसभरात ९१७० नव्या कोरोना रुग्णांची आणि ७ मृत्यूची नोंद झाली

The state government started preparing oxygen and ventilators
राज्य सरकारकडून ऑक्सिजन, व्हेंटिलेटरची तयारी करण्यास सुरुवात  |  फोटो सौजन्य: Times Now
थोडं पण कामाचं
  • कोरोनाच्या संभाव्य तिसऱ्या लाटेला रोखण्यासाठी सरकार प्रयत्नशील असून राज्यात ऑक्सिजन, व्हेंटिलेटरची तयारी करण्याचे काम सुरू
  • महापालिकेच्या रुग्णालयात ऑक्सिजनची व्यवस्था करण्याचे आदेश
  • राज्यातील लोकांनी कोरोनाचे नियम पाळावे तसेच डोस घ्यावेत असे आवाहन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले.

The third wave of the corona :  मुंबई : राज्यात कोरोना(Corona) रुग्णांची (Patients) संख्या दिवसेंदिवस झपाट्याने वाढत होत असल्याचे दिसत आहे. शनिवारी केल्या गेलेल्या नोंदणीनुसार, दिवसभरात ९१७० नव्या कोरोना रुग्णांची आणि ७ मृत्यूची नोंद झाली. या रुग्णसंख्येच्या वाढत्या आलेखामुळे कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचे सावट राज्यावर आहे. यामुळे नागरिकांनी कोरोना प्रतिबंधक नियमांचे (Corona Prevention Rules) पालन करावे, असे आवाहन सरकारकडून (Government) केले जात आहे. मात्र तरीही रुग्ण संख्या वाढत आहे. याच पार्श्वभूमीवर राज्य सरकारने (State Government) कोरोनाची संभाव्य तिसरी लाट (third wave) रोखण्यासाठी काय तयारी केली आहे, असे उपमुख्यमंत्री अजित पवार (Deputy Chief Minister Ajit Pawar) यांना विचारण्यात आले. यावर अजित पवार यांनी राज्य सरकारने केलेल्या तयारीची माहिती दिली आहे.

अजित पवार म्हणाले की, राज्य सरकार मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्त्वाखाली काम करत आहे. कोरोनाच्या संभाव्य तिसऱ्या लाटेला रोखण्यासाठी सरकार प्रयत्नशील असून राज्यात ऑक्सिजन, व्हेंटिलेटरची तयारी करण्याचे काम सुरू आहे. राज्यात दुसरी लाट होती, तेव्हा आम्ही तयारी करण्याचे आदेश दिले होते. ऑक्सिजन, व्हेंटिलेटरची तयारी करण्याचे काम केले जात आहेत. दुसऱ्या लाटेमध्ये उद्योगाचा ऑक्सिजन इकडे वळवावा लागला होता. यावेळी ऑक्सिजन कमी पडले होते. त्याच्या तिप्पट ऑक्सिजनची व्यवस्था आपापल्या भागात करावी, असे सांगण्यात आले. पुण्यात ऑक्सिजन प्लांट उभे केले आहेत.

ग्रामीण भागात यावेळी मोठी मदत

उपमुख्यमंत्री म्हणाले की, 'राज्यात रुग्णसंख्या वाढत आहे. दरम्यान यावेळच्या अधिवेशनामध्येही आम्ही रुग्णालयात मोठी मदत केली आहे. सरकार म्हणून आमच्याकडून खबरदारी घेतली जात आहे. महापालिकेच्या रुग्णालयात ऑक्सिजनची व्यवस्था करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. जिल्हा नियोजनातील 20 टक्के खर्चाची मान्यता दिली आहे. तसेच. सगळ्यांनी नियमांचे पालन करावे. असा सल्ला नागरिकांना देत असताना उपमुख्यमंत्री म्हणाले मी स्वत: 50 पेक्षा जास्त लोक असतील तर त्या कार्यक्रमाला जाणार नाही.

कोविड नियमांचे पालन करा, नागरिकांना आवाहन

अजित पवार म्हणाले की, आता मी विचारून कार्यक्रमाला जाणार आहे. यासोबतच आमच्यासह सर्वांनी कोरोना नियमांचे पालन केले पाहिजे. कारण आम्ही जर पालन केले नाही तर लोकांना कसे सांगणार. राज्य सरकारने दिलेल्या नियमांच पालन करण्याचे आवाहन त्यांनी राज्यातील जनतेला दिले आहे. तसेच राज्यातील सर्वांनी लस घ्यावी असे आवाहन अजित पवार यांनी केले आहे. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

Mumbai News (मुंबई बातम्या), Times now ची मराठी वेबसाइट -Times Now Marathi वर। सोबत आणखी Marathi News (मराठी बातम्या) अपडेटसाठी आम्हांला गूगल न्यूजवर फॉलो करा. 

पुढची बातमी