मुंबई : राज्यासह (State) देशातील परिस्थिती पाहता समाजकटंकाकड़ून जातीय तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न होत आहे. या पार्श्वभूमीवर मुंबई पोलीस सक्रिय झाले असून मुंबई पोलिसांनी (Mumbai Police) गेल्या चार महिन्यांत एकूण 12,800 सोशल मीडिया (Social media) पोस्ट हटवल्या. ज्या समाजात हिंसाचार पसरवू शकतात किंवा लोकांपर्यंत हिंसा पसरवण्याच्या उद्देशाने विशेष माध्यमांवर टाकल्या गेल्या आहेत, अशा पोस्ट पोलिसांनी समाज माध्यमांतून हटवल्या आहेत. महाराष्ट्रात शांतता राहावी यासाठी महाराष्ट्र एसआयडीची टीम दररोज 30 ते 35 अशा पोस्ट हटवत असल्याचे महाराष्ट्र पोलिसांनी सांगितले.
एकूण 12,800 सोशल मीडिया पोस्ट हटवल्या
मुंबई पोलिसांच्या विशेष शाखेने जानेवारीत 5 हजार 754, फेब्रुवारीत 4 हजार 252, मार्चमध्ये 3 हजार 958 पोस्ट हटवली आहेत. या अशा पोस्ट आहेत ज्या समाजात हिंसाचार पसरवू शकतात. मुंबई पोलिसांनी सोमवारी सांगितले की, मुंबईत जातीय वाद नियंत्रणात ठेवण्यासाठी सोशल मीडिया लॅब सक्रिय करण्यात आली आहे. यामुळए आता सोशल मीडियाचा वापर करत सामाजित तेढ निर्माण करण्यांना आता चाप बसणार आहे. मुंबई पोलिसांच्या सोशल मीडिया लॅबकडून आक्षेपार्ह पोस्टवर कारवाई करण्यात येत आहे.
Mumbai News (मुंबई बातम्या), Times now ची मराठी वेबसाइट -Times Now Marathi वर। सोबत आणखी Marathi News (मराठी बातम्या) अपडेटसाठी आम्हांला गूगल न्यूजवर फॉलो करा.