मुंबई : महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एकदा एक मोठी घटना घडणार असल्याचं चित्र आहे. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते (Senior Congress leader)बाळासाहेब थोरात (Balasaheb Thorat) यांचं काँग्रेस विधीमंडळ पक्षनेतेपद अडचणीत आल्याची चर्चा सुरू झाली आहे. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष (Congress state president) नाना पटोले यांच्या कार्यशैलीबद्दल व्यक्त केलेली नाराजी, नाशिक पदवीधर मतदारसंघाच्या (Nashik Graduate Constituency) निवडणुकीत (Election) दाखवलेली निष्क्रियता; तसेच पक्ष आणि तांबे कुटुंबात समन्वय घडवून आणण्यात आलेले अपयश यामुळे काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांचे पद अडचणीत येण्याची शक्यता असल्याची चर्चा आहे. (Threat to Balasaheb Thorat's position as group leader )
अधिक वाचा : शरीरातील चरबी जाळतील हे drinks
कसबा-चिंचवड पोटनिवडणुकीनंतर यासंदर्भातील निर्णय होईल असं सांगण्यात येत आहे. थोरात यांनी पटोलेंसोबत काम करणं अशक्य असल्याचं पत्र काँग्रेस अध्यक्षांना पाठवल्यामुळे पक्षांतर्गत वाद आता चव्हाट्यावर आला आहे. ज्यामुळं काँग्रेसमधली गटबाजीही उघड झाली आहे. विधान परिषदेच्या नाशिक पदवीधर मतदारसंघातून निवडून आल्यानंतर अपक्ष आमदार सत्यजित तांबे यांनी पत्रकार परिषद घेऊन निवडणुकीच्या एबी फॉर्मवरून काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांना लक्ष्य केले होते.
अधिक वाचा : भरपूर पाणी पिण्याचे आहेत अनेक फायदे; दूर होतात अनेक आजार
याशिवाय थोरात यांनी काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांना पत्र पाठवून प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्यासोबत काम करणे अशक्य असल्याचे सांगितले होते. तसेच आपल्याला पक्षात अपमानास्पद वागणूक मिळत असल्याची खंत देखील थोरात यांनी आपल्या जवळील लोकांमध्ये बोलून दाखवली आहे.
या पत्रामुळे पटोले आणि थोरात यांच्यातील वाद आता चव्हाट्यावर आला आहे. त्यामुळे आता थोरातांच्या बाजूने पटोले यांच्यावर कारवाई होणार की, पटोले यांची बाजू घेत थोरात यांचे विधिमंडळातील गटनेते पद जाणार की दोन्ही नेत्यांची पदे जाणार, याबाबत काँग्रेसमध्ये संभ्रम आहे. थोरात आणि पटोले हे दोन्ही नेते राहुल गांधींचे निकटवर्तीय आहेत. असं असल्यामुळे काँग्रेस या दोघांमधील वाद मिटवणार की दोघांवरही कारवाई करणार याकडे राजकीय वर्तुळाच्या नजरा आहेत. दरम्यान, पटोले आणि थोरात यांच्या या भांडणात विधिमंडळातील गटनेतेपदासाठी इच्छुक काही ज्येष्ठ काँग्रेस नेते थोरात यांचे पत्ते कट करण्याच्या प्रयत्नात असल्याचेही काँग्रेसच्या गोटात बोलले जात आहे.
अधिक वाचा : लग्नासाठी पती-पत्नीच्या वयात किती अंतर असावे?
नाशिक निवडणुकीत थोरात यांची भूमिका काँग्रेसला अनुकूल नव्हती. निवडणुकीत निष्क्रिय राहून त्यांनी तांबे यांना मदत केली, असे काँग्रेसमधील एका गटाचे म्हणणे आहे. तर दुसरा गटानुसार, नाना पटोले हे पक्षातील ज्येष्ठ नेत्यांना विश्वासात न घेता काम करीत आहेत. माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण, पृथ्वीराज चव्हाण, बाळासाहेब थोरात हे पक्षाचे ज्येष्ठ नेते आहेत. त्यामुळे त्यांना डावलून किंवा दुखावून पक्षात निर्णय घेतले जात आहेत.
Mumbai News (मुंबई बातम्या), Times now ची मराठी वेबसाइट -Times Now Marathi वर। सोबत आणखी Marathi News (मराठी बातम्या) अपडेटसाठी आम्हांला गूगल न्यूजवर फॉलो करा.