Devendra Fadnvis । मनसेसोबत कोणतीही युती नाही - देवेंद्र फडणवीस 

राज्यात महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि भाजप यांच्या कोणत्याही प्रकारच्या युतीच्या प्रस्ताव नाही आहे. या संदर्भात कोणतीही चर्चा झालेली नाही. या संदर्भात आलेल्या बातम्या या अपरिपक्व असल्याचे स्पष्टीकरण राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहे.

There is no alliance with MNS Devendra Fadnavis clarifies
मनसेसोबत कोणतीही युती नाही - देवेंद्र फडणवीस   |  फोटो सौजन्य: BCCL
थोडं पण कामाचं
  • राज्यात महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि भाजप यांच्या कोणत्याही प्रकारच्या युतीच्या प्रस्ताव नाही.
  • या संदर्भात कोणतीही चर्चा झालेली नाही. या संदर्भात आलेल्या बातम्या या अपरिपक्व असल्याचे स्पष्टीकरण राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहे.
  • भायखळा रेल्वे स्थानकाच्या सुशोभिकरण कार्यक्रमाला फडणवीस उपस्थित होते.

मुंबई :  राज्यात महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि भाजप यांच्या कोणत्याही प्रकारच्या युतीच्या प्रस्ताव नाही आहे. या संदर्भात कोणतीही चर्चा झालेली नाही. या संदर्भात आलेल्या बातम्या या अपरिपक्व असल्याचे स्पष्टीकरण राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहे. (There is no alliance with MNS Devendra Fadnavis clarifies)

भायखळा रेल्वे स्थानकाच्या सुशोभिकरण कार्यक्रमाला फडणवीस उपस्थित होते. त्यावेळी पत्रकारांनी त्यांना प्रश्न विचारला त्यावेळी या प्रकारच्या बातम्या निराधार असल्याचे त्यांनी सांगितले आहे.  काही तासांपूर्वी भाजप आणि मनसे युती होणार आहे. या संदर्भात नागपुरात बैठक झाल्याची चर्चा माध्यमात आली होती. या संदर्भात  माध्यमांनी फडणवीस यांना प्रश्न विचारला असता त्यांनी नकार दिला आहे. 

ते म्हणाले, युतीच्या चर्चा कपोकल्पीत आहे. मनसेकडून कोणताही प्रस्ताव नाही. आमची कोणतीही चर्चा झालेली नाही.  पण एक मात्र नक्की आहे, अलीकडच्या काळात राज ठाकरेंनी ज्या भूमिका घेतल्या आहेत. त्यातील बहुतांशी भूमिकांना म्हणजे ती हिंदुत्वाची असो किंवा लाऊड स्पीकर सुप्रिम कोर्टाच्या आदेशानुसार लावायला पाहिजे, या आमच्याही भूमिका राहिलेल्या आहेत. आणि म्हणून आम्ही ज्या भूमिका मांडतो आहे. त्याच भूमिका  राज ठाकरे मांडत आहे.  पण, अजूनही आमची फॉरमल चर्चा झालेली नाही. त्यामुळे आता त्यावर जे कमेंट येत आहेत ते फारच न पकलेले असे आहेत, अशा शब्दांत फडणवीस यांनी युतीच्या शक्यता फेटाळून लावल्या आहेत. 

जातीयवाद आणि संप्रदायीक वाद अशी परिस्थिती निर्माण केली जात आहे. याला महाराष्ट्र बळी पडणार नाही, असे सरकारचे मत आहे. यावर बोलताना फडणवीस म्हणाले, देशात ही परिस्थिती निर्माण केली आहे. ती या सुड सेक्युलर लोकांनी केली आहे. या सुडो सेक्युलर लोकांनी लांगुलचालनाच्या माध्यमातून बहुसंख्यांक आणि अल्पसंख्यांकाची दरी निर्माण केली आहे. अल्प संख्यांकाचे लांगुलचालन करून एक प्रकारची दुर्भावना निर्माण केली आहे, असा आरोप फडणवीस यांनी केला आहे. 

माननीय मोदीजींचा मत आहे. सबका साथ सबका विकास, सबका विश्वास आणि सबका प्रयास. मोदीजींच्या योजना सर्वांना लागू आहे. पण काही जण मतांच्या राजकारणासाठी अल्प संख्यांकाचे लांगुलचालन करता त्यामुळे आज भारताची परिस्थिती बिघडते आहे. असेही फडणवीस म्हणाले. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

Mumbai News (मुंबई बातम्या), Times now ची मराठी वेबसाइट -Times Now Marathi वर। सोबत आणखी Marathi News (मराठी बातम्या) अपडेटसाठी आम्हांला गूगल न्यूजवर फॉलो करा. 

पुढची बातमी