मुंबई : नागरिकांकडून थर्टी फर्स्टला ( Thirty first) सेलिब्रेशन करुन नव्या वर्षाचं जंगी स्वागत केलं जातं. या सेलिब्रेशनच्या पार्श्वभूमीवरच पोलीस (Police) यंत्रणा आणि राज्य उत्पादन शुल्क विभाग (State Excise Department) सज्ज झाले आहे.पुणे आणि मुंबई, नाशिक शहरातून एक महत्त्वाची बातमी समोर आली आहे. सरत्या वर्षांला निरोप देताना आणि नवीन वर्षाच्या स्वागतासाठी मुंबई-पुणेकर (Mumbai-Pune) जय्यत तयारी करत आहेत. या दिवशी मद्यपींची चंगळ असते. त्यात यंदा प्रथमच नववर्षांच्या पहाटेच्या पाचपर्यंत मद्यविक्री दुकानांनाही परवानगी मिळाल्याने तळीरामांमध्ये उत्साह दुणावल्याचे चित्र आहे. यामुळे यंत्रणा कामाला लागली असून मद्यपींना दारू पिण्यासाठी परवाना दाखवावा लागणार आहे. (Many roads in Mumbai will remain closed and this cities alcoholics will need a license)
अधिक वाचा : CRPF मध्ये 1458 हेड कॉन्स्टेबल आणि ASIभरती
या नियमासह मुंबईत वाहतूक यंत्रणेवर पोलीस लक्ष ठेवून असणार आहेत. मुंबईत वाहतूक कोंडी होऊ नये यासाठी वाहतूक पोलिसांकडून 4 पोलीस उपायुक्त, 2000 वाहतूक पोलीस कर्मचारी, वाहतूक वार्डन, स्वयंसेवक तैनात राहणार आहेत. शहरात वाहतूक कोंडी होऊ नये यासाठी अनेक मार्ग बंद करण्यात येणार असून शहरातील अनेक ठिकाणी एकेरी मार्ग सुरू ठेवण्यात येणार आहे. अपघातावर नियंत्रण ठेवण्यासाठी वाहतूक पोलिसांकडून शहराच्या 100 ठिकाणी नाकाबंदी करण्यात येणार आहे.
अधिक वाचा : 'पठाण' अडकणार वादाच्या भोवऱ्यात?
गेल्या दोन वर्षापासून कोरोनामुळे मद्यपान करून वाहन चालवणाऱ्या वाहन चालकाची ब्रेथ ॲनालायझर तपासणी बंद करण्यात आली होती. त्यामुळे गेल्या दोन वर्षात फक्त सात ड्रंक अँड ड्राईव्ह करणाऱ्या तळीरामांवर कारवाई करण्यात आली होती. परंतु यावेळेस वाहतूक पोलिसांनी पुन्हा ब्रेथ ॲनालायझर तपासणी सुरू करत मद्यपान करून वाहन चालवणाऱ्यांवर कारवाई करण्यात येणार असल्याचे सांगण्यात येत आहे.
मरीन ड्राईव्ह परिसरातील नेताजी सुभाष रोड हा रस्ता नरिमन पॉईंटपासून मुंबई प्रिन्सेस फ्लायओव्हरपर्यंत उत्तर वाहिनी आवश्यकता लागली तर बंद असेल. श्यामप्रसाद मुखर्जी चौक ते गेटवे ऑफ इंडियाकडे जाणारा रस्ता पुढे रेडिओ क्लबकडे जाणारा रस्ता एक दिवसाच्या वाहतुकीसाठी बंद राहणार आहे.
गेटवे ऑफ इंडियाकडे जाणारे रस्ते, नेताजी, सुभाष रोड, मरीन ड्राईव्ह, गफारखान रोड, वरळी सी फेसला लागून असलेला रस्ता, जुहू तारा रोड या रस्त्यांवर सायंकाळी ते दुसऱ्या दिवशी सकाळपर्यंत नो पार्किंग झोन असेल.
अधिक वाचा : Team India : श्रीलंकेविरुद्धच्या सीरिजमध्ये ऋषभ पंतला डच्चू
नवीन वर्षाचे स्वागत जगभरात केलं जातं. मुंबईसह पुण्यातील नागरीकही नवीन वर्षाच्या स्वागतासाठी सज्ज झाले आहेत. तसेच पुण्यातील प्रशासन देखील थर्टी फस्टला कडेकोट बंदोबस्त ठेवण्यासाठी सज्ज झाले आहे. यादिवशी मोठ्या प्रमाणात दारूचे सेवन केलं जाते. याच पार्श्वभूमीवर राज्य उत्पादन शुल्कने मद्यपींसाठी परवाना जारी केला आहे. ज्या लोकांना दारू प्यायची आहे त्यांना हा परवाना दाखवावा लागणार आहे.
राज्य उत्पादन शुल्क विभागाची 31 डिसेंबरला करडी नजर असणार आहे. पुणे जिल्ह्यात यंदा 31 डिसेंबरला राज्य उत्पादन शुल्काचे 10 विशेष पथकं करडी नजर ठेवणार आहेत. रात्रीच्या गस्ती, अनधिकृत ढाबे, फार्म हाउस तसेच संशयित गाड्यांची तपासणी होणार आहे. राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधीक्षक चरणसिंह राजपूत यांनी याबाबत माहिती दिली
पुणे जिल्ह्यातील 1 लाख 65 हजार नागरिकांना मद्य प्राशन करण्यासाठी राज्य उत्पादन शुल्क विभागाने वन डे परमिट दिले आहे. हे परवाने हॉटेल, बार यांच्याकडे देण्यात आलेले आहेत. राज्य उत्पादन शुल्क विभागाने याबाबत माहिती दिली आहे. वन डे परमिटची किंमत पाच रुपये आहे. राज्य उत्पादनक शुल्क विभागाच्या नियमांनुसार, विना परवाना मद्य प्राशन किंवा विक्री केली तर गुन्हा दाखल होऊ शकतो.
शहरातील 7 लाख तळीरामांनी मद्यपानाचे परवाने घेतले आहेत. यात दोन दिवसात तेवढीच वाढ होण्याची शक्यता आहे, त्यामुळे किमान पंधरा लाख तरी अधिकृतरित्या मदिरेचा आश्वाद घेणार असल्याचे मानले जात आहे. हे ऑनलाईन परवाने राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून दिले जातात. अवैध मद्यवाहतुकीवर कारवाईसाठी उत्पादन शुल्क विभागाने कंबर कसली असून याकाळात नाकाबंदी करून विशेष पथके तैनात केली आहेत.
येत्या 31 डिसेंबरच्या पार्श्वभूमीवर आत्तापर्यंत 7 लाख तळीरामांनी मद्यपानाचे परवाने घेतले आहेत. यामध्ये देशी दारुसाठीचे 5 लाख 20 हजार तर, विदेशी मद्यासाठीचे 2 लाख 20 हजार असे 7 लाख 40 हजार मद्यपींनी परवाने ऑनलाईन घेतले आहेत.
Mumbai News (मुंबई बातम्या), Times now ची मराठी वेबसाइट -Times Now Marathi वर। सोबत आणखी Marathi News (मराठी बातम्या) अपडेटसाठी आम्हांला गूगल न्यूजवर फॉलो करा.