Load shedding in Maharashtra: आबा आता घरातही नसणार लाईट; अख्या महाराष्ट्रात 8 तास राहणार अंधार, पहा भारनियमनाचे वेळापत्रक

मुंबई
भरत जाधव
Updated Apr 10, 2022 | 14:48 IST

आपल्या सर्वांना ज्या गोष्टींची चिंता होती ती गोष्ट आपल्या पदरी पडणार आहे. राज्यात विजेची मागणी वाढत असल्याने अख्या महाराष्ट्रात (Maharashtra) भारनियमन म्हणजे लोडशेडिंग (Load shedding) आखली जाणार आहे. अनेक दिवसांपासून वीजेचे संकंट घोंघावत आहे. ग्रामीण भागात  ( rural areas) शेतकऱ्यांची वीज कापली जात आहे.

Load shedding in Maharashtra:
आबा ऐकलं का, आता घरातही 8 तास लाईट नसणार  |  फोटो सौजन्य: Indiatimes
थोडं पण कामाचं
  • लोडशेडिंग टाळण्यासाठी वीज खरेदीचे इतर पर्याय पाहण्याचे निर्देश
  • राज्यात सध्या 3,000 मेगावॅट ते 4,000 मेगावॅट विजेची तूट
  • महावितरणने (Mahavitaran) लोडशेडिंगचे वेळापत्रक जारी केले आहे.

मुंबई: आपल्या सर्वांना ज्या गोष्टींची चिंता होती ती गोष्ट आपल्या पदरी पडणार आहे. राज्यात विजेची मागणी वाढत असल्याने अख्या महाराष्ट्रात (Maharashtra) भारनियमन म्हणजे लोडशेडिंग (Load shedding) आखली जाणार आहे. अनेक दिवसांपासून वीजेचे संकंट घोंघावत आहे. ग्रामीण भागात  ( rural areas) शेतकऱ्यांची वीज कापली जात आहे. लाईट बील (Light Bill) भरा असे आवाहन राज्य सरकारकडून (State Government) करण्यात येत आहे. राज्यात सध्या 3,000 मेगावॅट ते 4,000 मेगावॅट विजेची तूट आहे.

देशात सध्या कोळशाची कमतरता आहे. त्यामुळे वीजनिर्मीतीला अडथळा येत आहे. उन्हाळा लवकर सुरू झाल्यामुळे विजेच्या मागणीत वाढ होत असताना, गुजरात आणि आंध्र प्रदेशच्या धर्तीवर महाराष्ट्राला लवकरच ब्लॅकआउट किंवा लोडशेडिंगचा सामना करावा लागू शकतो. म्हणून आता महावितरणने (Mahavitaran) लोडशेडिंगचे वेळापत्रक जारी केले आहे. दरम्यान लोडशेडिंग टाळण्यासाठी राज्य मंत्रिमंडळाने महावितरणला वाढती मागणी पूर्ण करण्यासाठी आणि लोडशेडिंग टाळण्यासाठी वीज खरेदीचे इतर पर्याय पाहण्याचे निर्देश दिले आहेत.महाराष्ट्रात काही भागात दिवसा आठ तास तर काही भागात रात्री आठ तास वीज मिळणार आहे. खालच्या PDF मध्ये तुम्हाला समजेल की तुमच्या भागात कोणत्या वेळी लाईट असणार आहे. संबंधीत वेळापत्रक हे एप्रिल 2022 पासून जून 2022 पर्यंत लागू असणार आहे. संबंधीत वेळापत्रक 1 एप्रिलपासून लागू झाले आहे.

दरम्यान राज्यातील विजेची मागणी आधीच 28,589 मेगावॅटवर पोहोचली आहे, जी लवकरच 30,000 मेगावॅटपर्यंत वाढू शकते. वीज मागणी विक्रमी 8.2 टक्क्यांनी वाढली आहे. मुंबईची मागणी 3400 मेगावॅट आहे, ती आणखी वाढू शकते अशी शक्यता वर्तवण्यात आली आहे. ब्लॅकआउट किंवा लोडशेडिंग टाळण्यासाठी, राज्य मंत्रिमंडळाने शुक्रवारी येथे झालेल्या विशेष बैठकीत राज्य संचालित वीज वितरण कंपनी महावितरणला कोस्टल गुजरात पॉवर लिमिटेडकडून 60 मेगावॉट तात्पुरते 5.50 ते 5.70 रुपये प्रति युनिट दराने घेण्यास परवानगी दिली आहे.  कोस्टल गुजरात पॉवर लिमिटेडकडून वीज खरेदीसाठी महावितरणचा पुढील अडीच महिन्यांचा खर्च 100 कोटी ते 150 कोटी रुपये असणार आहे असे ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी सांगितले. राज्याच्या तिजोरीवर कोणताही बोजा पडणार नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे. 

राज्यात कोणत्या वेळेवर नसणार लाईट जाणून घ्या, पहा वेळापत्रक 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

Mumbai News (मुंबई बातम्या), Times now ची मराठी वेबसाइट -Times Now Marathi वर। सोबत आणखी Marathi News (मराठी बातम्या) अपडेटसाठी आम्हांला गूगल न्यूजवर फॉलो करा. 

पुढची बातमी