Maharashtra TAIT Exam 2023 : टेट परीक्षेसाठी फॉर्म भरताना चूक केलेल्यांना बसला मोठा फटका

मुंबई
रोहन जुवेकर
Updated Feb 08, 2023 | 14:50 IST

those who made mistakes while filling the form for the Maharashtra TAIT 2023 exam were pay fine : महाराष्ट्र टेट 2023 परीक्षेसाठी इच्छुक आणि पात्र उमेदवारांना ऑनलाईन अर्ज भरायचे होते. अर्ज भरताना ज्यांनी चूक केली त्यांना मोठा फटका बसला आहे. 

Maharashtra TAIT 2023 exam
टेट परीक्षेसाठी फॉर्म भरताना चूक केलेल्यांना बसला मोठा फटका  |  फोटो सौजन्य: Representative Image
थोडं पण कामाचं
  • टेट परीक्षेसाठी फॉर्म भरताना चूक केलेल्यांना बसला मोठा फटका
  • अर्ज सबमिट केल्यानंतर एडिट करता येत नाही
  • अर्ज भरताना चूक केलेल्यांना एक पेक्षा जास्त वेळा परीक्षा फी भरण्याचा भुर्दंड

those who made mistakes while filling the form for the Maharashtra TAIT Exam 2023 exam were pay fine : महाराष्ट्रातील प्राथमिक, माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शाळांतील सुमारे 65 हजार रिक्त पदांसाठी महाराष्ट्र टेट 2023 (Maharashtra Teacher Aptitude and Intelligence Test 2023) परीक्षेचे आयोजन करण्यात आले आहे. परीक्षा बुधवार 22 फेब्रुवारी 2023 ते शुक्रवार 3 मार्च 2023 या काळात होणार आहे. या परीक्षेसाठी इच्छुक आणि पात्र उमेदवारांना ऑनलाईन अर्ज भरायचे होते. अर्ज भरताना ज्यांनी चूक केली त्यांना मोठा फटका बसला आहे. 

अर्ज सबमिट केल्यानंतर एडिट करता येत नाही. यामुळे अर्ज भरताना चूक केल्यास पूर्णपणे नव्याने अर्ज भरून पुन्हा एकदा परीक्षा फी भरावी लागत आहे. ओपन कॅटेगरीसाठी (खुला प्रवर्ग) 950 रुपये आणि रिझर्व्ह कॅटेगरीसाठी (राखीव प्रवर्ग) 850 रुपये परीक्षा फी आहे. यामुळे अर्ज भरताना चूक केल्यास दुसऱ्यांदा परीक्षा फी भरावी लागत आहे. या प्रकारात अर्ज भरताना चूक करणाऱ्यांना आर्थिक हानी सहन करावी लागत आहे. 

उमेदवारांना अर्ज भरण्यासाठी प्रशिक्षण दिलेले नाही. यामुळे गैरसमजातून अर्ज भरताना चुका होत आहेत. या समस्येवर अद्याप उपाय करण्यात आलेला नाही.

इंधन खर्चात होणार बचत, बाजारात येणार नवे Petrol
Amrit Udyan मध्ये हे बघाल तर चक्रावून जाल

महाराष्ट्र टेट 2023 (Maharashtra Teacher Aptitude and Intelligence Test 2023) परीक्षेसाठी अधिसूचना (नोटिफिकेशन) मंगळवार 31 जानेवारी 2023 रोजी काढण्यात आली. या अधिसूचनेत परीक्षा देऊ इच्छिणाऱ्यांना ऑनलाईन पद्धतीने सर्व कागदपत्रांच्या सॉफ्ट कॉपी बुधवार 8 जानेवारी 2023 पर्यंत अपलोड करण्यास सांगण्यात आले होते. पण आता नवी अधिसूचना काढून कागदपत्रांची पूर्तता करण्यासाठी शुक्रवार 31 मार्च 2023 पर्यंतची मुदत देण्यात आली आहे. तसेच टेट परीक्षेसाठी ऑनलाईन अर्ज भरण्याची मुदत रविवार 12 नोव्हेंबर 2023 पर्यंत वाढवण्यात आली आहे.

केंद्र सरकारने घेतलेल्या सीईटी परीक्षेचा निकाल अद्याप जाहीर झालेला नाही. यामुळे ती परीक्षा दिलेल्या अनेकांनी टेटसाठी इच्छा असूनही अद्याप अर्ज भरलेला नाही. या उमेदवारांसाठी अर्ज करण्याचा कालावधी वाढविण्यात आला आहे. परीक्षेच्या उर्वरित वेळापत्रकात बदल करण्यात आलेला नाही.  

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

Mumbai News (मुंबई बातम्या), Times now ची मराठी वेबसाइट -Times Now Marathi वर। सोबत आणखी Marathi News (मराठी बातम्या) अपडेटसाठी आम्हांला गूगल न्यूजवर फॉलो करा. 

पुढची बातमी