Three Holi Special Trains From Konkan Railway : होळी अर्थात शिमगा हा सण साजरा करण्यासाठी कोकणात जाणाऱ्या प्रवाशांकरिता कोकण रेल्वे स्पेशल ट्रेन सोडणार आहे.
लोकमान्य टिळक टर्मिनस ते मडगाव ही गाडी लोकमान्य टिळक टर्मिनसवरून २६ फेब्रुवारी, ५ मार्च तसेच १२ मार्च या दिवशी रात्री १०.१५ वाजता सुटेल. ही ट्रेन दुसऱ्या दिवशी मडगावला सकाळी १०.३० वाजता पोहोचेल. ही गाडी परतीच्या प्रवासात मडगाव येथून २७ फेब्रुवारी, ६ मार्च, १३ मार्चला मडगाव येथून सकाळी ११.३० वाजता सुटून रात्री ११.२५ ला मुंबईत लोकमान्य टिळक टर्मिनसला पोहोचेल. ही गाडी ठाणे, पनवेल, रोहा, माणगाव, वीर, खेड, चिपळूण सावर्डा, संगमेश्वर, रत्नागिरी, आडवली राजापूर, वैभववाडी, कणकवली, सिंधुदुर्ग, कुडाळ, सावंतवाडी, थिवी तसेच करमाळी येथे थांबणार आहे. ही गाडी १७ डब्यांची आहे.
चाळीशीनंतर स्टॅमिनासाठी पुरुषांनी खायचे पदार्थ
कच्ची पपई खा आणि अनेक आजारांपासून लांब राहा
दुसरी विशेष गाडी पुणे जंक्शन ते करमाळी दरम्यान धावणार आहे. ही गाडी पुणे येथून २४ फेब्रुवारी, ३ मार्च, १० मार्च व १७ मार्च रोजी संध्याकाळी ५.३० वाजता सुटून गोव्यात करमाळीला दुसऱ्या दिवशी सकाळी ८.३० वाजता पोहोचेल. परतीच्या प्रवासात ही साप्ताहिक गाडी करमाळी येथून २६ फेब्रुवारी, ५ मार्च, आणि १९ मार्च रोजी सकाळी ९.२० ला सुटून रात्री ११. ३५ वाजता पुण्याला पोहोचेल. ही गाडी लोणावळा, कल्याण, पनवेल, रोहा, माणगाव, वीर, खेड, चिपळूण, सावर्डे, संगमेश्वर, रत्नागिरी, आडवली, राजापूर, वैभववाडी, कणकवली, सिंधुदुर्ग, कुडाळ, सावंतवाडी तसेच थिवी येथे थांबणार आहे. एकूण २२ डब्यांची गाडी आहे.
जास्त चिकन खाल तर तब्येत बिघडवाल
Fact Check : selfie चा अतिरेक skin साठी घातक
तिसरी होळी विशेष गाडी करमाळी ते पनवेल मार्गावर धावणार आहे. ही गाडी २५ फेब्रुवारी, ४ मार्च ११ मार्च तसेच १८ मार्च रोजी करमाळी येथून सकाळी ९.२० ला सुटून त्याच दिवशी रात्री ती ८.१५ वाजता पनवेलला पोहोचेल. परतीच्या प्रवासात ही गाडी २५ फेब्रुवारी, ४ मार्च, ११ मार्च तसेच १८ मार्च रोजी पनवेल येथून सुटून रात्री १०.०० वाजता सुटून दुसऱ्या दिवशी सकाळी ८.३० वाजता गोव्यात करमाळीला पोहोचेल. ही गाडी थिविम, सावंतवाडी रोड, कुडाळ, सिंधुदुर्ग, कणकवली, वैभववाडी रोड, राजापूर अडवली, रत्नागिरी, संगमेश्वर, सावर्डे, चिपळूण, खेड, वीर, माणगाव आणि रोहा येथे थांबणार आहे.
कोकण रेल्वेच्या 3 होळी स्पेशल ट्रेनमुळे शिमगोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्यांची मोठी सोय होणार आहे. याच कारणामुळे प्रवाशांकडून विशेष गाड्यांचे स्वागत होत आहे.
Mumbai News (मुंबई बातम्या), Times now ची मराठी वेबसाइट -Times Now Marathi वर। सोबत आणखी Marathi News (मराठी बातम्या) अपडेटसाठी आम्हांला गूगल न्यूजवर फॉलो करा.