Police patrol bike stolen | बापरे ! चोराने पोलिसांचीच पेट्रोलिंग बाईक चोरली, त्यानंतर अशी केली दुसरी चोरी

thief had stolen a police patrol bike : पेट्रोलिंग बाईक चोरी गेल्याची तक्रार पोलिसाने केली नसली तरी युवकाने आपल्या बाईक चोरीची तक्रार पोलीस ठाण्यात दाखल केल्यानंतर या सर्व घटनेचा उलघडा झाला असून सदर घटनेचं बिंग फुटलं आहे

thief had stolen a police patrol bike
बापरे ! चोराने पोलिसांचीचं पेट्रोलिंग बाईक चोरली  |  फोटो सौजन्य: BCCL
थोडं पण कामाचं
  • पेट्रोलिंग बाईक चोरी गेल्याची तक्रार पोलिसाने केली नाही
  • पहाटेच्या सुमारास अज्ञात चोरांने चक्क पोलीसाची ही बाईकच चोरली
  • माणिकपूर पोलिसांनी त्याच दिवशी विरार पोलीसांची बाईक त्यांच्या ताब्यात दिली

Police patrol bike | पालघर : चोर कधी काय चोरातील याचा आपण विचार देखील करू शकत नाही. आता एका चोराने एक वेगळ्या चोरीला अंजाम दिला आहे. चोराने थेट पोलीस चौकीसमोरून पोलिसांची पेट्रोलिंग बाईक (police patrol bike) चोरली आणि या बाईकवरून एका युवकाची नवी बाईक चोरून पळ काढला असल्याची घटना समोर आली आहे. त्यामुळे पोलिसांना देखील चोराने आपला हिसका दाखवला आहे. पेट्रोलिंग बाईक चोरी गेल्याची तक्रार पोलिसाने केली नसली तरी युवकाने आपल्या बाईक चोरीची तक्रार पोलीस ठाण्यात दाखल केल्यानंतर या सर्व घटनेचा उलघडा झाला असून सदर घटनेचं बिंग फुटलं आहे. सध्या या चोरीची जोरदार चर्चा सुरू असून चोराचा शोध सुरू आहे. (thief had stolen a police patrol bike)

अशी करण्यात आली चोरी?

पहाटेच्या सुमारास अज्ञात चोरांने चक्क पोलीसाची ही बाईकच चोरली. सदर चोरीची घटना शुक्रवारी, २४ डिसेंबर रोजी घडली आहे. पोलिसांची एमएच ४८ सी ४१० ही पेट्रोलिंग बाईक विरार पोलीस ठाण्याच्या अंतर्गत असणाऱ्या विरार पश्चिमेकडील बीट क्रमांक १ ही चौकीसमोर उभी होती. चोराने गाडीवर लक्ष ठेवून चौकीसमोरील गाडी घेवून थेट वसईतील गास रोडवरील सनसीटी गार्डन येथे पोहोचला आणि तिथे उभा असलेली टीवीएस कंपनीची रायडर १२५ या मॉडलची बाईक अनिल यादव हा आपला मित्र अमित पटेल हे दोघेजण घेऊन थांबले होते. हे दोघेजण उद्यानात सकाळी ७ वाजून ३० वाजता उद्यानात फोटो काढत होते. यावेळी तिथे हा चोर आला. त्याने चोरी करण्याची एकदम तैयारी केली होती. त्याने, काळ्या रंगाचा जॅकेट, निळया रंगाचा टी शर्ट, खाकी रंगाची कार्गो पॅंट घालून आला होता.

आपण पोलीस असल्याचे त्याने अनिल यादवला सांगितले त्याचबरोबर त्याने त्यांच्याकडे असलेल्या नवीन बाईकची स्तुती करण्यास सुरुवात केली. स्तुती करत असल्याने हे दोघे मित्र देखील मोठ्या आनंदात होते. त्याने एक टेस्ट राईड घेवून येतो असं अमित यादवला म्हटलं. अमित यादवने देखील सदर व्यक्तीवर विश्वास ठेवला आणि बाईक त्याच्या ताब्यात दिली. सदर अनोळखी व्यक्ती बाईक घेवून तो सकाळी ९ च्या दरम्यान तेथून फरार झाला. ही बाईक घेऊन जाताना त्याने पोलीसांची बाईक तेथेच सोडली. बाइक चोरी झालेल्या अनिलने समजूतदारपणा दाखवत चोराशी सुरू असलेला संवाद आपल्या मोबाईलमध्ये त्याच्या नकळत चित्रीत केला असल्याने चोर लवकर सापडण्याची शक्यता वर्तवली जात आहे. पेट्रोलिंग बाईकच चोरीला गेल्याने त्याची चर्चा होते आहे.

माणिकपूर पोलिसांनी त्याच दिवशी विरार पोलीसांची बाईक त्यांच्या ताब्यात दिली

त्याच दिवशी पोलिसांची बाईक मिळाल्याने, संबंधित पोलिसाने तक्रार दाखल केली नसल्याचे विरार पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सुरेश वराडे यांनी मान्य केले आहे.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

Mumbai News (मुंबई बातम्या), Times now ची मराठी वेबसाइट -Times Now Marathi वर। सोबत आणखी Marathi News (मराठी बातम्या) अपडेटसाठी आम्हांला गूगल न्यूजवर फॉलो करा. 

पुढची बातमी