ED seized cash from Sanjay Raut house : एकनाथ शिंदेंविरोधात कटकारस्थान करण्यासाठी ते पैसे ठेवले असतील- केसरकर

मुंबई
भरत जाधव
Updated Aug 01, 2022 | 10:34 IST

संजय राऊत यांनी मुद्दाम या पैशांवर एकनाथ शिंदे यांचे नाव लिहले असेल तर ते कोणालाही कळणार नाही. कारण संजय राऊत अत्यंत हुशार आणि बुद्धिमान आहेत. ते काहीही करू शकतात. पण या पैशांशी एकनाथ शिंदे यांचा कोणताही संबंध नाही, असे दीपक केसरकर यांनी स्पष्ट केले.

Money received in Rauta's house for action against CM?
राऊतांच्या घरात मिळालेले पैसे सीएम विरोधातील कारवाईसाठी?  |  फोटो सौजन्य: Times Now
थोडं पण कामाचं
  • राम मंदिराच्या उभारणीसाठी शिंदे यांनी जे पैसे दिले होते, तेही या माणसाने घरी ठेवले की काय -संजय शिरसाट
  • संजय राऊत यांनी हे पैसे जाणीवपूर्वक ठेवले असावेत.
  • संजय राऊत यांना एकनाथ शिंदे यांच्याविरोधात काही करायचे असेल, त्यासाठी त्यांना अयोध्येला जायचे असेल.- दीपक केसरकर

मुंबई : उद्धव ठाकरेंच्या (Uddhav Thackeray) शिवसेनेचे (Shiv Sena) राज्यसभा (Rajya Sabha) खासदार संजय राऊत (MP Sanjay Raut) यांना ईडीने (ED) अटक केली. सोमवारी (१ ऑगस्ट २०२२) सकाळी संजय राऊत यांना पीएमएलए कोर्टात सादर केले जाईल. संजय राऊत यांना बेहिशेबी पैशांच्या प्रकरणात अटक करण्यात आली. याआधी त्यांची दीर्घ काळ पत्राचाळ घोटाळा प्रकरणी (Patra Chaal scam case) चौकशी झाली. दरम्यान राऊत यांची तब्बल सहा ते नऊ तास चौकशी झाली त्यानंतर त्यांना अटक करण्यात आली. यादरम्यान संजय राऊत यांच्या घरात साडेअकरा लाखांची रोकड ईडीला मिळाली असून ती जमा करण्यात आली आहे. शिंदे गटाचे प्रवक्ते दीपक केसरकर यांनी या पैशांवरुन मोठा आरोप केला आहे. मुख्यमंत्री शिंदेच्याविरोधात कारवाई करण्यासाठी हा पैसा ठेवला असावा असा आरोप केला आहे. 

सक्तवसुली संचलनालय अर्थात ईडीने रविवारी शिवसेना खासदार संजय राऊत यांच्या घरावर धाड टाकली होती. यावेळी ईडीने संजय राऊत यांच्या घरातून तब्बल ११.५ लाख रुपयांची रोकड जप्त केली होती. यापैकी दीड लाख रुपये हे घराच्या दुरुस्तीसाठी असल्याची माहिती समोर आली होती. तर उर्वरित १० लाख रुपयांच्या बंडलावर 'एकनाथ शिंदे अयोध्या', असे लिहण्यात आले होते. हे १० लाख रुपये पक्षाचे पैसे असल्याची माहिती संजय राऊत यांनी 'ईडी'ला दिली होती. परंतु, या पैशांवर एकनाथ शिंदे यांच्या नावाचा उल्लेख का होता, यावरून राजकीय वर्तुळात चर्चा रंगली.

Read Also : ऐकलं का! शिंपीही बनतो देशाचा अभिमान, अचिंतनं केलंय शिवणकाम

या पार्श्वभूमीवर एकनाथ शिंदे गटाचे प्रवक्ते दीपक केसरकर (Deepak Kesarkar) यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना या सगळ्यामागे संजय राऊत यांनी वेगळी चाल असू शकते, असा संशय व्यक्त केला. संजय राऊत यांच्या घरात सापडलेल्या 10 लाखांच्या रक्कमेवर 'एकनाथ शिंदे अयोध्या' असे लिहण्यात आले होते. कदाचित संजय राऊत यांना एकनाथ शिंदे यांच्याविरोधात काही करायचे असेल, त्यासाठी त्यांना अयोध्येला जायचे असेल. त्यासाठी संजय राऊत यांनी हे पैसे राखीव ठेवले असतील. या पैशांचा स्रोत दाखवावा लागेल. तो त्यांनी दाखवावा, राऊत यांच्याकडे त्याबाबत माहिती असेल, असे केसरकर यांनी म्हटले.
तसेच संजय राऊत यांनी हे पैसे जाणीवपूर्वक ठेवले असावेत, अशी शक्यताही दीपक केसरकर यांनी बोलून दाखवली.

