बंडखोरांसाठी मातोश्रीचे 'फाटक' रविंद्र उघडणार का?, दादा भुसे आणि संजय राठोडासोबत फाटक गुवाहाटीत

एकनाथ शिंदे यांच्या गटात आणखी दोन आमदार सामील होणार असल्याची माहिती समोर येत आहे. यात कृषी मंत्री दादा भुसे आणि माजी मंत्री संजय राठोड गुवाहाटी येथे दाखल होणार आहे.

आणखी तीन आमदार गुवाहाटी दाखल होणार पण 'यासाठी'
Three more MLAs to enter Guwahati 
थोडं पण कामाचं
  • एकनाथ शिंदे यांच्या गटात आणखी दोन आमदार सामील होणार असल्याची माहिती समोर येत आहे.
  • यात कृषी मंत्री दादा भुसे आणि माजी मंत्री संजय राठोड गुवाहाटी येथे दाखल होणार आहे.
  • काही मिनिटांत ते एकनाथ शिंदे आणि इतर ४२ आमदार असलेल्या रॅडीसन हॉटेलमध्ये दाखल होणार आहेत.

मुंबई :  एकनाथ शिंदे यांच्या गटात आणखी दोन आमदार सामील होणार असल्याची माहिती समोर येत आहे. यात कृषी मंत्री दादा भुसे आणि माजी मंत्री संजय राठोड गुवाहाटी येथे दाखल होणार असून काही मिनिटांत ते एकनाथ शिंदे आणि इतर ४२ आमदार असलेल्या रॅडीसन हॉटेलमध्ये दाखल होणार आहेत.  या दोघा विधानसभा आमदारांसोबत विधान परिषद आमदार रविंद्र फाटक हे देखील गुवाहाटी येथे गेले आहेत. 

आतापर्यंत एकनाथ शिंदे गटाकडे एकूण ३५ आमदार होते. दादा भुसे आणि संजय राठोड यात सामील झाल्यावर शिंदे गटाकडे शिवसेना आमदारांची संख्या ३७ होणार आहे. त्यामुळे दोन तृतांश आमदारांची संख्या पूर्ण होणार आहे.  तसेच ७ अपक्ष आमदार असल्याने ही संख्या ४४ झाली आहे. 

का गेले रविंद्र फाटक गुवाहाटीला 

एकनाथ शिंदे यांनी महाराष्ट्रातून आमदार सूरत येथे नेल्यानंतर त्यांच्याशी चर्चा करण्यासाठी शिवसेनेकडून मिलिंद नार्वेकर आणि रविंद्र फाटक गेले होते. त्यामुळे आता रविंद्र फाटक का गेले या बाबत आश्चर्य व्यक्त केले जात आहे. रविंद्र फाटक हे विधान परिषदेचे आमदार आहेत. ते गुवाहाटीला जाऊही शिंदे गटाला तसा फायदा नाही. त्यामुळे ते उद्धव ठाकरे यांचा निरोप द्यायला गेले असल्याची माहिती समोर येत आहे. तसेच काही नाराज आमदार पुन्हा उद्धव ठाकरे यांच्याकडे परतायचे असतील तर त्यांचे म्हणणे काय हे जाणून घेण्यासाठी ते गेले असावे असा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. 

दादा भुसे आणि संजय राठोडही समजूत काढणार 

दादा भुसे आणि संजय राठोडही समजूत काढण्यासाठी गुवाहाटी येथे जात असल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली आहे. संजय राठोड यांना मंत्रीपदावरून पायउतार करण्यासाठी भाजपने जंगजंग पछाडले. त्यामुळे ते भाजप पुरस्कृत शिंदे गटात जाणार नाही, असे सूत्रांनी सांगितले. तसेच दादा भुसे यांना शिवसेनेने राज्य मंत्रीपद आणि आता कॅबिनेट मंत्रीपद दिले आहे. त्यामुळे ते उद्धव ठाकरे यांच्यासोबत राहतील असा विश्वास शिवसेनेतील खास सूत्रांनी व्यक्त केला. 


 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

Mumbai News (मुंबई बातम्या), Times now ची मराठी वेबसाइट -Times Now Marathi वर। सोबत आणखी Marathi News (मराठी बातम्या) अपडेटसाठी आम्हांला गूगल न्यूजवर फॉलो करा. 

पुढची बातमी