मुंबईत जुहू बीचवर तिघे बुडाले, बुडालेल्यांपैकी दोघे सख्खे भाऊ

मुंबई
रोहन जुवेकर
Updated Jun 15, 2022 | 08:45 IST

Three including two brothers drown at Juhu beach Mumbai : मुंबईत जुहू बीच येथे चार जण पोहोण्यासाठी पाण्यात उतरले. लाईफगार्ड मनोहर शेट्टी यांनी धोक्याचा इशारा देताच चौघांपैकी एक जण पाण्यातून बाहेर आला. उरलेले तिघे तोपर्यंत पाण्यात नेमके कुठे गेले हेच त्याच्या लक्षात आले नाही. बुडालेल्या तिघांचा शोध सुरू आहे.

Three including two brothers drown at Juhu beach Mumbai
मुंबईत जुहू बीचवर तिघे बुडाले, बुडालेल्यांपैकी दोघे सख्खे भाऊ  |  फोटो सौजन्य: Representative Image
थोडं पण कामाचं
  • मुंबईत जुहू बीचवर तिघे बुडाले, बुडालेल्यांपैकी दोघे सख्खे भाऊ
  • अमन सिंह (२१), कौस्तुभ गणेश गुप्ता (१८), प्रथमेश गणेश गुप्ता (१६) बुडाले, बुडालेल्या तिघांचा शोध सुरू
  • अभिषेक जोगेंद्र शर्मा (१७) पाण्याबाहेर आला

Three including two brothers drown at Juhu beach Mumbai : मुंबईत जुहू बीच येथे चार जण पोहोण्यासाठी पाण्यात उतरले. पण लाईफगार्ड मनोहर शेट्टी यांनी धोक्याचा इशारा देताच चौघांपैकी एक जण पाण्यातून बाहेर आला. उरलेले तिघे तोपर्यंत पाण्यात नेमके कुठे गेले हेच त्याच्या लक्षात आले नाही. बुडालेल्या तिघांचा शोध सुरू आहे. जुहू बीचवर बुडालेल्या तिघांपैकी दोघे सख्खे भाऊ आहेत.

अमन सिंह (२१), कौस्तुभ गणेश गुप्ता (१८), प्रथमेश गणेश गुप्ता (१६) आणि अभिषेक जोगेंद्र शर्मा (१७) हे चौघेजण पाण्यात उतरले होते. यापैकी अभिषेक लाईफगार्डचा इशारा लक्षात येताच पाण्यातून बाहेर आला. सोबत आलेल्या तिघांना त्याने निरोप देण्याआधीच ते पाण्यात दिसेनासे झाले. लाईफगार्ड, अग्नीशमन दलाचे पथक आणि स्थानिक पोलीस संयुक्तपणे शोध मोहीम राबवत आहेत. 

अभिषेक शर्माने दिलेल्या माहितीनुसार, तिघे पाण्यात बुडण्याची घटना मंगळवार १४ जून २०२२ रोजी दुपारी अडीचच्या सुमारास घडली. अभिषेक, गुप्ता बंधू आणि अमन हे चौघे चेंबूर येथे वाशी नाका परिसरातील रहिवासी आहेत. दुपारी टाईमपास करण्यासाठी म्हणून चौघांनी थोडा वेळ जुहू बीचवर जाण्याचा निर्णय घेतला. ओहोटी आहे मग पाण्यात जायला हरकत नाही, असा विचार करून आयत्यावेळी त्यांनी पाण्यात उतरण्याचा निर्णय घेतला. चौघे पाण्यात उतरले. लाईफगार्डने लगेच पाण्याबाहेर येण्यासाठी इशारा दिला. हा इशारा बघून अभिषेकने पाण्याबाहेर येण्याचा निर्णय घेतला. मित्रांना लाईफगार्डचा इशारा सांगावा असे त्याने ठरवले पण पाण्यात त्याला एकही मित्र दिसला नाही. यामुळे चक्रावलेला अभिषेक वेगाने पाण्याबाहेर आला, त्याने लाईफगार्डला घटनेची माहिती दिली. लाईफगार्ड मनोहर शेट्टी यांनी पोलिसांना माहिती दिली आणि शोध मोहीम सुरू झाली. 

पाण्यात बुडालेल्या तिघांना पोहता येत नव्हते. ओहोटी असल्यामुळे कंबरेपर्यंतच्या पाण्यात सहज जाऊ असा विचार करून सर्व जण पाण्यात उतरले होते. पण अंदाज चुकला आणि चौघांपैकी तिघे बुडाले; अशी माहिती सांताक्रुझ पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक बाळासाहेब तांबे यांनी दिली.

बुडालेल्या तिघांपैकी कौस्तुभ गुप्ताचा बारावीचा निकाल काही दिवसांपूर्वीच जाहीर झाला होता. त्याला ८० टक्के गुण मिळाले होते. कौस्तुभचा भाऊ प्रथमेश याने दहावीची परीक्षा दिली होती. तो निकालाची वाट बघत होता. अखेरच्या वृत्तानुसार नौदलाचे चेतक हेलिकॉप्टर पण शोध मोहिमेत सहभागी झाले आहे. रात्री उशिरापर्यंत बुडालेल्यांना शोधणे शक्य झाले नाही. रात्री शोध मोहीम थांबविण्यात आली. सकाळी पुन्हा शोध मोहीम सुरू करण्यात आली आहे.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

Mumbai News (मुंबई बातम्या), Times now ची मराठी वेबसाइट -Times Now Marathi वर। सोबत आणखी Marathi News (मराठी बातम्या) अपडेटसाठी आम्हांला गूगल न्यूजवर फॉलो करा. 

पुढची बातमी