Read Also : आज श्रावणातील पहिला सोमवार, जाणून घ्या शिवशंकराची पूजा विधी

संजय राऊत यांनी मुद्दाम या पैशांवर एकनाथ शिंदे यांचे नाव लिहले असेल तर ते कोणालाही कळणार नाही. कारण संजय राऊत अत्यंत हुशार आणि बुद्धिमान आहेत. ते काहीही करू शकतात. पण या पैशांशी एकनाथ शिंदे यांचा कोणताही संबंध नाही, असे दीपक केसरकर यांनी स्पष्ट केले. आम्ही गुवाहाटीमध्ये असतानाही आमदारांना पैसे देण्यात आल्याचा आरोप संजय राऊत यांनी केला होता. परंतु, तेव्हाही आम्ही आमच्या हॉटेलच्या रूम आणि घरांची झडती घ्या, असे म्हटले होते, असेही केसरकर यांनी सांगितले.

दरम्यान महाराष्ट्रातील ईडीने केलेल्या 90 टक्के कारवाया या बिल्डरांविरोधात असून 10 टक्के कारवाया राजकीय नेत्यांविरोधात असल्याचे केसरकर यांनी म्हटले. संजय राऊत यांचे निकटवर्तीय असलेले प्रवीण राऊत यांना चार महिन्यांपूर्वी अटक करण्यात आली आहे. त्यानंतर संजय राऊत यांना चौकशीसाठी समन्स बजावण्यात आले होते. मात्र, त्यांनी सातत्याने चौकशीसाठी वेळ मागून घेतली. अशी वेळ मागणे चुकीची असते, यातून साक्षीदारांवर दबाव आणला जाऊ शकतो, असेही ते म्हणाले.  शिंदे गटातील काही आमदार ईडीच्या रडारवर आहेत. याबाबत विचारले असता केसरकर यांनी सांगितले की, ईडीने चौकशी करणे म्हणजे कारवाई सुरू आहे, असा त्याचा अर्थ होत नाही. आम्ही केलेला उठाव हा शिवसेना वाचवण्यासाठी केला होता. त्याचा चौकशीचा काहीही संबंध नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले. 

Read Also : Monkeypox : भारतात मंकीपॉक्सचा पहिला बळी

राम मंदिराचे पैसे ठेवले असतील

ईडीने संजय राऊत यांना अटक केली यामुळे राज्यातील राजकारण तापणार हे निश्चित आहे, पण त्याआधी मिळालेल्या पैशांवर आरोप-प्रत्यारोप होणार आहेत. मिळालेले पैशा कशासाठी होते, का ठेवण्यात आले होते अशी असंख्य प्रश्न उपस्थित होत आहेत. ईडीला मिळालेल्या पैशावर शिंदे गटाचे आमदार संजय शिरसाट यांनी खोचक टीका केली आहे. ईडीच्या लोकांना राऊतांच्या घरी 10 ते 11 लाख रुपये सापडले. त्यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं नाव होतं. राम मंदिराच्या उभारणीसाठी शिंदे यांनी जे पैसे दिले होते, तेही या माणसाने घरी ठेवले की काय असं वाटतं. जो करेल तो भरेल. त्यामुळे राऊतांवर ही वेळ आली असावी, असा हल्लाही संजय शिरसाठ यांनी चढवला आहे. तर शिंदे गटाचे प्रवक्ते दीपक केसर यांनी मोठा आरोप केला आहे.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

Mumbai News (मुंबई बातम्या), Times now ची मराठी वेबसाइट -Times Now Marathi वर। सोबत आणखी Marathi News (मराठी बातम्या) अपडेटसाठी आम्हांला गूगल न्यूजवर फॉलो करा. 

पुढची बातमी