Mumbai News: काळजाचा ठोका चुकवणारा व्हिडिओ, तरूणांची वाहतूक पोलिसाला धडक

मुंबई
पूजा विचारे
Updated Jan 14, 2020 | 14:20 IST

मुंबईत सोमवारी बाईक चालकानं पोलीस कॉन्स्टेबलला जोरदार धडक दिल्याची घटना घडली आहे. तुमच्या काळजाचा ठोका चुकेल असाच हा व्हिडिओ आहे.

Mumbai colaba accident
Mumbai News: काळजाचा ठोका चुकवणारा व्हिडिओ, तरूणांची वाहतूक पोलिसाला धडक 

मुंबई: सोमवारी मुंबईत एका वेगवान बाईकस्वारानं एका पोलीस कॉन्स्टेबलला उडवल्याची घटना समोर आली आहे. या अपघातात पोलीस कॉन्स्टेबल गंभीर जखमी झालेत. ही घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. तसंच या घटनेचा व्हिडिओ ही सोशल मीडियावर वेगानं व्हायरल होतोय. ही घटना मुंबईच्या कुलाबा भागात घडली आहे. 

या व्हिडिओत मुंबईच्या एक 50 वर्षीय कॉन्स्टेबल ड्युटीवर होते. एका बाईकवरून तीन तरूण येत होते ट्रिपल सीट येते होते. त्यांना बघून पोलीस कॉन्स्टेबल त्यांना पकडण्यासाठी  पुढे गेले.  त्याचवेळी  पोलीस कॉन्स्टेबल आपल्या जवळ येताना बघताच बाईकस्वारचं आपल्या  गाडीवरील नियंत्रण सुटलं आणि तो थेट कॉन्स्टेबलला जाऊन धडकला. 

त्यानंतर व्हिडिओमध्ये बघू शकतो. कॉन्स्टेबलला धडक बसताच ते पुढे फरफटत जाऊन एका गाडीला आदळतात. त्यानंतर बाईकवरचेही तरूण खाली कोसळतात. पोलिसांना बाईकवरून ट्रिपल सीट जाणाऱ्या तरूणांची ओळख पटली नव्हती. कॉन्स्टेबलला धडक दिल्यानंतर त्यांना दुखापत झाली की नाही हे देखील स्पष्ट झालं नव्हतं. पोलिसांनी या तरूणांचा शोध घेतला आहे. समोर आलेल्या माहितीनुसार, आजूबाजूच्या उपस्थित लोकांनी कॉन्स्टेबलला जवळच्या रूग्णालयात उपचारासाठी दाखल केलं. त्यांच्या दोन्ही हाताला फ्रॅक्चर असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. 

याच दरम्यान कुलाबा पोलीस स्टेशनमध्ये या तिन्ही तरूणांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. तिघांनाही अटक करण्यात आली आहे. रविवारी त्यांना एक होलीडे कोर्टात सादर केलं असून 15 जानेवारीपर्यंत त्यांना पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी