मुंबई : शिवसेनेचे नाव आणि चिन्ह गेल्यानंतर आज माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शिवसेना भवन येथे जिल्हाप्रमुखांची बैठक घेतली या बैठकीत त्यांनी उद्धविग्न भावना व्यक्त केल्या. धनुष्य बाण हे चिन्ह गेल्या नंतर आता मशाल हे चिन्हही काढून घेण्याचा डाव असणार आहे. त्यामुळे मशाल गेली तरी अजून 10 चिन्ह माझ्या मनात आहे, असे उद्धव ठाकरे यांनी यावेळी बोलताना सांगितले. (The torch went away, still 10 signs in my mind - Uddhav Thackeray)
केंद्रीय निवडणूक आयोगाने पक्षाचे नाव आणि चिन्ह हे एकनाथ शिंदे गटाला आता उद्धव ठाकरे गट आक्रमक झाला आहे. आता पुढची रणनिती ठरविण्यासाठी त्यांनी मुंबईतील शिवसेना भवन येथे जिल्हाप्रमुखांची बैठक आयोजित केली होती. त्यावेळी उद्धव ठाकरे बोलत होते.
यावेळी उद्धव ठाकरे म्हणाले, सुपारी देऊन शिवसेनेची हत्या करण्याचा कट रचण्यात आला. भाजपचे तळवे चाटण्यासाठी शिवसेनेचा जन्म झालेला नाही. आता प्रसंग बाका आहे. आता जर जागे झालो नाही तर 2024 मध्ये हुकूमशाही येण्याची शक्यता आहे. कालांतराने नव्या केसेस उघडल्या जातील आणि शिवसेना पूर्ण संपविण्याचा हा भाजपचा प्लान आहे, असेही त्यांनी यावेळी सांगितले.
Mumbai News (मुंबई बातम्या), Times now ची मराठी वेबसाइट -Times Now Marathi वर। सोबत आणखी Marathi News (मराठी बातम्या) अपडेटसाठी आम्हांला गूगल न्यूजवर फॉलो करा.