बेळगाव आणि पश्चिम बंगालवर बोलण्याची यांची औकातच नाही, शेलारांचा सेनेवर हल्लाबोल 

Ashish Shelar's attack on the shiv Sena । बेळगाव आणि पश्चिम बंगालवर बोलण्याची औकातच नाही, असा सनसनाटी टोला लगावत भाजपा नेते आमदार अँड आशिष शेलार यांनी टीका करणाऱ्या शिवसेनेचा समाचार घेतला.

They can't even talk about Belgaum and West Bengal, Shelar attack on the shiv Sena
बेळगाव आणि पश्चिम बंगाल निकालावरून शेलारांचा सेनेवर हल्ला 

थोडं पण कामाचं

  • जे स्वतः कुबड्यांवर आहेत. ज्यांचं पाहिलं पाऊल कुबड्यां शिवाय पडत नाही.
  • बेळगाव आणि पश्चिम बंगालवर बोलण्याची औकातच नाही,
  • भाजपा नेते आमदार अँड आशिष शेलार यांनी टीका करणाऱ्या शिवसेनेचा समाचार घेतला.

मुंबई :  जे स्वतः कुबड्यांवर आहेत. ज्यांचं पाहिलं पाऊल कुबड्यां शिवाय पडत नाही. त्यांची बेळगाव आणि पश्चिम बंगालवर बोलण्याची औकातच नाही, असा सनसनाटी टोला लगावत भाजपा नेते आमदार अँड आशिष शेलार यांनी टीका करणाऱ्या शिवसेनेचा समाचार घेतला.

पश्चिम बंगालच्या निकालावरुन कालपासून भाजपाला लक्ष करणाऱ्या सर्व पक्ष आणि नेत्यांना चोख प्रतिउत्तर आज भाजपा नेते आमदार अँड आशिष शेलार यांनी प्रदेश कार्यालयात पत्रकारांशी बोलताना दिले.

भाजपला पश्चिम बंगाल मध्ये अपेक्षित यश मिळाले नाही.आम्ही त्यांना पराभूत करू शकलो नाही हे खरं आहे. आम्हला पूर्ण विजय मिळाला नाही, पण यशाचे मोजमाप फक्त भाजप कडेच आहे. मंत्री जितेंद्र आव्हाड जर अदृश्य शक्ती बद्दल बोलले असतील तर त्यांची काळजी काँग्रेसने करावी. या अदृश्य हातांनी काँग्रेस भूईसपाट झाली.

पंढरपूरात मग काय झाले? यालाच स्वत:चे ठेवायचे झाकून आणि दुसऱ्याकडे बघायचे वाकून असा हा प्रकार आहे. असा टोला आमदार अँड आशिष शेलार यांनी लगावला.

अर्धवट माहिती च्या आधारावर पत्रकार परिषद घेणे म्हणजे नवाब मलिक. मोफत लस प्रकरणात ते तोंडा वर आपटले आहेत. खोटी माहिती त्यांनी देऊ नये.

तेच नवाब मलिक गृहमंत्री अमित शाह यांनी राजिनामा द्या असे बोलत आहेत. मग पंढरपूरमध्ये त्यांच्या पक्षाला अपयश मिळाले म्हणून नवाब मलिक उप मुख्यमंत्री अजित पवार यांचा राजिनामा मागणार का? असा सवाल आमदार अँड आशिष शेलार यांनी केला.

नाना पटोलेंचं आयुष्य कालाकांडीच्या कामात गेलं. नाना पटोले व्यवहाराच्या सत्यतेवर माहिती ठेवत नाही. उचलली जीभ, लावली टाळ्याला असा त्यांचा स्वभाव आहे. त्यामुळे कोणीही त्यांना गांभीर्याने घेत नाही." 'माहितीविना बोलणं म्हणजे कालाकांडी, नाना पटोलेंची पत्रकार परीषद' अशी टीका शेलार यांनी केली.

पुनावालांना धमकी देणाऱ्यांची माहिती आमच्याकडे

अदर पुनावाला प्रकरण गाजत आहे. वेगवेगळ्या पक्षांची नाव पुढे येत आहेत. पुनावाला यांना आताच सुरक्षा का मागाविशी वाटली? हा प्रश्न गंभीर आहे. त्यांचे संकेत स्थानिक पक्षाकडे जात असतील तर हा गंभीर मुद्दा आहे."

"केंद्राने आपलं कामं चोख केलय. सद्य परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर अशा पद्धतीच्या सुरक्षेची गरज वाटली असेल, तर केंद्राने त्यांना सुरक्षा पुरवली आहे.  त्यात गैर काय? आज यावर राजकारण करायचं नाही. कोरोना काळात राजकारण न करता जनसेवेला प्राधान्य देण्याची भाजपाची भूमिका आहे असे शेलार म्हणाले. "या प्रकरणात ज्यांच्यापर्यंत धागेदोरे जातील. त्यांना उघड करण्याचं काम भाजपा करेल. आमच्याकडे त्याची माहिती सुद्धा आहे. ज्यांचे हात यामध्ये गुंतले आहेत, त्यांनी खबरदार रहावं" असा गर्भित इशारा त्यांनी दिला.

तसेच देवेंद्रजी कोणती ही वाक्य वापरतात त्याचा गंभीर आणि गर्भित इशारा असतो. त्यामुळे पंढरपुरात केलेले विधान ही गर्भितच होते. असेही पत्रकारांच्या प्रश्नावरील उत्तरात ते म्हणाले.

लस मिळत नाही म्हणून ओरडायच आणि दुसरी कडे आम्ही लसीकरणामध्ये नंबर एक आहोत असं आहोत हेही ओरडायचं. त्यामुळे लस नाही हे  ओरडे आपले अपयश झाकण्यासाठी  सुरु आहे. महाराष्ट्रातील मंत्रीमंडळ वाचाळवीरांचे आहे.

ज्या वेळी आम्ही बोलत असलेल्या भाषेचा प्रश्न उपस्थितीत केला जातोय. तेव्हा पांचही बोटे राष्ट्रवादीकडे जातात. भाजपाच्या नेत्यां विषयी, पंतप्रधान, केंद्रीय गृहमंत्री यांच्या विषयी. राज्याचे विरोधी पक्षनेते यांच्या विषयी राष्ट्रवादी पक्षाचे नेते कार्यकर्ते सभेमध्ये, सोशल मिडियावर काय बोलत आहेत? हे एकदा पहा. त्यामुळे अजूनही आम्ही संयमाने वागत आहोत, हे लक्षात ठेवा.

आमची भूमिका स्पष्ट आहे जनतेला मदत करणे.

सर्व नेते राज्यातील जनतेला आधार वाटाव या साठी फिरत आहेत. पण कुणी पक्षाने एकट यावं दुकट यावं  धोबी पछाड आम्ही योग्य वेळी केल्या शिवाय राहणार नाही, अशा शब्दांत त्यांनी तिघाडीतील पक्षांचा समाचार घेतला.
 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

Mumbai News (मुंबई बातम्या), Times now ची मराठी वेबसाइट -Times Now Marathi वर। सोबत आणखी Marathi News (मराठी बातम्या) अपडेटसाठी आम्हांला गूगल न्यूजवर फॉलो करा. 

पुढची बातमी