मुंबई: मध्य रेल्वे रविवारी मुंबई विभागात विविध अभियांत्रिकी आणि देखभालीची कामे करण्यासाठी तिच्या ट्रान्स हार्बर आणि हार्बर लाईन विभागांवर मेगाब्लॉक घेणार आहे. (These lines of Mumbai Local Railway will be 'Megablock Free' tomorrow.)
अधिक वाचा : Air Indiaच्या विमानात सू करणारा आरोपी शंकर मिश्रा अटकेत; बंगळुरुमध्ये दिल्ली पोलिसांनी ठोकल्या बेड्या
ठाणे ते वाशी/नेरुळ स्थानकांदरम्यान अप आणि डाऊन ट्रान्स हार्बर मार्गावर सकाळी 11.10 ते दुपारी 4.10 वाजेपर्यंत मेगाब्लॉक असेल. सकाळी १०.३५ ते दुपारी ४.०७ वाजेपर्यंत वाशी/नेरुळ/पनवेलकडे जाणाऱ्या डाऊन ट्रान्स हार्बर मार्गावरील सेवा आणि सकाळी १०.२५ ते दुपारी ४.०९ वाजेपर्यंत वाशी/नेरुळ/पनवेलहून सुटणाऱ्या ठाण्याकडे जाणार्या अप ट्रान्स हार्बर मार्गावरील सेवा रद्द राहतील.
छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस-चुनाभट्टी/वांद्रे डाऊन हार्बर मार्गावर सकाळी 11.40 ते दुपारी 4.40 वाजेपर्यंत आणि चुनाभट्टी/वांद्रे-छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस अप हार्बर मार्गावर सकाळी 11.10 ते दुपारी 4.10 वाजेपर्यंत मेगाब्लॉक राहील. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई/वडाळा रोडवरून सकाळी ११.०४ ते दुपारी ४.४७ या वेळेत वाशी/बेलापूर/पनवेलसाठी डाउन हार्बर आणि छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबईहून सकाळी १०.४८ ते दुपारी ४.४३ वाजेपर्यंत वांद्रे/गोरेगावसाठी डाउन हार्बर मार्गावरील सेवा बंद राहतील.
अधिक वाचा : CM Tiger चा थाट; ऐटीत करणार भोजन; पाहा व्हायरल व्हिडिओ
सकाळी १०.०७ ते दुपारी ३.२० या वेळेत पनवेल/बेलापूर/वाशी येथून छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबईसाठी सुटणाऱ्या अप हार्बर मार्गावरील सेवा आणि गोरेगाव/वांद्रे येथून छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबईसाठी सकाळी १०.४५ ते सायंकाळी ५.१३ पर्यंत सुटणाऱ्या अप हार्बर मार्गावरील सेवा रद्द राहतील.
ब्लॉक कालावधीत पनवेल ते कुर्ला (प्लॅटफॉर्म क्रमांक 8) दरम्यान विशेष सेवा चालवल्या जातील. हार्बर मार्गावरील प्रवाशांना ब्लॉक कालावधीत सकाळी 10.00 ते संध्याकाळी 6.00 वाजेपर्यंत मुख्य मार्ग आणि पश्चिम रेल्वे मार्गे प्रवास करण्याची परवानगी आहे. रविवारी मेन लाइनवर मेगाब्लॉक असणार नाही. हे मेगा ब्लॉक पायाभूत सुविधांच्या देखभाल आणि सुरक्षिततेसाठी आवश्यक आहेत. प्रवाशांनी रेल्वे प्रशासनाला सहकार्य करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
Mumbai News (मुंबई बातम्या), Times now ची मराठी वेबसाइट -Times Now Marathi वर। सोबत आणखी Marathi News (मराठी बातम्या) अपडेटसाठी आम्हांला गूगल न्यूजवर फॉलो करा.